Home मनोरंजन alia bhatt ranbir kapoor relationship: ‘रणबीरसारखे लोक मी आजपर्यंत पाहिले नाहीत’ असं का म्हणाली आलिया भट, जीवनात नेमके बदललेय तरी काय?

alia bhatt ranbir kapoor relationship: ‘रणबीरसारखे लोक मी आजपर्यंत पाहिले नाहीत’ असं का म्हणाली आलिया भट, जीवनात नेमके बदललेय तरी काय?

0

[ad_1]

प्रेम ही अशी भावना आहे, ज्यामुळे एखादी व्यक्ती पूर्णपणे बदलते. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीसाठी विशेष भावना जाणवू लागतात आणि त्याला/तिला पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाची धडधडही वाढते, तेव्हा समजून जा मित्रांनो तुम्ही आकंठ प्रेमात बुडालेले आहात. या काळात तुम्हाला प्रत्येक गोष्ट छान आणि सुंदरच दिसते. तुम्ही त्या खास व्यक्तीच्या विचारांमध्येच गुंतलेले असता. याच कारणामुळे प्रेमात पडल्यानंतर बहुतांश मंडळी आपले आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करतात.

पण जर आपण आपले नाते योग्य पद्धतीने सांभाळू न शकल्यास ब्रेकअपमुळे होणाऱ्या यातना देखील त्रासदायक असतात, हे लक्षात ठेवा. ब्रेकअप ही गोष्ट देखील तुम्हाला व तुमच्या जीवनामध्ये बरेच बदल घडवते. प्रेम ही एक अशी भावना आहे, ज्यामध्ये आनंद व दुःख दोन्ही गोष्टींचा अनुभव येतो. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटनेही एकदा रणबीर कपूरबद्दल (Ranbir Kapoor) असेच काहीतरी सांगितलं होते, जाणून घेऊया सविस्तर… (फोटो सौजन्याने – इंडिया टाइम्स)
(‘आनंदमध्ये दिसते माझीच छबी’, मुकेश अंबानींकडून जावयाचं कौतुक, वडिलांना मुलीसाठी हवा असतो असाच पती)

​’रणबीरसारखे लोक पाहिले नाहीत’

आलिया भटने एका मुलाखतीदरम्यान आपल्या लव्ह लाइफबाबत सांगताना ‘मन की बात’ व्यक्त केली होती. तिनं सांगितलं की, ‘मी माझ्या आयुष्याच्या या टप्प्यामध्ये त्याच्या जवळ राहणे म्हणजे स्वतःला खूप भाग्यवान समजते. रणबीरच्या वर्तनामुळे तो एक वेगळाच व्यक्ती ठरतो. माझ्या आयुष्यात आजपर्यंत मी रणबीरसारख्या लोकांना पाहिले नाही’. केवळ आलिया भटच नव्हे तर प्रेमात असणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियकराची अशीच स्तुती करते.

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेले असता, तेव्हा तुम्हाला त्याच्या/तिच्या सर्वच गोष्टी आवडू लागतात. सुरुवातीच्या टप्प्यात आपणाला केवळ जोडीदारामध्येच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगलेच गुण दिसू लागतात. प्रेमाची भावना इतकी गोड असते की तुम्ही त्यात हरवले जाता, कारण हृदय व मनावर पूर्णपणे प्रेमाने ताबा घेतलेला असतो.

(जेव्हा आमिरने किरणचं केलं तोंडभर कौतुक, असा जोडीदार मिळाल्यानंतरही जोडपी का होतात विभक्त?)

​एकमेकांपासून मिळते शिकवण

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत नातेसंबंधांमध्ये असता, त्यावेळेस आपल्यात व पार्टनरमध्ये बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या असतात. दोन भिन्न व्यक्ती एकत्र राहू लागल्यानं आपल्याला एकमेकांमधील कमतरता, उणीवा सुधारण्याची संधी मिळते. याचा अर्थ आपण आपल्या जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करावा, असे मुळीच नव्हे. पण खरंच एखादी गोष्ट बदलण्याची गरज असेल तर जोडीदाराच्या मदतीने तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू शकता.

दरम्यान प्रत्येक वेळेस प्रेमाच्या नात्याचा शेवट चांगलाच होईल, असे मुळीच नव्हे. कारण कधीकधी जोडीदारांना ब्रेकअपलाही सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत जेव्हा आपण ब्रेकअपच्या यातनांमधून बाहेर पडता, त्यावेळेस बरेच काही शिकायला मिळते. भूतकाळातील चुकांमुळे तुम्हाला चांगले-वाईट अनुभव येतात, यानुसार आता आपले नातेसंबंध कसे कसे हाताळावे, याची चांगलीच समज प्रत्येकाला येते.

(‘संसार मांडायचा नव्हता’ साखरपुड्यानंतर या हॉट अभिनेत्रीचं नातं मोडलं, काय होतं कारण)

​एकटेपणा दूर होतो

लहानपणापासूनच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असंख्य लोकांचा समावेश असतो, उदाहरणार्थ पालक, बहीण-भाऊ आणि मित्र इत्यादी. या लोकांसोबत आपण आपल्या मनातील कित्येक गोष्टी शेअर करत असतो. पण तरीही आपणाला आयुष्यात कधीकधी एकटेपणा जाणवू लागता. काही वेळाने तुम्हाला जोडीदाराची कमतरताही भासू लागते. ज्यांच्यासोबत आपण छोट्या-मोठ्या सर्वच गोष्टी शेअर करू शकता. अशा परिस्थितीत जेव्हा तुमच्या आयुष्यात प्रेम येते, तेव्हा जोडीदाराबद्दल तुमच्या मनात वेगळ्याच भावना असतात. ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतोच, पण हृदय व मनाला शांती देखील लाभते. एखाद्या अडचणीत अडकल्यानंतर आपण सर्वप्रथम जोडीदाराला त्याची माहिती देता. प्रत्येक सुखदुःखात तुम्हाला जोडीदाराची सोबत असते.

(‘मी त्याच्याशिवाय तासभरही जगू शकत नाही’ करीनाच्या ‘या’ शब्दांमध्ये तैमूरसाठी दडलंय अतूट प्रेम)

​​चांगले किंवा वाईट

प्रेम ही एक अशी भावना आहे, जी एखाद्या व्यक्तीला दोन मार्गांवर घेऊन जाऊ शकते. जर तुमच्या आयुष्यात चांगला जोडीदार असेल तर तुम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून घडता. काळानुसार तुमच्यात बरेच बदल घडू लागतात. हे केवळ प्रेमामुळेच नव्हे तर जोडीदाराचे विचार आणि सवयींचाही आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो. जोडीदाराला पाहून आपण बऱ्याच गोष्टी शिकता, जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोनही बदलू लागतो. चूक – बरोबर यातील फरक तुम्हाला समजतो.

(‘दीया और बाती हम’च्या संध्या बींदणीने उद्योगपतीशी का केलं लग्न, बहुतांश तरुणींच्या मनात असेच असतात विचार)

​व्यावसायिक जीवनावरही होतात दुष्परिणाम

तर दुसरीकडे तुमच्या आयुष्यात एखादा असा व्यक्ती आला, ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे, तर मग तुमच्यात वाईट बदल घडण्यास वेळ लागत नाही. जोडीदाराने केलेल्या फसवणूकीमुळे मनाला खूप त्रास होतोच, पण दुसऱ्यांवर विश्वास ठेवणंही कठीण होते. या सर्व गोष्टींमुळे आपल्या व्यावसायिक जीवनावरही परिणाम होण्यास सुरुवात होते. ब्रेकअपनंतर बहुतांश लोकांना वाईट सवयी लागतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा प्रेमामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा सामना करावा लागला तरीही आपल्याला एक चांगला व्यक्ती म्हणूनच आयुष्य जगायचे आहे, हीच भावना अधिक महत्त्वाची असते.

(‘अक्षयला ती आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती’ रेखाबद्दल रवीनाचे विधान! जाणून घ्या दोघांत तिसरा व्यक्ती कसा येतो?)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here