[ad_1]
दरम्यान प्रत्येकाचे अनुभव एकसारखेच असतील, असे मुळीच नाही. काही जण प्रेमात एकमेकांना कधीही अंतर न देण्याचे, त्रास न देण्याचे असे अनेक वचन देतात. पण एका क्षणात नाते तुटते, तेव्हा खूप यातना होतात. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबतही घडले होते. काही वर्षांपूर्वी अर्जुनचं सलमान खानची बहीण अर्पिता खानसोबत ब्रेकअप झाले. अर्जुननं सांगितलेल्या माहितीनुसार, ‘अर्पितासोबत नातेसंबंध खूप गंभीर होतं, अचानक एकेदिवशी ब्रेकअपचा सामना करावा लागला’
(‘पैशांसाठी वृद्धासोबत केलं लग्न’ जय मेहतांशी विवाह केल्यानंतर जुहीला ऐकावे लागले असे टोमणे, वयातील अंतरामुळे नात्यात पडतो फरक? )
’मी अर्पितासोबतच्या नात्याप्रति गंभीर होतो’
अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या नात्याबाबत कोणती-न्-कोणती चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. पण कोणे एकेकाळी अर्जुन दबंग सलमानची बहीण अर्पिता खानच्या प्रेमात अक्षरशः आकंठ बुडला होता. नात्यामध्ये दुरावा निर्माण होईल, याचा विचार दोघांनीही केला नव्हता. ब्रेकअपनंतर एका मुलाखतीदरम्यान अर्जुनने सांगितलं होतं की, ‘अर्पितासोबत असलेल्या नात्याकडे मी फार गांभीर्यानं पाहत होतो. वयाच्या १८व्या वर्षी आमच्यात प्रेमाचे नाते निर्माण झाले आणि दोन वर्षांपर्यंतच हे नातं टिकलं. संपूर्ण खान कुटुंबीयांनीही आमचे नाते स्वीकारलं होतं, सलमान खानने देखील मला पाठिंबा दर्शवला होता’.
‘सारं काही ठीक सुरू होतं, अचानक…’
आपले म्हणणे मांडत अभिनेत्याने पुढे असंही सांगितलं की,‘सलाम-ए-इश्क सिनेमादरम्यान माझ्या शरीराचे वजन १४० किलोग्रॅमपर्यंत पोहोचलं होतं. माझ्या आयुष्यात गर्लफ्रेंड होती. खूप पार्टी केल्या जात होत्या. आयुष्यात सारं काही योग्य दिशेनं सुरू आहे, असे मला वाटत होतं. पण अर्पितासोबत अचानक ब्रेकअप झाल्यानंतर मी वाईटरित्या कोलमडलो. भविष्याबाबत मनात फार गोंधळ निर्माण होऊ लागले’. अर्जुनने ज्या काही भावना मांडल्या त्यावरून पहिले प्रेम किती खास असते, हेच दिसतंय.
जसे आहात तसे स्वतःचा स्वीकार करा
कधी व कोणासोबत प्रेमाच्या भावना जुळतील, यावर कोणाचंही नियंत्रण असू शकत नाही. पण काही गोष्टींची काळजी घेतली तर ब्रेकअपनंतर जास्त प्रमाणात यातना होणार नाहीत. यापैकी एक म्हणजे तुमच्या खऱ्या स्वभावाचे जोडीदाराला दर्शन घडवणे. पहिल्या प्रेमाची भावना फार सुंदर असते. प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्ती जोडीदारासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात.
(माधुरी म्हणते ‘माझा पतीच माझ्यासाठी हीरो’, तरुणींच्या स्वप्नातील राजकुमार असाच असतो का?)
अशातच लोक एकमेकांच्या छोट्या-मोठ्या सुखाची काळजी घेतात. कित्येकदा ज्या गोष्टी आवडत नाही, त्या सुद्धा फक्त पार्टनरसाठी केल्या जातात. हे सारं काही प्रेमप्रकरण नवीन असतानाच होतं, बरं का! यानंतर हळूहळू खरा स्वभाव एकमेकांसमोर येऊ लागतो. ज्यामुळे वाद-भांडणे वाढतात. परिणामी नात्यात तणाव निर्माण होऊन एकमेकांवरील प्रेम कमी-कमी होऊ लागतं.
अपेक्षांचं ओझे
अपेक्षांचं ओझे वाढू लागल्यानंतर कोणतेही नाते कमकुवत होऊ लागते. पहिल्यांदाच प्रेमात पडलेल्या जोडप्याला याची जाणीवही होत नाही. आवश्यकतेपेक्षा अपेक्षांच्या अधिकच्या ओझ्यामुळे नाते हळूहळू संपुष्टात येऊ लागते. एखाद्यावर जिवापाड प्रेम केल्यानंतर काही लोक जोडीदाराकडे काही अपेक्षा व्यक्त करतात आणि त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास निराशा वाढू लागते. अशीच परिस्थिती वारंवार उद्भवल्यास साहजिकच नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आणि संवादही कमी होतो. येथूनच प्रेमाचं नाते संपुष्टात येण्यास सुरुवात होते.
(‘तुझं माझ्यावर प्रेम नाही’ रणबीरने आईला कटु शब्द का सुनावले? नीतू कपूर यांचा ‘हा’ निर्णय योग्य आहे?)
पार्टनरशिप असते कमकुवत
प्रेमाचे नाते दीर्घकाळ टिकून राहावे, यासाठी जोडप्यामध्ये पार्टनरशिप आणि समजूतदारपणा असणं आवश्यक आहे. प्रेम, काळजी, माया कितीही असो, पण समजूतदारपणाच नसेल तर याचा थेट परिणाम नात्यावर होतो. दरदिवशी भांडणे-वाद वाढू लागतात. याच कारणामुळे नात्यातील समन्वय आणि संवाद बिघडू लागतो. परिणामी कित्येकांचे पहिले प्रेम अधुरेच राहते.
(करण मेहरा व निशा रावलसारखेच यांनीही नात्यातील वाद वाईटरित्या आणले चव्हाट्यावर,आयुष्यभर होतात यातना)
[ad_2]
Source link