[ad_1]
म्हणूनच काही तरुण/तरुणींना ‘आपण विवाहित आहात का?’ असा प्रश्न विचारल्यानंतर ही मंडळी अस्वस्थ होतात. लग्न म्हणजे एक ओझे असा समज करून काही लोक केवळ जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय – बच्चनचे विधान ऐकल्यानंतर लग्नाबद्दलचा आपला विचार कदाचित बदलेल. वैवाहिक जीवनाकडे ती कशा पद्धतीने पाहते, याबाबत तिनं मोठे वक्तव्य केलं होते. (फोटो सौजन्य – इंडिया टाईम्स)
(तरुणी का करतात जोडीदाराला कायमचं ब्लॉक, तुम्हीही करताय ‘या’ मोठ्या चुका? जाणून घ्या कारणे)
’लग्न माझ्यासाठी तडजोड नाही’
ऐश्वर्याने एका मुलाखतीदरम्यान व्यावसायिक आणि खासगी आयुष्याविषयी अनेक रहस्ये उघड केली होती. ‘ऐश्वर्या रायची जी ओळख होती, ती कुठेतरी लग्नानंतर हरवल्यासारखे आपल्याला वाटतं का?’ असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला होता. यावर तिनं उत्तर दिलं की, ‘माझ्या मतानुसार लग्न म्हणजे कोणत्याही प्रकारचा करार नव्हे. माझ्यासाठी हे नाते प्रामाणिकपणे परिपूर्ण आहे. या नात्यावर माझं खूप प्रेम आहे. हे नाते मी अनुभवतेय आणि सर्वांनी लग्न करावे, असा सल्लाही मी देईन’.
ऐश्वर्याच्या विधानावरून हे स्पष्ट दिसतंय की, तिच्यासाठी लग्न म्हणजे अभिमानास्पद बाब आहे तसंच हे एक सुंदर नाते असल्याचंही ती मानते. खरंच जर पती-पत्नीचे नाते प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाने जोडलेले असेल तर वैवाहिक जीवन अधिक सुंदर होते.
लग्न म्हणजे केवळ परंपरा, असे मानू नका
बरेच लोक केवळ यासाठी लग्न करतात कारण हा एक जुना विधि आहे आणि विशिष्ट वयानंतर लग्न करणे गरजेचं मानले जाते. दरम्यान लग्न म्हणजे एकमेकांसोबत सुख-दुःख वाटणे, जीवनाची नवीन सुरुवात करणे आणि बर्याच नवीन गोष्टी शिकणे, इत्यादी. दरम्यान, जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळेही काही लोकांना वैवाहिक जीवन कंटाळवाणे वाटते. पण प्रत्येक क्षणाचा आनंद घेत हे नाते निभावलं तर तुम्हाला नक्कीच एक आनंददायक अनुभव मिळेल.
म्हणूनच जी मंडळी आपल्या जोडीदारास त्यांचा हक्काचा वेळ देतात आणि एकमेकांना गुणदोषांसहीत स्वीकारतात, त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी असते. यामुळे पती-पत्नीमधील वाद-भांडणे कमी प्रमाणात होतात.
विवाहित आहात हे सांगण्यास संकोच वाटू नये
काही जोडप्यांना स्वतःच्या लग्नाची माहिती जाहीरपणे सांगण्यास लाज वाटते. काहींना विवाहित असल्याचं सांगणंही फारसं आवडत नाही. पण असे केल्यानं नात्यातील वाद कमी होणार नाहीत. याऐवजी स्वतःच्या वैवाहिक जीवनातील समस्या कमी करून नातं सुखी व आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
लग्न हे एक अतिशय मजबूत नाते आहे. आपल्या या नात्याची माहिती लोकांना सांगताना संकोच करू नये. जी मंडळी आपले वैवाहिक नाते अभिमानाने सर्वांसमोर स्वीकारतात, त्यांचे लोकांकडून कौतुकही केलं जातं. शेवटी तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये तुमच्या पार्टनरकडूनच पाठिंबा मिळणार आहे, समाजाकडून नव्हे.
आनंदी आयुष्यामुळे लाभते दीर्घायुष्य
पती-पत्नीचं नातं आपल्याला एक चांगला व्यक्ती म्हणून घडवते तसंच जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन देखील बदलतो. बरेच लोक लग्नानंतर आनंदी जीवन जगतात आणि तणावमुक्त सुद्धा होतात. एका संशोधनानुसार लग्नामुळे बरेच फायदे मिळतात, ज्यामध्ये वय हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. अविवाहित लोकांच्या तुलनेत विवाहित मंडळी दीर्घ आयुष्य जगतात तसेच त्यांचे आरोग्य देखील चांगले राहते.
लग्न न केलेल्या लोकांचे आयुष्य एकटेपणामुळे कमी होत जाते, कारण त्यांना भावनिक आधार मिळत नाही. विवाहित लोकांचे जीवन अधिक आनंददायी आणि सुखी असते, असेही आढळलंय.
(‘बालिका वधू’ फेम अविकाने रिलेशनशिपबाबत सांगितली मोठी गोष्ट, ‘त्याच्यामुळे मानसिक आधार मिळाला’)
ऐश्वर्या व अभिषेकचा सुखी संसार
[ad_2]
Source link