फारच थोड्या लोकांना माहिती आहे की काही खास फेशियल व्यायाम (facial exercises) डोकेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी एक अतिशय प्रभावी मार्ग मानला जातो, या काही खास व्यायामांच्या सहाय्याने आपण काही मिनिटांत डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया अशा काही साध्या सोप्या फेशियल एक्सरसाइज टिप्स ज्यामुळे आपण काही मिनिटांत डोकेदुखीच्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकतो.
तेलाने करा एक्सरसाइज
डोळ्यांमध्ये किंवा सायनसमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर आपल्या दोन्ही हातांची तर्जनी लव्हेंडर तेलामध्ये बुडवा आणि डोळ्यांपासून सुरु झालेल्या नाकाच्या दोन्ही बाजूंच्या हाडांना हलक्या हातांनी दाबा व चांगली मसाज करा. मसाज करताना हलक्या हातांनीच करावी हे लक्षात असूद्या. डोकेदुखीमध्ये लव्हेंडर तेल वापरणे खूप फायदेशीर असते. लव्हेंडर तेलाने केलेली मालिश आपल्या डोळ्यांना विश्रांती देईल, जेणेकरून आपल्याला डोकेदुखीच्या समस्येपासून देखील आराम मिळेल.
भुवयांच्या मधोमध करा मसाज
दुसर्या व्यायामासाठी, आपल्या दोन्ही हातांच्या चारी बोटांच्या वरच्या भागास फेशियल ऑइलमध्ये बुडवा आणि त्या दोन्ही हातांच्या बोटाने भुव्यांच्या मध्ये एकसाथ हळूवारपणे मालिश करा. हे लक्षात ठेवा की मालिश हलक्या हातांनीच केले पाहिजे, मालिश करताना जास्त दबाव देऊ नका. डोळे हलके बंद ठेवा आणि डोळ्यांवर कोणताही दबाव येणार नाही याची काळजी घ्या. व्यायामा दरम्यान एकदा दीर्घ श्वास घ्या आणि रिलॅक्स फिल करा. आपण हा मसाज 2 ते 3 मिनिटांसाठी करू शकता. 2 ते 3 मिनिटांचा हा व्यायाम तुमची डोकेदुखी दूर पळवून लावेल.
तर्जनीचा वापर करुन वेदना करा दूर
तर्जनी बोट ज्याला आपण इंडेक्स फिंगर देखील म्हणतो, या बोटाचा उलटा यू आकार बनवा, त्यामध्ये फेशियल ऑइल लावा आणि दोन्ही बाजूंनी हळूवारपणे बोटं सरकवून कपाळाच्या वरच्या भागात भुवयांच्या वर मालिश करा. लक्षात ठेवा दबाव जास्त देऊ नका, अन्यथा बरे होण्याऐवजी वेदना आणखीनच वाढू शकतात.
दीर्घ श्वास घ्या
तुम्हाला माहित आहे का की दीर्घ श्वास घेतल्याने देखील डोकेदुखी पासून खूप आराम मिळतो? जेव्हा जेव्हा आपल्याला डोकेदुखी होईल तेव्हा तेव्हा एका जागी शांत बसा, आपले डोळे बंद करा आणि हळू हळू दीर्घ श्वास घ्या. या व्यायामामुळे आपल्याला काही मिनिटांतच आरामदायक वाटू लागले. तर मंडळी या काही सोप्या सोप्या टिप्स आहेत ज्याच्या सहाय्याने आपण डोकेदुखीपासून अगदी सहज मुक्ती मिळवू शकतो. जर आपल्याला डोकेदुखी असेल तर पेन किलर घेण्याऐवजी आपण या सर्व टिप्सचे पालन करून डोकेदुखीपासून मुक्ती मिळवू शकता. या सर्व व्यायामांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे कोणतेही नुकसान किंवा साइड इफेक्ट्स होत नाहीत आणि ते कुठेही, कधीही केले जाऊ शकतात.