Home मनोरंजन Aishwarya Rai Abhishek Bachchan Marriage Tips: ‘लोक लग्नाची चेष्टा करतात’ ऐश्वर्याशी लग्न केल्यानंतर अभिषेकने केला टोमण्यांचा सामना, समाजाचा दृष्टीकोन कधी बदलणार?

Aishwarya Rai Abhishek Bachchan Marriage Tips: ‘लोक लग्नाची चेष्टा करतात’ ऐश्वर्याशी लग्न केल्यानंतर अभिषेकने केला टोमण्यांचा सामना, समाजाचा दृष्टीकोन कधी बदलणार?

0

[ad_1]

पती-पत्नीच्या नात्याला समाजातील अशा काही वाईट लोकांच्या विचारसरणीचाही सामना करावा लागतो, ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता असते. दोन व्यक्ती त्यांचे नाते दीर्घकाळ टिकून राहावे यासाठी कितीही प्रेम, माया, काळजी आणि प्रयत्न करत असले तरीही समाजातील एक गट नेहमीच जोडप्याच्या नातेसंबंधांमध्ये दोष शोधत असतात. जेव्हा पत्नी पतीपेक्षा अधिक पैसे कमावत असते किंवा ती प्रत्येक बाबतीत जोडीदारापेक्षा अधिक चांगली असते, तेव्हा लोकांकडून त्यांच्या नात्यात वाद निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.

अशा वेळी बहुतांश लोक वाईट प्रतिक्रिया देण्यासही अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. उदाहरणार्थ ‘तो तिच्या लायक नव्हता… कोणी तरी चांगला व्यक्ती भेटला असता… आईवडिलांनी पण काय व्यक्ती शोधला आहे…’ इत्यादी. ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai – Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे देखील असेच एक जोडपे आहे, ज्यांना लग्नानंतर एकदा – दोनदा नव्हे तर बर्‍याचदा अशा परिस्थितींचा सामना करावा लागला. (फोटो सौजन्य -इंडिया टाइम्स)
(‘रणबीरसारखे लोक मी आजपर्यंत पाहिले नाहीत’ असं का म्हणाली आलिया भट, जीवनात नेमके बदललेय तरी काय?)

​’लोक लग्नाची खिल्ली उडवतात’

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘आपले लग्नाचं नाते मजबूत ठेवण्यासाठी काय करतात? यावर अभिनेत्रीनं उत्तर दिलं की, ‘स्वत: वर विश्वास ठेवा आणि आपल्या मनाचे ऐका. सर्वप्रथम तुम्हीच स्वतःचे सच्चे मित्र आहात, हे आपण लक्षात घ्यावे. प्रत्यक्षात सर्वकाही अनुभवा आणि त्यासह आयुष्यात पुढे जा’.

ऐश्वर्याचे बोलणे संपताच अभिषेकने म्हटलं की, ‘द्वेष करणाऱ्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. लोक लग्नाची चेष्टा करतात, पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ही गोष्ट खूप चांगली आहे. आपल्या जोडीदारावर ५०० टक्के विश्वास ठेवा. पण तुम्हाला वाटत असेल की भविष्यात तुमचे एकमेकांसोबत जुळणार नाही तर मग लग्नाचा विचार करू नका’. लग्नाचे नाते मजबूत राहावे यासाठी भलेही अभिषेकने लोकांना सल्ला दिला. पण त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसत आहे त्यालाही लोकांच्या टोमण्यांचा प्रचंड सामना करावा लागला होता.

(‘आनंदमध्ये दिसते माझीच छबी’, मुकेश अंबानींकडून जावयाचं कौतुक, वडिलांना मुलीसाठी हवा असतो असाच पती)

​’लोक काय म्हणतील…’ हा विचार निरर्थक

ऐश्वर्या-अभिषेक असो किंवा करीना-सैफ, आजच्या काळात सुखी वैवाहिक जीवन जगणाऱ्या जोडप्यांचा अपमान करणार्‍यांची संख्या कमी नाहीय. करीनाने देखील तिच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘जेव्हा-जेव्हा सैफशी लग्न करण्याचा विचार करत होते, तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याच्याशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता … तो एक चांगला माणूस नाही.’ पण करीनाने स्वतःच्या मनाचे ऐकले आणि निरर्थक गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःचे नातेसंबंध अधिक मजबूत केले.

ऐश्वर्यानेही गौप्यस्फोट केला होता की, ‘आता या सर्व गोष्टींची सवय झाली आहे. अशा परिस्थितीत कसे सामोरे जायचे, हे चांगले माहीत आहे’. यानंतरही आपल्याला असे वाटत असेल की तुम्ही दोघे एकमेकांसाठी परफेक्ट नाही, तर मग तुम्हाला आपल्या नात्याकडे खरोखरच लक्ष देणे आवश्यक आहे.

(जेव्हा आमिरने किरणचं केलं तोंडभर कौतुक, असा जोडीदार मिळाल्यानंतरही जोडपी का होतात विभक्त?)

नात्यावर होऊ नये दुष्परिणाम

लोक तुमच्या नात्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी पसरवत असतील तर या सर्वांचा आपल्या नात्यावर दुष्परिणाम होऊ देऊ नका. तसंच गोष्टी संयमाने कशा हाताळाव्यात, हे देखील समजून घ्या. जेणेकरून तुमचे नाते मजबूत होण्यास मदत मिळेल. भारतीय संस्कृतीची समस्या हीच आहे की पतीपेक्षा अधिक कमावणारी किंवा सुशिक्षित असलेली पत्नी लोकांच्या नजरेत खुपते. यामुळेच लोक निरर्थक गोष्टी बोलू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही दोघे एकत्रित किती आनंदी आहात याचा विचार सर्वप्रथम करा आणि नातं अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा. अभिषेकनेही बऱ्याचदा अशा गोष्टींचा सामना केला आहे पण त्याला माहिती या सर्वांना सडेतोड उत्तर कसे द्यायचे.

(‘संसार मांडायचा नव्हता’ साखरपुड्यानंतर या हॉट अभिनेत्रीचं नातं मोडलं, काय होतं कारण)

​अभिषेकने दिलं असं उत्तर

अलीकडेच एका युजरने अभिनेत्याच्या पोस्टवर त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारत म्हटलं की, ‘तुम्ही कोणत्याही कामासाठी चांगले नाहीत. तुमच्याकडे एक सुंदर पत्नी आहे आणि म्हणूनच मी तुमचा द्वेष करतो. आपण पात्र देखील नाहीत’. यावर अभिनेत्यानं उत्तर दिले, ‘ठीक आहे, तुमच्या मताबद्दल धन्यवाद.’ अभिषेकच्या या प्रतिक्रियेवरून स्पष्ट दिसतंय की तिसऱ्या व्यक्तीमुळे तो स्वतःचे नाते बिघडवणार नाही.

(‘मी त्याच्याशिवाय तासभरही जगू शकत नाही’ करीनाच्या ‘या’ शब्दांमध्ये तैमूरसाठी दडलंय अतूट प्रेम)

​दुरावा निर्माण करणं योग्य नव्हे

जी लोक तुमच्या नात्याबाबत काहीही बरळत असतात, त्यांना आयुष्यात काढून टाकण्याचा निर्णय योग्य असतो; असा अनेकांचा समज आहे. पण खरंतर असे वागणे मुळीच योग्य नव्हे. याच कारणामुळे लोकांना तुमच्या नातेसंबंधाबाबत अधिक बोलण्याची आयती संधी मिळते. अडचणींचा उघडपणे सामना करा आणि आवश्यकता असेल तेथे न घाबरता उत्तर द्यायला शिका.

कारण तुमच्या जोडीदाराला तुमच्याबाबत नेहमीच खात्री असते की तुम्ही त्याच्या/तिच्याशिवाय देखील स्वतःची बाजू भक्कमपणे मांडणार. जेव्हा-जेव्हा अभिषेकला ऐश्वर्याबाबत निरर्थक प्रश्न विचारले जातात तेव्हा हा अभिनेता उत्तर देण्यास अजिबात संकोच व्यक्त करत नाही, ही बाब दोघांमधील नातेसंबंध किती दृढ आहेत हे सांगण्यासाठी पुरेशी आहे.

(‘दीया और बाती हम’च्या संध्या बींदणीने उद्योगपतीशी का केलं लग्न, बहुतांश तरुणींच्या मनात असेच असतात विचार)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here