काही वर्षांपूर्वी या अभिनेत्रींप्रमाणेच डिंपल कपाडिया यांनीही प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलंय. शानदार अभिनयासोबतच ही अभिनेत्री मोहक व आकर्षक सौंदर्यासाठी ओळखली जात असे. डिंपल यांनी कित्येक ग्लॅमरस फोटोशूटही केले आहेत. फॅशन डिझाइनर अबू जानी-संदीप खोसला यांच्यासाठीही त्यांनी हटके फोटोशूट केलं. यातील काही फोटो डिझाइनर्सकडून इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलं आहेत. (फोटो सौजन्य : इंस्टाग्राम @abujanisandeepkhosla)
वाढदिवशी शेअर केले फोटो
वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीला शुभेच्छा देण्यासाठी अबू जानी-संदीप खोसला यांनी काही थ्रो-बॅक फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये अभिनेत्रीनं सुंदर व आकर्षक ड्रेस परिधान केल्याचं आपण पाहू शकता. पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्रीनं पांढरा रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसतंय, ज्यावर पांढऱ्या व सोनेरी रंगाच्या धाग्यांपासून वर्क करण्यात आलं होतं. तसंच यामध्ये सीक्वन वर्कही जोडण्यात आलंय. हातफुल, ब्रेसलेट, वजनदार ईअररिंग्ज आणि नेकलेस या दागिन्यांमुळे डिंपल यांचा लुक रॉयल दिसत आहे.
चिकनकारी वर्कमधील आकर्षक आउटफिट
डिंपल कपाडिया यांनी पांढऱ्या रंगाचा सुंदर पोषाख परिधान केल्याचं आपण पाहू शकता. ड्रेसमध्ये जॅकेट स्टाइल कुर्त्याचा समावेश होता. यावर चिकनकारी वर्क करण्यात आलं होतं. ड्रेसवरील एम्ब्रॉयडरी अत्यंत नाजूक होती. या रंगीबेरंगी एम्ब्रॉयडरी वर्कमुळे ड्रेस खूप सुंदर दिसत होता. तसंच आउटफिटच्या हेमलाइनवर आकर्षक टॅसल्स डिझाइन सुद्धा जोडण्यात आले होते.
डिंपल कपाडिया यांचा मोहक लुक
अबू जानी संदीप खोसला यांनी १९९४ साली त्यांचे पहिले चिकनकारी कलेक्शन लाँच केले होते. या आयकॉनिक आउटफिट्ससाठी त्यांनी डिंपल कपाडिया यांची निवड केली होती. या फोटोमध्ये अभिनेत्रीनं डिझाइनरच्या कलेक्शनमधील चुडीदार पायजमा, साइड स्लिट कुर्ता आणि मॅचिंग दुपट्टा परिधान केल्याचं आपण पाहू शकता. या ड्रेसमध्ये त्यांचा लुक प्रचंड मोहक दिसतोय.
बंदगळा पॅटर्न कुर्त्यामधील ग्लॅमरस लुक
ही डिझाइनर जोडी सिल्क फॅब्रिकपासून आकर्षक कपडे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. डिंपल कपाडिया यांनी परिधान केलेला हा ड्रेस सुद्धा सिल्क पॅटर्नचाच आहे. त्यांनी सोनेरी- तपकिरी रंगाचा बंदगळ्याचा कुर्ता परिधान केल्याचे आपण पाहू शकता. जॅकेट डिझाइन स्टाइलमधील या कुर्त्यासह मॅचिंग चुडीदार पायजम्याचा समावेश होता. बन हेअरस्टाइल करून डिंपल यांनी हलके ईअररिंग्स घातले होते.
मोहक – ग्लॅमरस अवतार
कलरब्लॉकची फॅशन सध्या पुन्हा जोमात आहे. पण अबू जानी-संदीप खोसला या स्टाइलसाठी फार पू्र्वीपासूनच प्रसिद्ध आहेत. या फोटोमध्ये डिंपल यांनी पॅटर्नच्या सिल्क पॅटर्न साडी नेसल्याचं आपण पाहू शकता. ऑलिव्ह ग्रीन, निळा, पिवळा, लाल आणि सोनेरी रंग या साडीमध्ये दिसताहेत. या साडीमध्ये अभिनेत्रीचा लुक प्रचंड आकर्षक दिसतोय.
मायलेकीचा सुंदर लुक
काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचा मोहक फोटो डब्बू रतनानीने सुद्धा शेअर केला होता. दोघींनीही लाल रंगाची सिल्क पॅटर्न साडी नेसल्याचे आपण पाहू शकता. या साडीमध्ये दोघींचंही रूप अधिकच खुललेय. साडीवर मायलेकीनं सोन्याचे दागिने घातल्यानं त्यांना रॉयल लुक मिळाला होता. (फोटो सौजन्य: इंस्टाग्राम-डब्बू रतनानी)