अखेर त्रासाला कंटाळून २०१२ पासून करिश्मा आपल्या पतीपासून दूर राहू लागली. पण एक काळ असाही होता की अभिनेत्रीच्या मोडलेल्या लग्नाचे दुष्परिणाम तिच्या कुटुंबामध्येही दिसू लागले. दुसरीकडे नीतू कपूर आणि बबिता यांचंही एकमेकींशी पटत नसे, याचे परिणाम त्यांच्या मुलींच्या आयुष्यातही दिसून आले. एकीकडे करीनाचे रणबीर आणि रिद्धिमा यांच्याशी चांगले संबंध होते, तर करिश्माला रिद्धिमा अजिबात आवडत नव्हती. रिद्धिमाने करिश्माचा पती संजयसोबत हातमिळवणी केल्यानंतर दोघींमधील वाद अधिक वाढले.
भूतकाळामुळे नात्यात आली कटुता
स्पॉटबॉयच्या एका रिपोर्टनुसार, रिद्धिमाने संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेवसोबत दागिन्यांच्या व्यवसायात भागीदारी केली, त्यावेळेस रिद्धिमा कपूर – साहनी आणि करिश्मामधील तणाव अधिक वाढले. एकीकडे रिद्धिमा प्रियाच्या इंस्टाग्रामवरील पोस्ट नेहमीच लाइक करून त्यास पाठिंबा दर्शवत होती. तर दुसरीकडे घटस्फोटानंतर करिश्माने संजयच्या तिसऱ्या पत्नीला घर उद्ध्वस्त करणारी असंही म्हटलं होतं’.
बहिणीबाबत बाळगलं मौन
दरम्यान करिश्मा कपूरने चुलत बहिणीसोबतच्या नात्याबाबत कधीही कोणतेही विधान केले नाही. दुसरीकडे रिद्धिमानं २००६मध्ये भरत साहनीशी लग्न केल्यानंतर करिश्मासोबतच्या नात्यावर भाष्य करत म्हटलं होतं की, ‘करिश्मासोबत संवाद साधण्यास माझी हरकत नाही. मी तिच्या दिल्लीतील घरी देखील जाऊ शकते. खरंतर तिची सासू सुद्धा मला फोन करत असते’
उद्ध्वस्त झालेल्या नात्यातून जेव्हा स्वतःला मुक्त करण्याची वेळ येते, त्यावेळे कुटुंबाने संबंधित व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक असते. पण करिश्माच्या बाबतीत तिला स्वतःच्याच लोकांनी त्रास दिल्याचे पाहायला मिळालं.
नात्यात वाढते अंतर
नाते पती-पत्नीचे असो किंवा भाऊ-बहिणीचे, कोणतेही नाते निभावण्यासाठी प्रेम आणि विश्वास असणे सर्वाधिक महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत जेव्हा वाईट काळातून बाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा मनाने खचलेल्या व्यक्तीला फक्त त्याच्या कुटुंबीयांचा पाठिंबा असतो. करिश्मा आणि संजयचा घटस्फोट झाला नव्हता, त्यावेळेस रिद्धिमाने प्रियाशी बोलणे, तिच्या संपर्कात राहणे यावर करिश्माची काहीच हरकत नव्हती.
पण प्रियामुळे करिश्माचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली, त्यावेळेस अभिनेत्रीचे आपल्या बहिणीसोबतचे नाते सुद्धा खराब होऊ लागले. रिद्धिमानं प्रियासोबत भागीदारी करत व्यवसाय पुढे नेण्याचे काम केले, त्यावेळे बहिणींमधील तणाव अधिक वाढल्याचे दिसलं.
मनाने कठोर होणं आवश्यक
करीनाला एका मुलाखतीदरम्यान करिश्माच्या घटस्फोटाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळेस अभिनेत्रीनं स्पष्टपणे उत्तर दिलं की, ‘कठीण काळात ती आपल्या बहिणीला कशा पद्धतीने आधार देत आहे, हे तिला कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही’. करीनाने असेही म्हटलं होतं की, ‘वाईट दिवसांत लोक तिच्या पाठीशी उभे आहेत, यामुळे मी खूश आहे. पण यासोबतच लोक नको-नको त्या चर्चाही करताहेत, त्यांच्यापैकी कोणालाही सत्य माहिती नाहीय’.
करीनाच्या बोलण्यातून हेच दिसतंय की, जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीला सुरक्षितता देणे – त्याला आधार देण्याची वेळ येते, त्यावेळेस मन कठोर ठेऊनच पुढे जायला हवे. म्हणूनच करिश्मा सुद्धा आयुष्यात वाईट गोष्टींचा सामना करत होती, त्यावेळेस करीना तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती.
…तरीही नाते पूर्वीसारखे चांगलं होऊ शकत नाही
करिश्मा आणि रिद्धिमाचं नातं पूर्वीपेक्षा आता चांगलं असलं तरीही भूतकाळात घडलेल्या गोष्टींमुळे दोघींच्याही मनात थोडीशी कटुता आजही असू शकते. यामागील कारण म्हणजे जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य कठीण परिस्थितीचा सामना करत असतो तेव्हा नातेवाईक किंवा अन्य मंडळी त्यांना पाठिंबा दर्शवतात, पण काही जण विषयावर नको-नको त्या चर्चा सुद्धा करतात.
अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या बहिणीचेच वर्तन वाईट असेल तर पीडित व्यक्तीवर जबरदस्त मानसिक परिणाम होतो. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे घरामध्ये वाद-भांडण होणे स्वाभाविक आहे, पण घरातल्या सदस्यानंच विश्वासघात केल्यास मोठा मानसिक धक्का बसण्याची शक्यता असते.