Home मनोरंजन aishwarya rai abhishek bachchan love story: ‘प्रेमात मी स्वतःला हरवून बसले होते’, अभिषेकच्या प्रेमात तहान-भूक विसरली होती ऐश्वर्या राय, लोकं प्रेमात इतके वेडे का होतात?

aishwarya rai abhishek bachchan love story: ‘प्रेमात मी स्वतःला हरवून बसले होते’, अभिषेकच्या प्रेमात तहान-भूक विसरली होती ऐश्वर्या राय, लोकं प्रेमात इतके वेडे का होतात?

0
aishwarya rai abhishek bachchan love story: ‘प्रेमात मी स्वतःला हरवून बसले होते’, अभिषेकच्या प्रेमात तहान-भूक विसरली होती ऐश्वर्या राय, लोकं प्रेमात इतके वेडे का होतात?

[ad_1]

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन व्यक्तींना जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत असतो. नात्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तर आपल्या जोडीदाराच्या प्रेमामध्ये काहीजणं स्वतःला हरवून बसतात. प्रेमाच्या नात्यामधील प्रत्येक क्षण अगदी त्यांना हवाहवासा वाटतो. जोडीदाराच्या स्वप्नामध्येच रमताना तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील पाहिलं असेल. त्यांना पाहून प्रेमामध्ये झोप, तहान-भूक विसरणं म्हणजे हेच असतं का? असा प्रश्न देखील तुमच्या मनात आला असणार. पण खरंच काही मंडळी अशी असतात की दिवस-रात्र ते आपल्या जोडीदाराचा विचार करतात.

प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बहुतांश लोकांच्या बाबतीत हे घडतं. आणि हे घडणं अगदी स्वाभाविक आहे. अचानक एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येते आणि आयुष्याला एक नवं वळण मिळतं हे सारं अनुभवत असताना कोणालाही स्वप्नात रमावसं वाटणारच. हे फक्त तुमच्याबाबतीतच नव्हे तर लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीबाबतही घडलं. ही अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. तिच्या लव्हस्टोरीची सुरुवात नेमकी कशी झाली हे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
(फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)

​‘मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडाले होते’

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध जोडप्यांची प्रेमकथा जाणून घेण्यात अनेकांना रस असतो. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने देखील तिच्या आणि अभिषेक बच्चनच्या प्रेमकथेला कशी सुरुवात झाली हे एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं. ऐश्वर्या सांगितलं की, ‘मी ‘जोधा अकबर’ चित्रपटासाठी ‘ख्वाज मेरे ख्वाजा’ गाण्याचं चित्रीकरण करत होते. या गाण्यासाठी मी एखाद्या नववधू प्रमाणे नटली होते. हे शूट करत असताना मला सतत असं वाटत होतं की मी ऑनस्क्रीन नव्हे तर खऱ्या आयुष्यात हे सारं करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी मला त्यावेळी सांगितलं की तुझं मन कुठेतरी हरवलं आहे. आणि त्यानंतर मी भानावर आले. हे सगळं अभिषेकने मला प्रपोज केल्यानंतर घडलं होतं. मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.’ अभिषेकने ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातल्यानंतर ती शूटदरम्यान देखील त्याचाच विचार करू लागली होती.

(‘मी त्याच्याशिवाय तासभरही जगू शकत नाही’ करीनाच्या ‘या’ शब्दांमध्ये तैमूरसाठी दडलंय अतूट प्रेम)

​प्रेमात असंच होतं का?

ऐश्वर्याने पुढे सांगितलं की, ‘मला या शूटिंगदरम्यान जाणवलं की माझं अभिषेकवर किती प्रेम आहे. मी सतत त्याचा विचार करत होते.’ हे फक्त ऐश्वर्याच्या बाबतीतच नव्हे तर प्रेमात पडणाऱ्या इतर लोकांच्या बाबतीतही घडतं. प्रेमामध्ये आपण स्वतःलाच हरवून का बसतो हे कोणालाच फारसं लक्षात येत नाही. आपल्या जोडीदारावर आपण जीवापाड प्रेम करू लागतो. दिवस-रात्र त्याचा विचार करत नवनवीन स्वप्न रंगवतो. बऱ्याचदा प्रेमामध्ये हे असंच घडतं. तुम्ही देखील तुमच्या तरुण वयामध्ये याचा अनुभव घेतला असेल बरोबर ना…

(‘Live In Relationship’दरम्यान मी नात्याबाबत गंभीर झालो’ आमिरवर असा होता किरण रावचा प्रभाव)

​प्रत्येकाच्या मते प्रेमाची व्याख्या वेगळी

प्रत्येकाचा मते प्रेमाची व्याख्या ही वेगवेगळी असते. कोणी न बोलता आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतं तर कोणी जोडीदारावर आपलं किती प्रेम आहे हे बोलण्यातून व्यक्त करतात. प्रेमामध्ये काहीजणं डोक्याने विचार न करता फक्त मनाने प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. काही अभ्यासामधूनही ते सिद्ध झालं आहे. आपली आवडती व्यक्ती आपल्याबरोबर असेल तर तो क्षण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. ऐश्वर्या देखील अभिषेकच्या प्रेमात आकंठ बुडालेली असताना सतत त्याचाच विचार करणं, स्वप्न पाहणं हे तिच्याबाबतीतही घडलं.

(‘संसार मांडायचा नव्हता’ साखरपुड्यानंतर या हॉट अभिनेत्रीचं नातं मोडलं, काय होतं कारण)

​विज्ञान काय सांगतं?

प्रेमामध्ये बहुतांश लोकं डोक्याने नव्हे तर मनाने विचार करण्यास सुरुवात करतात. प्रेमाच्या नात्यामध्ये भावनात्मक पद्धतीने विचार केला जातो. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करत असाल तर काही निर्णय घेत असताना तुम्ही तुमच्या मनाचं पहिलं ऐकता. एका अभ्यासानुसार, तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडलात तर तुमची निर्णय घेण्याची क्षमता थोडीफार कमकुवत होते. यामागचं कारण म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीबाबत भावनात्मक विचार करून आपण प्रत्येक निर्णय घेतो.

(…अन् होत्याचं नव्हतं झालं, लग्न केलं मात्र ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री सुखात राहू शकली नाही, किती तरी जोडप्यांना करावा लागतो या समस्येचा सामना?)

​वागणूकीमध्ये बदल

प्रेम ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुमच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये बदल घडतात. एखाद्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आपण सतत राहिलो की त्याच्या सारखेच विचार तुम्ही करू लागता. जोडीदाराप्रती आपुलकी, काळजी, आदर, सन्मान असला की नातं अधिक खुलत जातं. नात्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तर जोडीदार सतत आपल्या बरोबर असावा असं अनेकांना वाटतं. आवडती व्यक्ती आपल्या बरोबर नसली की तुम्ही अस्वस्थ देखील होता. यादरम्यान तुम्हाला तुमच्यामध्ये अनेक बदल झालेले जाणवतात.

(घर शाहरुख खानचं राज्य मात्र सासूचं! आजही मन्नत बंगल्याचा ‘रिमोट कंट्रोल’ सांभाळते ‘ही’ व्यक्ती, हिच आहे सासूची खरी ताकद)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here