Home मनोरंजन avika gor milind chandwani love story: ‘बालिका वधू’ फेम अविकाने रिलेशनशिपबाबत सांगितली मोठी गोष्ट, ‘त्याच्यामुळे मानसिक आधार मिळाला’ – balika vadhu star avika gor opens up about her relationship milind chandwani positive relationships and mental health tips in marathi

avika gor milind chandwani love story: ‘बालिका वधू’ फेम अविकाने रिलेशनशिपबाबत सांगितली मोठी गोष्ट, ‘त्याच्यामुळे मानसिक आधार मिळाला’ – balika vadhu star avika gor opens up about her relationship milind chandwani positive relationships and mental health tips in marathi

0
avika gor milind chandwani love story: ‘बालिका वधू’ फेम अविकाने रिलेशनशिपबाबत सांगितली मोठी गोष्ट, ‘त्याच्यामुळे मानसिक आधार मिळाला’ – balika vadhu star avika gor opens up about her relationship milind chandwani positive relationships and mental health tips in marathi

[ad_1]

प्रत्येकाच्या जीवनात प्रेम सुगंधाप्रमाणेच असतं, यामुळे दोन व्यक्तीचं आयुष्य प्रसन्न व सुखी होतं; हे नाकारता येणार नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असता तेव्हा याची माहिती आसपास असणाऱ्या लोकांनाही मिळते. तुमच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य आणि तुमच्यात दिसणारा वेडेपणा यासारख्या गोष्टी प्रत्येकाच्या नजरेत येऊ लागतात. पण बहुतांश लोक जाहिररित्या आपल्या नात्याची कबुली द्यायला घाबरतात. इतकंच काय तर आपल्या पालकांपासूनही रिलेशनशिपची माहिती लपण्याचा प्रयत्न केला जातो, कदाचित यामागील कारणे बरीच असू शकतात.

पण जर तुमच्या नात्याचा पाया मजबूत असेल आणि तुमचा जोडीदार आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये पाठिंबा देत असेल, तर मग याहून चांगली गोष्टी असू शकत नाही. रिलेशनशिपमुळे काही लोक ताणतणावाचाही सामना करतात, पण अविका गौरनं आपल्या नात्यातील ज्या काही गोष्टी उल्लेख केला आहे, त्या क्वचितच एखाद्याकडून ऐकायला मिळतात.

​आईवडिलांची परवानगी महत्त्वाची

नुकतेच ‘पिंकविला’ वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अविकाला तिच्या प्रेमसंबंधांबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. ‘तु आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने चर्चा करते. पण सध्या लोकांना आपल्या प्रेमाविषयी काहीही सांगू नये, असा विचार मनात आला नाही का? यावर अभिनेत्री म्हटलं की, ‘मुक्त आणि मोकळेपणाने जगणे मी माझ्या आई-वडिलांकडून शिकले आहे. ते दोघंही माझ्या बेस्ट फ्रेंडसारखे आहेत आणि मी त्यांना सारं काही सांगू शकते. म्हणूनच मी विचार केला की मी त्यांना सांगू शकते तर मग मी लोकांपासून गोष्टी का लपवून ठेवाव्यात. जर आईवडिलांना सर्वच माहिती आहे तर माझ्या दृष्टीनं संपूर्ण जगालाही माहिती आहे’.

(‘ऐश्वर्यामुळे माझ्या भावाची अशी अवस्था झाली’ सोहेलच्या रागाचा उडला होता भडका! वचन अपूर्ण राहिल्यास वाढतो द्वेष)

वास्तविक, आपल्या मुलांवर सर्वप्रथम पालकांचा अधिकार असतो, ही बाब नाकारणे शक्य नाही. अशा परिस्थितीत जेव्हा जोडीदार निवडण्यासारखा महत्त्वाचा निर्णय घेतला जातो, त्यावेळेस पालकांची परवानगी असणंही अत्यंत महत्त्वाचे असते. पालकांची मनापासून परवानगी असेल तर दोन व्यक्तींच्या नवीन आयुष्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने होते.

​जोडीदाराला द्या प्रोत्साहन

आयुष्याचा जोडीदार कसा हवा होता, हे सुद्धा अविकाने मुलाखतीत सांगितलं. तिनं म्हटलं की, ‘मला माझ्या आयुष्यात नेहमी अशी एक व्यक्ती हवी होती, ज्याचा मला अभिमान वाटेल. म्हणूनच मी आणि मिलिंद एकत्रित आहोत व आम्ही आमचे भविष्य एकमेकांसोबत पाहत आहोत. मिलिंदच तो खास व्यक्ती, याची जाणीव मला झाली. म्हणूनच त्याच्याबद्दल चर्चा करणं आणि आमच्या नात्याची माहिती लोकांसोबत शेअर करणं, यामध्ये मला कधीही संकोच वाटला नाही.

अभिमान-गर्व वाटवा असाच जोडीदार प्रत्येकाला आयुष्यात हवा असतो. आपल्यालाही खात्री असते की संबंधित व्यक्तीसोबतच आपले जीवन नेहमीच सुखी असेल. अशा परिस्थितीत जगासमोर आपलं नातं स्वीकारणं फार कठीण नसते.

(‘अर्पिता खानसोबत होतं गंभीर नातं… सारं ठीक होते’ अर्जुन कपूरचा गौप्यस्फोट, पहिले प्रेम अधुरंच का राहते?)

​अविकाने सांगितली नात्यातील मोठी गोष्ट

अविकानेही तिच्या नात्याबद्दल अशी एक गोष्ट सांगितली की ज्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलले. तिनं म्हटलं की, ‘जेव्हा आपण खूप आनंदी असतो, तेव्हा प्रत्येकाच्या नजरेत ही गोष्ट येतेच. जेव्हा मिलिंद माझ्या आयुष्यात आला, तेव्हा लोकांना माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तसंच हळूहळू माझ्यातही बरेच बदल घडू लागले. मानसिकदृष्ट्या मला बर्‍याच गोष्टी समजू लागल्या. जेव्हा आम्हाला आमच्या नात्याबद्दल खात्री वाटू लागली, तेव्हाच नाते जगासमोर आणणे आम्हाला योग्य वाटले’.

(‘पैशांसाठी वृद्धासोबत केलं लग्न’ जय मेहतांशी विवाह केल्यानंतर जुहीला ऐकावे लागले असे टोमणे, वयातील अंतरामुळे नात्यात पडतो फरक?)

​जोडीदाराकडून मानसिक आधार मिळणं आवश्यक

दोन व्यक्ती जेव्हा एखाद्या नातेसंबंधांमध्ये असतात, तेव्हा प्रेमच त्या नात्याचा पाया असतो. बदलत्या काळानुसार एकमेकांच्या सोबतीचीही आवश्यकता भासते. अशातच जोडीदाराला मानसिक आधार देणे आणि त्याच्या जीवनातील गोष्टी जाणून घेणे सुद्धा महत्त्वपूर्ण बाब आहे. एखादा खास व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर आपण त्याच्याकडून कोणकोणत्या चांगल्या गोष्टी शिकतो, हे देखील खूप महत्त्वाचे असते.

(माधुरी म्हणते ‘माझा पतीच माझ्यासाठी हीरो’, तरुणींच्या स्वप्नातील राजकुमार असाच असतो का?)

अविका आणि मिलिंद : क्युट कपल



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here