[ad_1]
खऱ्या आयुष्यात सासू-सुनेचं नातं मुळात असं नसतं. या नात्यामध्ये प्रेम, गोडवा, काळजी, आपुलकी हे सारं काही असतं. प्रत्येक नात्यामध्ये अनेक चढ-उतार, छोटे वाद-विवाद, राग-रुसवा हा असतोच. पण त्यातूनही सासू-सुनेचं नातं अधिक बहरत जातं. आता हेच बघा ना प्रियंका चोप्रापासून ते जेनेलिया डिसुझापर्यंत साऱ्यांनाच मायाळू सासू मिळाली आहे. त्यांच्या या सुंदर नात्याकडे पाहून तुमच्या तोंडून देखील आपसूकच निघेल ‘अशीच सासू हवी गं बाई…’ चला तर मग बॉलिवूडच्या या सासू-सुनांच्या नात्याबद्दल जाणून घेऊया.
प्रियंका चोप्राला सासूकडून मिळालं टोपण नाव
विदेशी बहू प्रियंका चोप्राने निक जोनसशी लग्नगाठ बांधली. आणि त्यानंतर ही अभिनेत्री सासरच्या मंडळींमध्ये अगदी रमून गेली. प्रियंकाने तिच्या सासूबरोबरचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. डेनिस मिलर जोनस आणि प्रियंकाचं नातं खूप सुंदर आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण प्रियंकाच्या सासूने तिला लग्नात चक्क ६० लाख रुपयांचे कानातले भेटवस्तू म्हणून दिले. ऐकून बसला ना धक्का…पण हे अगदी खरं आहे. दिलखुलास होऊन निकच्या आईने तिचा स्वीकार केला. त्या इथवरच थांबल्या नाहीत तर ‘दिल’ हे टोपण नाव त्यांनी प्रियंकाला दिलं. या दोघी खुलेपणाने एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करतात. बऱ्याचदा सासू-सूना खुलेपणाने बोलताना दिसत नाहीत. पण तुम्ही नेहमी एकमेकांशी मन मोकळेपणाने संवाद साधला तर तुमचं नातं अधिक घट्ट होईल.
(जेव्हा आमिरने किरणचं केलं तोंडभर कौतुक, असा जोडीदार मिळाल्यानंतरही जोडपी का होतात विभक्त?)
राणी मुखर्जी माझी मुलगीच
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्या लग्नाला बरीच वर्ष उलटून गेली आहेत. पण अजूनही या दोघांच्या नात्यामधील गोडवा कायम टिकून आहे. राणीची सासू पामेला चोप्रा देखील तितक्याच मायाळू आणि प्रेमळ आहेत. पामेला यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, ‘राणी मला खूप प्रेमळ वाटते. माझी काळजी तर घेतेच. पण त्याचबरोबरीने मला आदर, सन्मान देते. यामुळे मी नेहमीच आनंदी राहते.’ राणी प्रमाणेच तुम्ही देखील तुमच्या सासूचा आदर, सन्मान कराल तर नक्कीच तुमच्या नात्यातील गोडवा कायम टिकून राहिल.
(‘मला कोणत्याच गर्लफ्रेंडकडून प्रेम मिळालं नाही’ प्रेमामध्ये अनलकी ठरला सलमान खान, आजही आहे एकटाच)
काजोलबरोबर मैत्रीचं नातं
अभिनेता अजय देवगणने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, त्याचे पालक त्याच्यापेक्षा काजोलवर अधिक विश्वास ठेवतात. तसेच एखादी गोष्ट घडली की ते सर्वप्रथम काजोललाच फोन करतात. यामधूनच हे सिद्ध होतं की अभिनेत्रीने सासरच्या मंडळींची मनं जिंकली आहेत. काजोल आणि तिच्या सासूमध्ये मैत्रीचं नातं आहे. काजोल आपल्या सासूला मैत्रिण मानते. दोघी एकत्र बसून जेवणाचा आनंद देखील लुटतात. काजोलने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, लग्नानंतर सासूने माझ्यावर कोणत्याच प्रकारचा दबाव आणला नाही. कुटुंबामध्ये रमायला मला वेळ दिला. नवीन सुनेवर कोणत्याच प्रकारचा दबाव न टाकता तिला पाठींबा दिला तर सासू-सुनेच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत नाही.
(‘रणबीरसारखे लोक मी आजपर्यंत पाहिले नाहीत’ असं का म्हणाली आलिया भट, जीवनात नेमके बदललेय तरी काय?)
शिल्पा शेट्टीची सासू सगळ्यात भारी
आपल्या स्वप्नातला राजकुमार आपल्याला मिळावा असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्राला तर तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळालाच. पण त्याचबरोबरीने तिला तिची ड्रीम सासू देखील मिळाली. सोशल मीडियावर शिल्पा राज कुंद्राच्या आईबरोबर डान्स करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते. हे व्हिडिओ पाहून दोघींमधलं बॉण्डिंग अगदी स्पष्टपणे दिसून येतं. शिल्पा नेहमीच आपल्या सासूबरोबर एकत्रित वेळ कसा घालवता येईल याकडे लक्ष देत असते. एकत्रित वेळ घालवणं हेच या दोघींच्या सुंदर नात्याचं रहस्य आहे. एकमेकांबरोबर एकत्रित वेळ घालवला की एकमेकींचा स्वभाव, विचार कळतात. यामुळे नातं अधिकाधिक बहरत जातं.
सासू म्हणजे आईच
अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख कुटुंबियांची सून झाली. आणि तिथपासूनच ती तिच्या संसारामध्ये अगदी रमून गेली. जेनेलिया तर पती रितेश देशमुखची आई वैशाली देशमुख यांना स्वतःच्या आईप्रमाणे जपते. सासूला ती आईच मानते. तसेच ती सासूला आई म्हणूनच हाक मारते. जेनेलियाने आपल्या सासूला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास पोस्ट लिहिली होती. त्यात तिने म्हटलं होतं की, कोणतीच सून परफेक्ट नसते. पण तिची सासू तिला परफेक्ट व्हावी म्हणून मदत करते. जेनेलिया तिच्या सासूवर जिवापड प्रेम करते. हे या दोघींच्या प्रत्येक फोटोमधून देखील दिसून येतं.
[ad_2]
Source link