Home मनोरंजन actress shweta tiwari weight loss journey: सुपरहॉट अभिनेत्रीचा डिलिव्हरीनंतर कायापालट, ‘हे’ उपाय करत घटवलं तब्बल १० Kg वजन – 40 year old actress shweta tiwari loss 10 kg after pregnancy and her weight loss journey

actress shweta tiwari weight loss journey: सुपरहॉट अभिनेत्रीचा डिलिव्हरीनंतर कायापालट, ‘हे’ उपाय करत घटवलं तब्बल १० Kg वजन – 40 year old actress shweta tiwari loss 10 kg after pregnancy and her weight loss journey

0
actress shweta tiwari weight loss journey: सुपरहॉट अभिनेत्रीचा डिलिव्हरीनंतर कायापालट, ‘हे’ उपाय करत घटवलं तब्बल १० Kg वजन – 40 year old actress shweta tiwari loss 10 kg after pregnancy and her weight loss journey

[ad_1]

डिलिव्हरीनंतर स्त्रियांचं वजन वाढणं ही सामान्य समस्या आहे. परंतू या सामान्य समस्येमुळे अनेक स्त्रिया त्रस्त आहेत. डिलिव्हरीनंतर कामात अधिक व्यस्त राहणाऱ्या स्त्रिया आपल्या आरोग्याकडे फारसं लक्ष देखील देत नाहीत. बहुतांश स्त्रिया तर वजन वाढीमुळे आपला आत्मविश्वास देखील गमावून बसतात. हे फक्त सामान्य स्त्रियांच्या बाबतीतच नव्हे तर अभिनेत्रींच्या बाबतीतही घडतं. डिलिव्हरीनंतर अभिनेत्री नेहा धुपियाचं तर २५ किलो वजन वाढलं होतं. वजन वाढीमुळे तिला ट्रोल देखील करण्यात आलं.

मात्र हार न मानता तिने तब्बल २१ किलो वजन कमी केलं. त्याचबरोबरीने करिना कपूर खान, ऐश्वर्या राय बच्चन सारख्या अभिनेत्रींनाही या समस्येचा सामना करावा लागला. आता अशाच एका सुपरहॉट अभिनेत्रीचं डिलिव्हरीनंतरचं ट्रान्सफॉर्मेशन खरंच कौतुकास्पद आहे. छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने डिलिव्हरीनंतर तब्बल १० किलो वजन घटवलं. तिची ही वेट लॉस जर्नी नेमकी कशी होती हे सविस्तर स्वरूपात जाणून घेऊया.

​डिलिव्हरीनंतर वाढलं वजन

छोट्या पडद्यावरील सुपरहॉट अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीचं नाव टॉपला आहे. आजवर वेगवगेळ्या रूपात श्वेताला आपण पाहिलं. मात्र डिलिव्हरीनंतर तिला देखील लठ्ठपणाचा सामना करावा लागला. एका मुलाखतीदरम्यान श्वेताने सांगितलं की, ‘माझा मुलगा रेयांशच्या जन्मानंतर माझं वजन ७३ किलो झालं होतं. कुटुंब, मुलं, काम सांभाळत मी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.’ श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रेग्नेंसीदरम्यानचे आणि त्यानंतरचे बरेच फोटो देखील पोस्ट केले होते.

(डिलिव्हरीनंतर ‘हे’ उपाय करून राहा स्लिम फिट, काही दिवसांमध्येच होईल वेट लॉस)

​…अन् वजन कमी करण्याचा घेतला निर्णय

डिलिव्हरीनंतर वाढतं वजन कमी कसं करावं? व्यायामासाठी व्यस्त वेळापत्रकामधून वेळ कसा काढावा? असे अनेक प्रश्न स्त्रियांच्या मनात असतात. मात्र डिलिव्हरीनंतर देखील स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. श्वेताने देखील अगदी तेच केलं. डिलिव्हरीनंतर श्वेताला एका मालिकेसाठी विचारण्यात आलं. आणि याचदरम्यान तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. कलाकार म्हटलं की भूमिकेनुसार त्यांना त्यांच्या लुकमध्ये बदल करावा लागतो. श्वेताने देखील आपण आपलं वजन नियंत्रणात आणून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात केली.

(तुम्हाला माहित आहे का? रात्रीच्या वेळी मुलं अधिक का रडतात? यामागे असू शकतात ‘ही’ कारणं)

​डाएट आणि बरंच काही

प्रेग्नेंसीदरम्यान आणि प्रेग्नेंसीनंतर देखील स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कलाविश्वातील अनेक अभिनेत्री तर काम सांभाळत आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. या अभिनेत्री इतर स्त्रियांसाठी आदर्श आहेत. श्वेताने देखील घर, मुलं सांभाळत फिटनेसकडे लक्ष दिलं. तिची ही वेट लॉस जर्नी काही सोपी नव्हती. डाएट करत तिने व्यायाम करण्याकडेही अधिक भर दिला. आहारतज्ज्ञ किनिता कदाकिया पटेलच्या मार्गदर्शनाखाली श्वेताने तिचं डाएट सुरू ठेवलं.

(प्रग्नेंसीमध्ये वजन कमी असल्यास करू नका दुर्लक्ष, करावा लागेल गंभीर समस्यांचा सामना)

श्वेताचं परफेक्ट डाएट

‘प्रेग्नेंसीनंतर मी माझ्या मुलाला सांभाळण्यामध्येच फार व्यस्त होते. मात्र नंतर मला विविध भूमिकांसाठी विचारणा होऊ लागली. पण त्यापूर्वी वजन कमी करणं हा माझ्यासाठी मोठा टास्क होता.’ असे श्वेताने एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं. श्वेताने वजन कमी करण्याचा निश्चय केला आणि डाएटकडे विशेष लक्ष दिलं. आपल्या आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असला पाहिजे, कोणत्या वेळी काय खाल्लं पाहिजे याचं परफेक्ट वेळापत्रक श्वेताकडे अजूनही आहे. वजन कमी करण्यामागचं श्वेताचं मोठं रहस्य म्हणजे परफेक्ट डाएट आहे.

(स्त्रियांनो बेफिकीर राहू नका, ‘या’ गोष्टींचं सेवन न केल्यास बाळाचा शारीरिक विकास येऊ शकतो धोक्यात)

​‘या’ खाद्यपदार्थांचे करते सेवन

श्वेता कितीही तिच्या कामामध्ये व्यस्त असली तरी ठरलेल्या वेळेमध्ये ती तिचं जेवण करते. तिच्या आहारामध्ये ओट्स, ब्राउन राइस, फळं, लो फॅट दुग्धजन्य पदार्थ, मांस याचा समावेश असतो. आहारतज्ज्ञ किनिता कदाकिया पटेल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, श्वेता तिचं डाएट योग्य पद्धतीने करते. शरीराला पोषक घटकांचा पुरवठा करणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करण्याकडे तिचा अधिक कल असतो. तिचं हेल्दी डाएट तिला फिट ठेवण्यास मदत करतं.’

(बॉलिवूडच्या हॉट मॉमचं दुसऱ्यांदा झालं सिझेरियन, पहिल्या सिझरनंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का?)

नियमित व्यायाम

डाएटबरोबरच नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर निरोगी राहते. श्वेता देखील डाएटबरोबर व्यायाम करण्याकडे अधिकाधिक लक्ष देते. बराच वेळ ती जिममध्ये घाम गाळते. श्वेताच्या वेट लॉस जर्नीमध्ये तिने अधिकाधिक व्यायाम करत स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न केला. तिचे जीममधील व्यायाम करतानाचे बरेच व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. खरं तर वजन कमी केल्यानंतर श्वेता अधिक तरूण आणि सुपरहॉट दिसू लागली आहे. तिच्या ग्लॅमरस फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांची अधिकाधिक पसंतीही मिळताना दिसत आहे.

(NOTE – तुम्ही देखील वजन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असाल तर आपल्या ओळखीच्या डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्या. दुसऱ्या व्यक्तीचे डाएट तसेच वर्कआउट फॉलो करू नका. कारण प्रत्येकाच्या आरोग्याच्या समस्या या वेगवेगळ्या असतात.)

(पालकांसाठी धोक्याची घंटा! टीव्ही, फोनचा अतिवापर मुलांवर पडतोय भारी, वेळीच व्हा सावध)

श्वेताचा ग्लॅमरस अंदाज

आजही आहे इतकी फिट



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here