Home मनोरंजन Alia Bhatt Reveals she is not possessive girlfriend and how to deal with possessiveness in relationships – ‘रणबीरला मी विकत घेतलेलं नाही’, जेव्हा आलियाच्या रागाचा पारा चढला, कोणत्याही पार्टनरला आवडत नाहीत ‘या’ गोष्टी | Maharashtra Times

Alia Bhatt Reveals she is not possessive girlfriend and how to deal with possessiveness in relationships – ‘रणबीरला मी विकत घेतलेलं नाही’, जेव्हा आलियाच्या रागाचा पारा चढला, कोणत्याही पार्टनरला आवडत नाहीत ‘या’ गोष्टी | Maharashtra Times

0
Alia Bhatt Reveals she is not possessive girlfriend and how to deal with possessiveness in relationships – ‘रणबीरला मी विकत घेतलेलं नाही’, जेव्हा आलियाच्या रागाचा पारा चढला, कोणत्याही पार्टनरला आवडत नाहीत ‘या’ गोष्टी | Maharashtra Times

[ad_1]

प्रेम, नाते आणि लग्न हे एक असे नातं आहे, जेथे काही लोक स्वतःला परफेक्ट सिद्ध करण्याचा भरपूर प्रयत्न करतात. तर काही लोकांच्या जोडीदाराकडून अपेक्षाही वाढतात. बदलत्या काळानुसार नात्याचा अर्थही बदलत जातो. पण आपापसातील वाद-भांडणे आणि विभक्त होण्याचा घाईने घेतलेल्या निर्णयामुळे सुखी नात्यावर दुष्परिणाम होतातच. तसंच चांगल्या नात्यामध्ये मतभेदही निर्माण होतात. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटनेही (Alia Bhatt) आपल्या नात्यात या सर्व गोष्टींचा सामना केला.

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचं नातं जास्त काळ टिकणार नाही, असाच दावा बहुतांश लोकांनी केला होता. पण नाते सार्वजनिक करण्यापासून ते एकमेकांना पाठिंबा देण्यापर्यंत, आलिया व रणबीर दोघेही एकमेकांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहिलेले दिसले. तसंच रणबीरचा भूतकाळ व त्याच्या वर्तनाविषयी जेव्हा चर्चा केली जाते, त्यावेळेस आलिया बिनधास्तपणे उत्तरं देताना दिसते. रणबीर व आलियामध्ये वाद झाल्याची माहिती जेव्हा समोर आली होती, त्यावेळेसही आलियाचे असेच काहीसे रूप पाहायला मिळाले होते.
(फोटोज- इंडिया टाइम्स)

​‘मी रणबीरला विकत घेतलेलं नाही’

‘गली बॉय’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान आलिया आणि रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये हे कपल एकमेकांवर रागावलेले वाटत होतं. हा व्हिडीओ समोर येताच त्यांच्या नात्यातील वाद आणि ब्रेकअपच्या गोष्टीही समोर येऊ लागल्या. आलियाच्या सतत येणाऱ्या फोन-मेसेजमुळे रणबीर कंटाळाला होता, असे काही लोकांचं म्हणणं होतं. आलिया अजिबातच स्पेस देत नसल्याचं रणबीरला वाटत होतं, अशी माहिती समोर आली होती.

(तरुणी का करतात जोडीदाराला कायमचं ब्लॉक, तुम्हीही करताय ‘या’ मोठ्या चुका? जाणून घ्या कारणे)

​आलियानं दिलं उत्तर

या प्रकरणावर आलियानं एका मुलाखतीत सांगितलं की, ‘मी अजिबात पझेसिव्ह गर्लफ्रेंड नाहीय. मी नेहमीच रणबीर स्पेस देण्याचं काम केलंय. मी त्याला विकत घेतलेलं नाहीय. आमच्या नात्याव्यतिरिक्त अन्य नातेसंबंधांचाही आदर केला जावा, हीच आमची एकमेकांकडून अपेक्षा आहे’.

दरम्यान मुलींना जास्तीत जास्त काळजी करणारा प्रियकर आवडतो. पण पुरुषांचं गणित पूर्णतः उलट असते. बंधने लादणाऱ्या मुली बहुतांश मुलांना पसंतच नसतात. निर्बंध लादणाऱ्या मुलींसोबत नात्यात राहणं त्यांना फारसं आवडत नाही. जोडीदाराची जास्त काळजी करणं तसंच त्यावर अधिकार गाजवणे कधी-कधी चांगलं वाटतं पण जेव्हा या गोष्टी अति प्रमाणात होतात, तेव्हा फार त्रासदायक ठरतात.

(‘पैशांसाठी वृद्धासोबत केलं लग्न’ जय मेहतांशी विवाह केल्यानंतर जुहीला ऐकावे लागले असे टोमणे, वयातील अंतरामुळे नात्यात पडतो फरक?)

​या गोष्टींमुळे नात्यात येऊ लागतो तणाव

एखाद्या नात्यात असताना जोडीदाराला मुक्त कसं ठेवावे, याचं गणित काही लोकांना कळत नाही. नात्याच्या सुरुवातीस पार्टनरवर नियंत्रण ठेवणं एकमेकांना आवडतं, पण नंतर या गोष्टीचा कंटाळा येऊ लागतो. आपल्या प्रेयसीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिल्यानंतर काही पुरुषमंडळी जास्त प्रमाणात पझेसिव्ह होतात.

प्रेयसीवर वाईट प्रकारे संशय घेऊ लागतात. तर मुलींना जोडीदाराचे मिनिटामिनिटांचे अपडेट जाणून घेण्याची इच्छा असते. दरम्यान, एकमेकांबद्दल माहिती असणे चुकीचे नाही. पण या गोष्टींचा जेव्हा अतिरेक होऊ लागतो त्यावेळेस त्रासाचाच सामना करावा लागतो.

(‘अर्पिता खानसोबत होतं गंभीर नातं… सारं ठीक होते’ अर्जुन कपूरचा गौप्यस्फोट, पहिले प्रेम अधुरंच का राहते?)

​ताब्यात ठेवण्याच्या प्रयत्नामुळे नेहमी दुःखच मिळतं

असुरक्षिततेची भावना कोणत्याही व्यक्तीस अडचणीत आणू शकते. काही जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जोडीदाराला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात, जे पूर्णपणे चुकीचं आहे. आपला जोडीदार आपल्यापासून दूर होऊ नये, म्हणून त्याला ताब्यात ठेवणं पूर्णतः अयोग्य आहे. आलियानं देखील रणबीरसोबतच्या नात्याप्रति आपण पझेसिव्ह नसल्यासं स्पष्ट केलं होतं.

(‘ऐश्वर्यामुळे माझ्या भावाची अशी अवस्था झाली’ सोहेलच्या रागाचा उडला होता भडका! वचन अपूर्ण राहिल्यास वाढतो द्वेष)

तज्ज्ञमंडळींचं मत

प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट तृप्ती जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलांचे संगोपनच असं झालेलं असतं की त्यांना कोणाच्याही नियंत्रणात राहणं पसंत नसते. म्हणूनच त्यांना निर्बंध लादणाऱ्या नात्याचा कंटाळा येऊ लागतो. पण मुलींवर नियंत्रण ठेवले जाते. याच कारणास्तव एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्यांच्या मनात असुरक्षितता वाढते. म्हणून नात्याला जास्तीत जास्त वेळ देऊन ते मजबूत करण्याचा प्रयत्न मुलींकडून केला जातो.

मुलींसाठी प्रेम म्हणजे त्यांचं संपूर्ण जग होऊन जाते. पण मुलांच्या बाबतीत असे घडत नाही. त्यांच्या आयुष्यात करिअर, मित्र-मैत्रिणी, मौज-मजा यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. अशा परिस्थिती मुलींकडून त्यांच्या खासगी आयुष्यात लुडबुड केली जाते, त्यावेळेस ही मंडळी त्या नात्यापासून पळण्याचा प्रयत्न करतात.

(‘बालिका वधू’ फेम अविकाने रिलेशनशिपबाबत सांगितली मोठी गोष्ट, ‘त्याच्यामुळे मानसिक आधार मिळाला’)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here