Home मनोरंजन करिश्मा कपूरने बिकिनी घालून साजरा केला वाढदिवस, बोल्ड लुक पाहून चाहते झाले होते घायाळ

करिश्मा कपूरने बिकिनी घालून साजरा केला वाढदिवस, बोल्ड लुक पाहून चाहते झाले होते घायाळ

0
करिश्मा कपूर (Karishma Kapoor) वाढत्या वयानुसार दिवसेंदिवस अधिकच सुंदर दिसत आहे. दोन मुलांची आई आणि वयाची पंचेचाळिशी ओलांडलेल्या या अभिनेत्रीला ग्लॅमर व फॅशनची चांगलीच माहिती आहे. कित्येकदा टॉप अभिनेत्री आणि तिची छोटी बहीण करीना कपूर सुद्धा तिच्यासमोर फिकी वाटते.

ग्लॅमरस लुक व्यतिरिक्त या अभिनेत्रीचा बोल्ड लुक देखील चाहत्यांना पाहायला मिळतो. याचीच झलक तिच्या वाढदिवशी देखील पाहायला मिळाली होती. करिश्माने स्वतःच्या वाढदिवशी मोनोकिनी परिधान करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. (सर्व फोटो : इंस्टाग्राम @karismakapoor)

​वाढदिवशी शेअर केला होता सुपर हॉट फोटो

करिश्मा कपूरने आपल्या ४५व्या वाढदिवशी सुपर हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. यादरम्यान ती लंडनमध्ये होती. या फोटोमध्ये अभिनेत्रीचा हॉट लुक आपण पाहू शकता. तिनं काळ्या रंगाचं मोनोकिनी परिधान केलं होतं. ज्यामध्ये कटआउट डिझाइनचा समावेश होता. या वन पीसमध्ये तिचा बोल्ड लुक पाहून चाहतेमंडळी फिदा झाले होते.

​करिश्माचा बोल्ड लुक

करिश्मा कपूरच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे अनेक बोल्ड फोटो पाहायला मिळतील. याचीच झलक आपण या फोटोमध्ये पाहू शकता. बोटमध्ये बसलेल्या या सुंदर अभिनेत्रीचा एका फोटोमध्ये स्विमसूट तर दुसऱ्या फोटोत बिकिनीसह मॅक्सी ड्रेस लुक पाहायला मिळतोय. यामध्ये करिश्मा प्रचंड हॉट दिसतेय.

​पांढऱ्या रंगाचा बॅकलेस गाउन

केवळ बिकिनी नव्हे तर करिश्मा कपूर आपल्या अन्य प्रकारच्या आउटफिट्समध्येही बोल्ड टच देत असल्याचं दिसतं. या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा ‘Tony Ward’ गाउन परिधान केल्याचं आपण पाहू शकता. यामध्ये बॅकलेस आणि पुढील बाजूस थाय हाय स्लिट डिझाइन देण्यात आलं होतं. या ड्रेसमध्ये करिश्माचा लुक शानदार दिसत आहे.

​सिल्व्हर कटआउट गाउनमधील सुंदर लुक

करिश्मा कपूरने एका अवॉर्ड शोसाठी ’Julien Macdonald’ चा हा स्टनिंग मेटॅलिक गाउन परिधान केला होता. या फिटेड ड्रेसमध्ये रिस्की कटआउट डिझाइन जोडण्यात आलं होतं. स्लीक वेट लुक हेअर आणि स्मोकी आइज मेकअपमुळे करिश्माला ग्लॅमरस लुक मिळाला आहे.

​प्लंजिंग नेकलाइन ड्रेस

आपली छोटी बहीण करीना कपूरप्रमाणे करिश्मा कपूर सुद्धा प्लंजिंग नेकलाइन ड्रेस आत्मविश्वासाने कॅरी करते. याचीच झलक आपण या फोटोमध्ये पाहू शकता. एका फोटोमध्ये आपण तिचा बोल्ड नेकलाइन ब्लाउज लुक पाहू शकता, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिनं डीप कट ब्लेजर जॅकेट परिधान केल्याचं दिसतंय.

​बॅकलेस ब्लाउज आणि ड्रेस

प्लंजिंग नेकलाइन डिझाइनचे कपडेच नव्हे तर ही अभिनेत्री बॅकलेस आउटफिट्स देखील फॅशनिस्टाप्रमाणे स्टाइलमध्ये कॅरी करते. लोलोच्या वॉर्डरोबमध्ये अशा कित्येक टॉप्स आणि ड्रेसचा समावेश आहे, ज्यामध्ये विशेष डिटेलिंग पाहायला मिळतं. कलेक्शनमध्ये बॅकलेस डिझाइनच्या कपड्यांचाही समावेश आहे. याचेच उदाहरण म्हणजे हा काळ्या रंगाच्या साडीतील शानदार लुक.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here