[ad_1]
अलिकडेच अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन नवा हेअर कटचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत असताना अनुष्काने म्हटलं की, ‘डिलिव्हरीनंतर केस गळत असल्यामुळे हेअर कट करावा लागला.’ केस गळतीमुळे अनुष्काने आपल्या लुकमध्ये बदल केला. बऱ्याच स्त्रियांना देखील डिलिव्हरीनंतर केस गळतीच्या समस्येला सामोरं जावं लागतं. केस गळती थांबावी म्हणून बहुतांश स्त्रिया विविध उपाय करतात. पण घरगुती पद्धतीचा वापर करून केस गळती कशी थांबवावी हे आम्ही तुम्हाला या लेखाच्या आधारे सविस्तर स्वरुपात सांगणार आहोत.
अनुष्काचा नवा हेअर कट
केस का गळतात?
प्रेग्नेंसीदरम्यान स्त्रियांचे केस घनदाट आणि चमकदार होतात. यादरम्यान ९० टक्के केसांची वाढ होत असते. मात्र रेस्टिंग फेजनंतर केस गळण्यास सुरुवात होते आणि त्याजागी नवीन केस येण्यास सुरुवात होते. प्रेग्नेंसीदरम्यान केस रेस्टिंग फेजमध्ये असतात. त्यामुळे तुमचे केस जाड आणि घनदाट दिसू लागतात. मात्र डिलिव्हरीनंतर रेस्टिंग फेजमधील केस गळण्यास सुरुवात होते. प्रेग्नेंसीनंतर एस्ट्रोजन पातळी नियंत्रणात येते. त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना केस गळतीच्या समस्येला सामोर जावं लागतं. डिलिव्हरीनंतर ३ ते ६ महिने केस गळती ही समस्या स्त्रियांना सतावते.
काय खाल्लं पाहिजे?
प्रेग्नेंसीदरम्यान स्त्रिया आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देतात. मात्र प्रेग्नेंसीनंतर मुलांचा सांभाळ करत स्त्रिया आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात. पण डिलिव्हरीनंतर देखील शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होईल अशा खाद्यपदार्थांचे सेवन करणं गरजेचं आहे. यामुळे केस गळतीची समस्याही दूर होण्यास मदत मिळू शकते. डिलिव्हरीनंतर भरपूर पाणी आणि द्रव्य पदार्थांचे सेवन करा. तसेच आहारामध्ये फळं, हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, फ्लेक्ससीड्स, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असू द्या. यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्त्वांचा पुरवठा होईल.
(प्रेग्नेंसीनंतर वेट लॉसदरम्यान महिला करतात ‘या’ मोठ्या चूका, अति घाई आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक)
मेथीचे दाणे
केस गळतीवर सर्वात रामबाण उपाय म्हणजे मेथीचे दाणे. मेथीच्या दाण्यांचा केसांसाठी वापर केल्यामुळे तुमची केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. रात्रभर पाण्यामध्ये मेथीचे दाणे भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी काही तासांसाठी केसांना लावून ठेवा. त्यानंतर केस शॅम्पूने स्वच्छ धूवा. आठवड्यामधून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. याव्यतिरिक्त मेथीचे दाणे पाण्यात भिजल्यानंतर तुम्ही त्याची पेस्ट तयार करून केसांना लावू शकता. ही पेस्ट केसांना जवळपास २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ धूवा.
दही
केस गळती थांबावी म्हणून तुम्ही अनेक महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करत असाल. पण त्यापूर्वी काही घरगुती पद्धतींचा वापर करणं देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. दही देखील तुम्ही तुमच्या केसांसाठी वापरु शकता. दही केसांवर कंडिशनर सारखं कार्य करते. दहीने केसांना मसाज केल्यास केस मजबूत होतात तसेच नवीन केस देखील येऊ लागतात. आठवड्यामधून एक ते दोन वेळा केसांना १५ मिनिटे दही लावा. त्यानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून टाका.
(‘या’ बेबी फूडमुळे झटपट वाढेल मुलांची उंची व वजन, पोटांचे विकारही मिनिटांमध्ये होतील दूर)
घरीच तयार करा हेअर मास्क
घरगुती पद्धतीने तयार केलेला हेअर मास्क केसांसाठी अधिक फायदेशी ठरू शकतो. हेअर मास्क तयार करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे
– एक शिजवलेला एव्होकाडो घ्या
– शिजवलेला एव्होकाडो स्मॅश करा
– यामध्ये एक चमचा नारळाचं दूध मिक्स करा
– हा तयार हेअर मास्क केसांना लावा
– हेअर मास्क केसांवर पूर्णपणे सुकू द्या
– त्यानंतर नॅचरल हेअर शॅम्पूने केस स्वच्छ धूवा
एव्होकोडामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिनचा समावेश असतो. तसेच नारळाच्या दुधामध्ये समाविष्ट असलेल्या प्रोटीनमुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते.
(स्त्री असो वा पुरुष, दोघांची फर्टिलिटी दुप्पट करतो ‘हा’ खास पदार्थ, खाण्याचा आहे अनोखा नियम!)
हेअर कट
डिलिव्हरीनंतर तुमचे केस गळत असतील किंवा तुम्हाला एखादा फ्रेश लुक हवा असेल तर अनुष्काप्रमाणे तुम्ही देखील हेअर कट करू शकता. केस गळत असल्यामुळे अनुष्काने देखील हेअर कट करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा नवा लुक आणि हेअर कट नेटकऱ्यांच्या देखील चांगलाच पसंतीस पडला. तुम्ही देखील हेअर कटचा पर्याय निवडू शकता. हेअर कटमुळे केस गळतीची समस्या जाणवत नाही. तसेच केस देखील घनदाट दिसू लागतात.
(आई-बाबा बनण्यात सतत येतंय अपयश? मग आधी ‘ही’ माहिती जाणून घ्या नंतर ट्राय करा!)
[ad_2]
Source link