काहींचे फक्त अस्पष्ट असतात तर काहींचे सरळ सरळ हायलाइट्स होतात. ही एक नैसर्गिक समस्या आहे जी कोणाच्या हातात नसते. मान्य आहे स्त्री म्हणजे सुंदर, सडपातळ, गोंडस, नाजूक अशी लोकांनी एक कल्पनाच बनवून ठेवली आहे पण हे कायम असंच राहावं ही अपेक्षा साफ चूकीची आहे. त्यामुळे अशा घाणेरड्या चौकटीत स्त्रियांना पाहणा-या लोकांना सडेतोड उत्तर देणं गरजेचं असतं जे या धैर्यवान अभिनेत्रींनी करुन दाखवलं.
झरीन खानने दिले सडेतोड उत्तर
उदयपुर मधील एका सुंदर ठिकाणावरचा आपला हा नो-फिल्टर फोटो झरीनने आत्मविश्वासाने आपल्या दिसत असणाऱ्या स्ट्रेच मार्क्स सह शेअर केला. पण म्हणतात ना समाजात खोट काढणाऱ्या लोकांची कमी नसते. तोच अनुभव झरीनला आला आणि तिची खिल्ली उडवली जाऊ लागली. यावर प्रतिक्रिया देताना झरीन म्हणाली, “ज्यांना माझ्या पोटाशी काही समस्या आहे त्यांना मी सांगू इच्छिते की जेव्हा कोणी व्यक्ती आपले वजन 15 किलो कमी करतो तेव्हा त्याचे पोट असेच दिसते. मी कोणतीही सर्जरी वा ट्रिटमेंट सुद्धा घेतलेली नाही. हे माझं शरीर आहे आणि मला त्याबद्दल काही वाटत नाही. तुमच्या टीकेचा देखील मी स्वीकार करते.”
अनुष्काने देखील दिली झरीनला साथ
स्ट्रेच मार्क्स वरून झरीनला ट्रोल केले जात आहे हे पाहून अनुष्काने झरीनचे समर्थन केले आणि तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक पोस्ट लिहिली. तिने म्हटले की, “झरीन तू खूप सुंदर, धैर्यवान आणि परफेक्ट आहेस.” या पोस्टसाठी अनुष्काने जो हॅशटॅग वापरला तो प्रत्येक बॉडी शेमर्सला सणसणीत चपराक लगावणारा आहे. अनुष्काने वापरलेले हॅशटॅग होते, #AppreciationPost, #LookBeyondTheBody म्हणजेच स्पष्ट शब्दांत सांगायचे तर अनुष्काने ट्रोलर्सना आपले बुरसटलेले विचार बदलण्याचा सल्लाच दिला आहे.
उर्वशी ढोलकियाची प्रतिक्रिया
ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या उर्वशी ढोलकियाला जेव्हा तिच्या कपड्यांवरून आणि स्ट्रेच मार्क्स वरून ट्रोल केले गेले तेव्हा उर्वशीने आपल्या अंदाजात या सर्वाना उत्तर दिले. ती म्हणाली की, “मला या स्ट्रेच मार्क्सचा अभिमान आहे आणि हे स्ट्रेच मार्क्स सिद्ध करतात की मी एका जीवाला जन्म दिला आहे आणि म्हणूनच मला या स्ट्रेच मार्क्स बद्दल आत्मीयता आहे. मला त्याची लाज वाटत नाही.” गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्स अधिक जास्त ठळकपणे दिसू लागतात. पण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी कंट्रोल करता येत नाही. त्यामुळे कोणत्याही स्त्रीने याची लाज अजिबातच बाळगू नये.
परिणीतीचा बिनधास्तपणा
उंची वाढल्यावर त्वचेवर पडलेले स्ट्रेच मार्क्स लपवणे कठीण होऊन बसते. जास्तीत जास्त स्ट्रेच मार्क्स तर सर्जरी आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट शिवाय पूर्णपणे गायब होत नाहीत. एका कार्यक्रमा दरम्यान परिणीतीने अत्यंत बिनधास्तपणे आपले स्ट्रेच मार्क्स दाखवले. अजिबात तिने त्यांना लपवण्याचा प्रयत्न केला नाही. यावरून अनेक वाईट कमेंट्सला तिला फेस करावे लागले पण तरी तिने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आपला बिनधास्तपणा कायम ठेवला.
मलायका अरोराने सुनावले खडे बोल
मलायका अरोराचे असे अनेक फोटोज समोर आले आहेत ज्यात तिचे स्ट्रेच मार्क्स अगदी स्पष्टपणे दिसत होते. मलायकाला आपले हे स्ट्रेच मार्क्स दाखवायला काहीही वाटत नव्हते. पण तिच्यावर टीका करणाऱ्यांना यात फार वावगं वाटलं आणि त्यांनी तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली. मात्र लोकांनी कितीही टीका केली तरी मलाईकाला मात्र त्याची चिंता वाटत नाही. ती खूप फोटोज काढते. बिनधास्त शेअर करते ज्यात तिचे स्ट्रेच मार्क्स अगदी स्पष्टपणे दिसत असतात. मलायकाच्या मते हे स्ट्रेच मार्क्स हे नैर्सगिक आहेत आणि ही गोष्ट प्रत्येक स्त्री सोबत घडते त्यामुळे ही एक सामान्य गोष्ट आहे. यामुळेच मलायकाला या स्ट्रेच मार्क्स बद्दल काहीच तक्रार नाहीये. म्हणून ती टीका करणाऱ्यांकडे अजिबात लक्ष न देता आपली लाईफ मस्त एन्जॉय करते आहे.