[ad_1]
सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन यांच्या म्हणण्यानुसार 2 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा चेहरा झाकलेला नसावा कारण यामुळे त्यांना श्वास घेण्यात समस्या उद्भवू शकते. एवढेच नाही तर सेंटरचे हे देखील म्हणणे आहे की ज्या व्यक्तीला श्वास घेण्यात समस्या उद्भवते त्यांनी मास्कचा वापर करू नये.
लहान मुलांनी मास्क का परिधान करू नये?
लहान मुलांचे वायुमार्ग लहान असतात यामुळे मास्क मधून श्वास घेणे त्यांच्यासाठी अधिक कठीण होऊन बसते. या प्रकारे बाळावर मास्कचा वापर करणे म्हणजे गुदमरण्याचा सुद्धा धोका असतो. चुकीची ठेवण असलेला मास्क त्यांना योग्य प्रकारे हवा देणार नाही आणि एक सैल मास्क त्यांना जास्त सुरक्षा प्रदान करणार नाही. लहान मुले स्वत:चा मास्क स्वत: उतरवू शकत नाहीत. त्यामुळे श्वास गुदमरण्याचा त्यांना अधिक धोका असतो. कधी कधी मुले मास्क परिधान करताना किंवा उतरवताना चेहऱ्याला जास्तच स्पर्श करू शकतात आणि त्यामुळे धोका वाढू शकतो.
सार्वजनिक ठिकाणी मुलांना सुरक्षित कसे ठेवावे?
तुमची मुले मास्क परिधान करू शकत नाहीत म्हणून त्यांना जास्त गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नये. ही सर्वात प्रथम काळजी घ्यावी. एवढे जरी केले तरी मुलांना मोठ्या धोक्यापासून वाचवता येते आणि सुरक्षित ठेवता येते. पण जर हे शक्य नसेल तर आम्ही तुम्हाला अजून काही खास उपाययोजना सांगत आहोत. ज्यांचे पालन करून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला सुरक्षित राखू शकता आणि आजारांपासून त्याला वाचवू शकता. चला जाणून घेऊया काय आहेत ते उपाय!
बाळाला झाकूनच कॅरी करा
जर तुमचे बाळ खूपच लहान असेल आणि बेबी कॅरियर मध्ये फिट होत असेल तर त्याचे तोंड आपल्याकडे करावे आणि त्याला आपल्या शरीराच्या शक्य तितक्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. बाळाला कुठेही बाहेर घेऊन जाताना झाकून न्यावे. बाहेरच्या वातावरणाशी त्याचा जास्त संबंध येऊन नये म्हणून त्याच्यावर कपड्याचे आवरण घालावे. यामुळे तुम्ही बाळाला अधिक सुरक्षित ठेवू शकता. अनेक पालक बाळाला सरळ बाहेर घेऊन जातात ते अधिक घातक ठरू शकते.
(वाचा :- प्रेग्नेंसीनंतर वेट लॉसदरम्यान महिला करतात ‘या’ मोठ्या चूका, अति घाई आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक)
बाळाला स्ट्रोलर मध्ये कव्हर करून फिरवावे
आपल्या सर्वांकडेच लहान मुलांना फिरवण्यासाठी प्लास्टिक रेन कव्हर आणि कॉटन सन कव्हर असतेच, तुम्ही या सध्याच्या काळात त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. जर तुमच्याकडे कव्हर नसेल किंवा तुम्ही ते सोबत कॅरी करायला विसरला असाल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही स्ट्रोलरचे कव्हरच खालील बाजूस करून त्याचाच वापर करा. पण बाळाला अशा प्रकारेच फिरवा. हा एक साधा सोपा आणि चांगला उपाय आहे जो तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवेल.
2 वर्षाच्या मुलांना कोणता मास्क घालावा?
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या सुचनेनुसार 2 वर्षांपर्यंतच्या मुलांना एक असा मास्क घालावा जो विशेषत: पुढील नियमांशी सुसंगत असेल. मास्क असा असावा जो चेहऱ्याला सहज फिट बसेल, टाय किंवा इयर लूपने तो सुरक्षित असावा. कपड्यांचे अनेक लेयर असावेत. त्यातून सहज श्वास घेता यावा. सहजपणे तो मास्क धुता यायला हवा आणि तो सुकायला देखील जास्त वेळ घेत नसावा. लहान मुलांना मास्क घालणे मुश्कील होऊ शकते. म्हणून तुम्ही सर्वात आधी त्यांच्या मनावर मास्कचे महत्त्व बिंबवले पाहिजे. स्वत: तुम्ही त्यांना मास्क घालून दाखवला पाहिजे. अनेकदा पालक जे करतात त्याचे अनुकरण मुले लगेच करतात. तर या काही गोष्टी करून तुम्ही मुलांच्या मास्क बाबत सावधानी बाळगू शकता.
(वाचा :- आई-बाबा बनण्यात सतत येतंय अपयश? मग आधी ‘ही’ माहिती जाणून घ्या नंतर ट्राय करा!)
[ad_2]
Source link