[ad_1]
इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असेच सायरा बानो आणि दिलीप कुमार यांचे नाते होते. या जोडप्याने आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले, पण या सर्व गोष्टी त्यांना एकमेकांपासून विभक्त करू शकल्या नाहीत. या आदर्श जोडप्याशी संबंधित अशा बर्याच गोष्टी आहेत, ज्या अन्य जोडप्यांसाठीही मोठी शिकवण ठरू शकते. प्रेम करणं आणि ते निभावणे याचा नेमका अर्थ या आदर्श जोडप्याकडून शिकण्यासारखा आहे. (फोटो सौजन्य : इंडियाटाइम्स)
टॉपची अभिनेत्री असतानाही का सोडलं अभिनयाचे विश्व?
अभिनयाच्या करिअरमध्ये अव्वल स्थानी असतानाही सायरा बानो यांनी स्वतःहून वयाने २२ वर्षे मोठ्या असणाऱ्या अभिनेत्याशी लग्न करून सिनेसृष्टी सोडली. पण या निर्णयाचा त्यांना मुळीच पश्चाताप नव्हता. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होतं की, ‘कोणत्याही दडपणाखाली नव्हे तर स्वतःच्या इच्छेनुसार सारं काही निवडले. कारण त्यांना दिलीप कुमार यांची काळजी घेण्यासाठी संपूर्ण वेळ हवा होता’.
एकीकडे हल्लीच्या काळात ज्या महिला लग्नानंतर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतात, त्यांच्याबाबत वेगवेगळ्या स्वरुपातील मत मांडून नको-नको त्या चर्चा केल्या जातात. अशा परिस्थितीत सायरा बानो एक प्रेरणास्त्रोत म्हणून समोर येत आहेत. समाज काय विचार करेल याचा विचार करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा आणि आपल्या वैवाहिक जीवनासाठी कोणता निर्णय सर्वाधिक योग्य ठरू शकतो? यावर लक्ष केंद्रित केलं.
(‘रणबीरसारखे लोक मी आजपर्यंत पाहिले नाहीत’ असं का म्हणाली आलिया भट, जीवनात नेमके बदललेय तरी काय?)
जेव्हा गर्भातच सायरा बानो यांनी गमावलं बाळ
दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या आयुष्यात बाळ येऊ शकले नाही. यावरून बऱ्याच प्रकारच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. काहींनी असेही म्हटले आहे की अभिनेत्री आई होऊ शकत नाही, म्हणूनच या जोडप्याच्या आयुष्यात मुलाचे सुख नाही. पण आत्मचरित्र ‘Dilip Kumar: The Substance And The Shadow’ द्वारे त्याचे संपूर्ण सत्य समोर आले.
दिलीप कुमार यांनी स्वतः सांगितले की, सायरा बानो १९७२ साली गर्भवती होत्या. पण आठव्या महिन्यात त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सहन करावा लागला. यादरम्यान डॉक्टर त्यांच्या बाळाला वाचवू शकले नाहीत. जोडप्याने ही घटना स्वीकारली आणि मुलाबद्दल पुन्हा कधीही विचार केला नाही.
जगभरात अशी कित्येत जोडपी असतील, जे बाळाचे सुख न मिळाल्यानं विभक्त होण्याचा निर्णय घेतात. पण दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्यातील नातेसंबंध हे शिकवण देते की जोडप्यांच्या आयुष्यात मुलेच सर्वकाही नसतात. जेव्हा पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकमेकांना साथ देण्याचा आणि प्रेम करण्याचे वचन देतात, तेव्हा अशा प्रकारच्या दुःखांचा सामनाही ते एकत्रित करतात. संकटांवर मात करून आपले नाते मजबूत करतात.
(‘आनंदमध्ये दिसते माझीच छबी’, मुकेश अंबानींकडून जावयाचं कौतुक, वडिलांना मुलीसाठी हवा असतो असाच पती)
बाळ न झाल्यानं सायरा यांनी सांगितली होती ही गोष्ट
बाळ गमावल्यानंतर सायरा बानो आणि दिलीप कुमार कोलमडले होते, पण त्यांच्यातील प्रेम कमी झाले नव्हते. याउलट दोघांनी एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देण्यास सुरुवात केली. ‘HT’ला दिलेल्या मुलाखतीत सायरा यांना विचारण्यात आले होते की, कुटुंबात बाळ नसल्याचा तुम्हाला पश्चात्ताप होत नाही का? तर यावर अभिनेत्रीने उत्तर दिले की ‘आमचे लग्न माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मला मुलांची कमतरता भासत नाही कारण दिलीप साहेब मनाने एखाद्या मुलासारखेच आहेत’.
हे दिलीप कुमार यांचे प्रेम आणि पाठिंबाच होता, ज्यामुळे सायरा या गर्भवती असताना आठव्या महिन्यात आपल्या बाळाला गमावल्याच्या दुःखावर यशस्वीरित्या मात करू शकल्या. दिलीप कुमार व सायरा यांच्या नात्याशी संबंधित गोष्टी ही शिकवण देते की, जेव्हा-जेव्हा जोडप्यावर अशा प्रकारच्या दु: खाचा डोंगर कोसळतो, तेव्हा-तेव्हा जोडप्याने एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून भावनिक आधार देणे महत्त्वाचे असते. जर अशा कठीण परिस्थितीवर त्यांनी एकत्रित मात केली तर वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो.
(जेव्हा आमिरने किरणचं केलं तोंडभर कौतुक, असा जोडीदार मिळाल्यानंतरही जोडपी का होतात विभक्त?)
आनंदासाठी हृदयाचे दरवाजे बंद केले नाहीत
दिलीप कुमार आणि सायरा यांच्या आयुष्यात स्वतःचे मूल नसले तरीही या दोघांनी आपल्या कुटुंबातील अन्य मुलांवर भरभरून प्रेम केले. यावरून हेच शिकायला मिळते की वाईटातील वाईट काळातही छोट्या-छोट्या गोष्टींद्वारे भरपूर आनंद मिळू शकलो. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिलीप कुमार यांनी सांगितलं होतं की, ‘मला लहान मुले आवडतात, पण याबद्दल विचार करण्यासाठी वेळ कुठे आहे? माझ्या आणि सायरा यांच्या कुटुंबात जवळपास ३० मुले आहेत आणि ते सर्वजण आपल्या खोड्या-मस्करीत मला पूर्ण वेळ व्यस्त ठेवण्याचं काम करतात. त्यांच्यात इतकी ऊर्जा आहे की त्यांना सांभाळता-सांभाळता मी थकून जातो’.
(‘संसार मांडायचा नव्हता’ साखरपुड्यानंतर या हॉट अभिनेत्रीचं नातं मोडलं, काय होतं कारण)
[ad_2]
Source link