
शिल्पाच्या बर्थ-डे पार्टीमध्ये शमिताच्या लुकची चर्चा

शिल्पा शेट्टीने मंगळवारी ८ जूनला आपला ४६वा वाढदिवस कुटुंबीयांसह साजरा केला. वाढदिवस साजरा करण्यासाठी शिल्पा पती राज कुंद्रा आणि बहीण शमितासोबत लंच पार्टीसाठी घराबाहेर पडली होती. यादरम्यान अभिनेत्रीने को-ऑर्डिनेट ड्रेस परिधान केला होता. तर शमिताचा लुक अतिशय साधा पण आकर्षक दिसत होता. शमिताच्या या क्युट लुकने तिच्या चाहत्यांचं हृदय जिंकलं.
शिल्पाचा स्टायलिश अवतार

शिल्पा शेट्टीने फ्लोरल प्रिंट ऑन प्रिंट असणाऱ्या को-ऑर्डिनेट सेटची निवड केली होती. या कपड्यांमध्ये तिचा लुक स्मार्ट दिसतोय. हटके लुक मिळावा यासाठी तिनं पांढऱ्या रंगाचे टेक्श्चर्ड ब्लेझर घातलं होतं. यावर तिनं इटॅलियन लक्झरी फॅशन हाउस ‘Valentino’ने डिझाइन केलेलं बकल बेल्ट सुद्धा मॅच केल्याचे आपण पाहू शकता.
या स्टेटमेंट सेटमध्ये स्वीटहार्ट नेकलाइन डिझाइन होतं, ज्यावर अभिनेत्रीने व्ही शेप पॅटर्न कोट घातलंय. दरम्यान अभिनेत्रीनं आउटफिटवर लाइट टोन मेकअप करण्यावर भर दिला होता.
शमिता शेट्टीचा क्युट लुक

आपली बहीण शिल्पाचं स्टाइल स्टेटमेंट मॅच करण्यासाठी शमिता शेट्टीनेही सुंदर ड्रेसची निवड केली होती. तिनं कॉटन-विस्कोस आणि क्रेप फॅब्रिकपासून तयार केलेला शॉर्ट मिनी ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये तिला अवतार फार क्युट दिसतोय. शमिताच्या आउटफिटमध्ये व्ही शेप नेकलाइनसह फुल स्लीव्ह्ज डिझाइन जोडण्यात आलं होतं. या ड्रेसमुळे शमिताला ग्लॅमरस आणि कम्फर्टेबल लुक मिळाला आहे.
शमिता शेट्टीचं जबरदस्त स्टायलिंग

शमिता शेट्टी या ड्रेसमध्ये प्रचंड मोहक व सुंदर दिसतेय, यात शंकाच नाही. या ड्रेसवर तिनं स्टायलिंग सुद्धा अतिशय साध्या पद्धतीचेच केलं होतं. आपल्या ए-लाइन ड्रेससह तिनं नॅचरल लुक मेकअप केला होता. शमिताने या ड्रेसवर साध्या पॅटर्नमधील फ्लॅट्स कॅरी केली होती. एकूणच तिचा लुक हटके दिसत होता. दरम्यान शमितासमोर शिल्पा शेट्टीचा लुक फिका पडला, असे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.