Home मनोरंजन छोट्याश्या ओल्याचिंब कपड्यांमध्ये पावसात बेधुंद नाचणा-या दीपिकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल, चाहते म्हणाले..!

छोट्याश्या ओल्याचिंब कपड्यांमध्ये पावसात बेधुंद नाचणा-या दीपिकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल, चाहते म्हणाले..!

0
छोट्याश्या ओल्याचिंब कपड्यांमध्ये पावसात बेधुंद नाचणा-या दीपिकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल, चाहते म्हणाले..!

शासननामा न्यूज ऑनलाईन

‘दीया और बाती हम’ (diya aur baati hum) या अत्यंत प्रसिद्ध शो मधून घराघरात पोहोचलेली दीपिका सिंग (deepika singh goyal) सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे खूप चर्चेत असते. तिचा पूर्वीचा लूक आणि आताचा लूक यांमध्ये खूप फरक असून एक अपडेटेड दीपिका सिंग आपल्याला पाहायला मिळते. दीपिका कडे नैसर्गिक सौंदर्य आहे आणि ते अगदी लाघवी आहे त्यामुळे तिच्यावर अनेक लुक्स खुलून दिसतात. तिची सुंदर त्वचा तर पावसात भिजल्यावर आणखीनच चमकत असल्याचं एका व्हिडिओ मधून समोर आलं. तिचा हा पावसात केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

तिच्या काचेसारख्या त्वचेवर पावसाचे थेंब एखाद्या हि-याप्रमाणे शुभ्र धवल भासत आहेत. आपल्या या चमकदार त्वचेबद्दल सांगताना दीपिका म्हणते की ती तिच्या स्कीनच्या हायड्रेशनची पूर्ण काळजी घेते आणि खास करून उन्हाळ्याच्या दिवसात दोन स्पेशल बॉडी स्क्रबरचा वापर करते. जेणेकरून तिला टॅनिंगचा सामना करावा लागत नाही.

परफेक्ट आणि नॅच्युरल फोटोशूट

दीपिका सिंगचे पावसात भिजतानाचे हे फोटोशूट पाहून तुम्हाला देखील पावसात जाऊन भिजावेसे व फोटो काढावेसे वाटत असेल ना आणि वाटणारच कारण तिचे फोटोच तितके सुंदर आहेत. स्पेगेटी वन-पीस (spaghetti top) मोकळे केस आणि चमकदार त्वचा यामुळे दीपिका एखाद्या अप्सरेसारखी भासते आहे. या लूक मध्ये ना दीपिकाने कोणता मेकअप केला आहे ना डार्क काजळ वा लिप कलरचा वापर केला आहे. एका शॉर्ट वन-पीस ड्रेस मध्ये पावसात झाडांशी बिलगून एकदम हटके आणि घायाळ करणारे फोटोशूट तिने केले आहे.

काचेच्या मोत्यांप्रमाणे चमकत आहेत थेंब

पावसाचे थेंब दीपिकाच्या त्वचेवर काचेच्या मोत्यांप्रमाणे चमकताना दिसत आहेत. ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. जर तुम्हालाही वाटते की दीपिका प्रमाणे तुमच्या त्वचेवर सुद्धा पावसाचे थेंब एखाद्या टपोऱ्या मोत्याप्रमाणे चमकताना दिसावेत तर दीपिका वापरत असणारे स्किन ब्राइटनिंग स्क्रब तुमच्या देखील फायद्याचे ठरू शकतात. हे स्किन ब्राइटनिंग स्क्रब कसे बनवावे ते आपण आता जाणून घेऊया. जेणेकरून तुम्ही देखील त्याचा वापर करून अधिक सुंदर दिसू शकता.

मध, कॉफी आणि गुलाबजलचा परिणाम

दीपिका म्हणते की उन्हाळ्याच्या काळात टॅनिंग पासून वाचायचे असले तर सर्वात चांगला उपाय म्हणजे आपल्या स्कीनला हायड्रेटड ठेवणे होय. यासाठी आहारावर अधिकाधिक लक्ष देणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलाच हवे. कॉफी पावडर, वाटून घेतलेली ब्राऊन शुगर, गुलाबजल या सर्व गोष्टी मिक्स करून तुम्ही तुमच्या स्कीन वर स्क्रबिंग करा. यामुळे तुम्हाला लगेच परिणाम दिसेल आणि तुमची त्वचा खूप सुंदर आणि स्वच्छ होईल. असे दरोरोज 3 ते 4 मिनिटे करावे.

टॅनिंग दूर करण्यासाठी

दीपिका म्हणते की लिंबू, साखर आणि दही यांचे मिश्रण त्वचा टॅनिंग मुक्त करण्याचा सर्वात साधा सोप्पा आणि प्रभावी उपाय आहे. याचा नियमित वापर केल्याने तुम्हाला खूप लाभ होईल. तुमच्या स्कीनची टॅनिंग सुद्धा दूर होईल आणि अनइव्हन स्कीन टोनच्या समस्येपासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल. दीपिकाच्या मते जर घरगुती उपयांची माहिती असेल आणि त्यांचा वापर कसा करावा याचे योग्य ज्ञान असेल तर तुम्हाला महागड्या पार्लर मध्ये जाऊन ट्रीटमेंट करण्याची आणि ब्यूटी प्रॉडक्ट्स वर पैसे खर्च करण्याची गरज नाही.

रिमझीम पावसात थिरकताना बेधुंद दीपिका!

चाहत्यांनी केली खूप स्तुती

दीपिकाचे हे सुंदर फोटोशूट पाहून तरुण घायाळ झाले नसतील तर नवलच! तिने फोटो आणि व्हिडिओ टाकताच तिच्या पोस्ट वर कमेंटचा पाउस पडू लागला आणि तिच्या सुंदर त्वचेचे आणि सौंदर्याचे सर्वांनीच कौतुक केले. पण काही चाहते असेही होते ज्यांनी तिची थोडी टर उडवली. पण ही थट्टा सामान्य होती. एकंदर पाहता तिचे हे फोटोशूट अनेकांना खूप पसंत आले आहे आणि सध्या सगळीकडे तिच्या याच फोटोज आणि व्हिडिओजची चर्चा सुरु आहे. यावरूनच दिसते की ‘दीया और बाती हम’ मधली ती सामान्य नायिका आता मॉडर्न झाली आहे.

पावसात भिजा पण काळजी घ्या

दीपिकाचे हे फोटोशूट पाहून तुम्हाला देखील नक्कीच पावसात जाऊन फोटोशुट करण्याचा मोह आवरत नसेल, पण थांबा. लगेच घाई करून पाऊस आला कि कॅमेरा घेऊन बाहेर धावत जाऊ नका. अशा सेलिब्रिटीजचे फोटोशूट हे अत्यंत प्रोफेशनल असतात आणि संपूर्ण टीम त्यात असते. त्यामुळे खूप काळजी देखील घेतली जाते. तुम्ही स्वत:हून असे फोटो काढण्यासाठी पावसात जात असाल तर सर्व प्रकारे काळजी घ्या नाहीतर आजारी पडलात तर फोटोशूट खूप महागात पडेल नाही का?

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here