Home मनोरंजन ऐश्वर्या रायनं बोल्ड ब्लाउजसह घातला मोहक लेहंगा, हॉट स्टाइलमध्ये आलिया-सारालाही दिली तगडी स्पर्धा

ऐश्वर्या रायनं बोल्ड ब्लाउजसह घातला मोहक लेहंगा, हॉट स्टाइलमध्ये आलिया-सारालाही दिली तगडी स्पर्धा

0
ऐश्वर्या रायनं बोल्ड ब्लाउजसह घातला मोहक लेहंगा, हॉट स्टाइलमध्ये आलिया-सारालाही दिली तगडी स्पर्धा

शासननामा न्यूज ऑनलाईन

​ऐश्वर्याचा लुक होता आकर्षक

ऐश्वर्या राय – बच्चनने वर्ष २०१९मध्ये मध्ये प्रसिद्ध फॅशन डिझाइनर फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांच्या मासिकासाठी फोटोशूट केले. यासाठीन तिनं शिमरी लेहंग्याची निवड केली होती. ऑफ शोल्डर पॅटर्न मॅचिंग ब्लाउज आणि फेदर डिटेलिंग दुपट्टा असलेल्या या आउटफिटमध्ये ऐश्वर्या खूपच ग्लॅमरस दिसत होती. तसंच लेहंग्याचे कलर-कॉम्बिनेशन आणि वेगवेगळ्या पॅटर्नमधील वजनदार भरतकाम व ट्रेल लेदर वर्कमुळे या अभिनेत्रीला एक वेगळाच लुक मिळाला होता.

​लेहंग्याचं डिझाइन होतं प्रचंड सुंदर

ऐश्वर्या राय बच्चनने घातलेल्या पीच कलरचा लेहंगा फाल्गुनी शेन पीकॉकने डिझाइन केला होता. या पोषाखात वजनदार सीक्वेंस वर्क करण्यात आलं होतं, ज्यात रेशीमच्या धाग्यांसह सुंदर एम्ब्रॉयडरी वर्कही करण्यात आलंय. हा लेहंगा वजनाने जड होता. यावर फ्लोरल मोटिफ्ससह छोट्या-छोट्या पानांचे डिझाइन सुद्धा काढण्यात आलं होतं. लेहंग्याच्या हेमलाइनवर एक रूंद बॉर्डर सुद्धा जोडण्यात आली होती, यामुळे ड्रेसला चमकदार लुक मिळालाय. या ए-लाइन लेहंग्याचे फॅब्रिक प्रचंड पातळ होते, म्हणून यामध्ये मॅचिंग इनर जोडण्यात आलं होतं.

​लेहंग्यावरील आकर्षक दुपट्टा

ऐश्वर्याच्या आउटफिटमध्ये मॉडर्न टच देण्यासाठी ब्लाउजला ऑफ शोल्डर लुक देण्यात आला होता. तिनं परिधान केलेल्या चोळीमध्ये डीप स्वीट हार्ट नेकलाइन डिझाइन आपण पाहू शकता. यावर मण्यांचे आकर्षक वर्क करण्यात आलं आहे. एकूणच पोषाखास परफेक्ट लुक मिळावा यासाठी ब्लाउजसह फेदर डिटेलिंग असणारा दुपट्टा जोडण्यात आला होता. या दुपट्ट्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.

दरम्यान ऐश्वर्याने या आउटफिटवर आकर्षक मेकअप केला होता. डार्क टोन मेकअपसह तिनं डायमंड चोकर, स्टेटमेंट रिंग असे दागिने परिधान केले होते. स्ट्रेट स्लीक हेअरस्टाइलमुळे तिला प्रचंड सुंदर व आकर्षक लुक मिळालाय.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here