शासननामा न्यूज ऑनलाईन
आपल्या समाजात बऱ्याचदा पतीच्या तुलनेत पत्नीलाच तडजोड करावी लागते, हे आपण पाहिलेच असेल. पण बदलत्या काळानुसार आता पती-पत्नी एकमेकांसाठी बऱ्याच गोष्टींमध्ये त्याग करताना दिसताहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone)आणि रणवीर सिंग यांचं नातंही असेच काहीसे आहे. म्हणूनच एकदा त्याने पत्नी दीपिकाच्या आनंदातच आपले सुख असल्याचं सांगितलं होतं.
’ज्यात तुझं सुख, त्यामध्ये मीही आनंदी’
दीपिकाने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणवीरसोबतच्या नात्याबाबत कित्येक गोष्टी शेअर केल्या होत्या. तिनं म्हटलं होतं की, ‘रणवीर माझ्या विचारांसोबत एकरूप झाला आहे. ‘ज्या गोष्टींमुळे तु खूश असतेस, त्यामुळेच मलाही आनंद मिळतो’, असे तो मला म्हणत असतो. पण मला सर्व गोष्टी योग्य वेळेतच करण्याची सवय आहे. हे सारं काही मी माझ्या आईवडिलांकडूनच शिकलेय, त्यामुळे मला अन्य कोणताही मार्ग माहीत नाही’
रणवीरचे दीपिकावर किती प्रेम आहे, हे तिनं सांगितलेल्या माहितीवरून स्पष्टच दिसत आहे. पण बर्याचदा काही जण प्रेमसंबंधामध्ये असून आपल्या जोडीदारासोबत अशा प्रकारे संवाद कधीही साधत नाही. आपल्या जोडीदाराच्या गोष्टींमध्ये स्वतःचा आनंद शोधणे प्रत्येकासाठी सोपे नसते, म्हणूनच बरीच नाती हळूहळू कमकुवत होत जातात.
जोडीदाराच्या आनंदात सहभागी का होत नाहीत?
एका संशोधनातील माहितीनुसार, एखाद्या नात्यामध्ये छान – सुंदर गोष्टी दिसू लागतात, तेव्हाच खऱ्या अर्थानं नाते फुलत जाते. नातं अधिकाधिक मजबूत होण्यासाठी दोघंही १०० टक्के देऊन प्रयत्न करतात आणि एकमेकांच्या आनंदासाठी सर्वकाही केले जाते; तेव्हाच प्रेम वाढतं.
पण काही नातेसंबंधांमध्ये कोणत्याही प्रकारे तडजोड नसते, केवळ वाद-भांडणंच होत असतात; याचदरम्यान जोडीदारांच्या वागण्यात-मतांमध्ये बदल पाहायला मिळतो. मग दोघांमध्ये कितीही प्रेम असो किंवा नाते कितीही दृढ वाटत असले तरीही आपल्या जोडीदाराच्या आनंदात ही मंडळी कधीच खूश दिसत नाहीत.
नात्याचा कंटाळा येणे
आताच्या आधुनिक युगात लोकांची जीवनशैली खासगी व व्यावसायिक कामांमुळे प्रचंड व्यस्त झाली आहे. ज्याचा थेट नात्यावर परिणाम होतोय. जर तुम्ही आपल्या नात्यास अजिबातच वेळ देत नाहीय तर दुरावा वाढणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत एकमेकांच्या आनंदात आनंदी राहण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
कधी वाद, रूसवे-फुगवे, थट्टा-मस्करी अशा स्वरुपात जोडीदारासोबतचे नाते असावे. काम आणि तणाव असतानाही आपण आपल्या खास व्यक्तीसाठी वेळ काढल्यासच नातेसंबंध टिकून राहण्यास मदत मिळेल. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेणे आणि व्यस्त वेळापत्रकातही प्रेम व्यक्त करणे, या छोट्या-छोट्या गोष्टींमुळेही तुमचे नाते बहरत जाते.
जेव्हा स्वप्नांना दिलं जातं अधिक महत्त्व…
आयुष्यात प्रेमाबरोबरच करिअर देखील खूप महत्त्वाचं असते, यात वादच नाही. बहुतांश मंडळी आपल्या नात्याऐवजी करिअरला अधिक प्राधान्य देतात. यामुळेच स्वप्न गाठण्याच्या नादात काही लोक बर्याचदा स्वतःच्या नात्याकडेच पूर्णतः दुर्लक्ष करतात. करिअरमध्ये थोडीशीही तडजोड करणं त्यांना मान्य नसते. यामुळे काही प्रकरणांत पती-पत्नीचं नातं कमकुवत होत जातं. तर दुसरीकडे एक सच्चा जोडीदारआपल्या पार्टनरला पूर्ण पाठिंबा देऊन आपल्यासोबत पुढे घेऊन जाण्याचं काम करतो.