[ad_1]
यासाठी ते इतर औषधी वनस्पतींसह आले, तुळस, गिलॉय यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. कारण हे समस्येचे मूळापासून उच्चाट्टन अर्थात कारणच नष्ट करुन टाकते. विशेषत: आजच्या परिस्थितीकडे पाहता रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी आयुर्वेद प्रभावी उपाय आहे. चला तर जाणून घेऊया आपण रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदाचे सूत्र कसे अवलंबू शकतो?
आपल्या पित्तदोषाप्रमाणे खा
आयुर्वेदानुसार प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या उर्जेने बनलेला असतो. जसे की वात, पित्त आणि कफ. हे त्रिदोष म्हणून ओळखले जाते. हे मनाची आणि शरीराची स्थिती निश्चित करतात. जेव्हा तिन्ही दोष संतुलित असतात तेव्हा शरीर निरोगी राहते. जर या गोष्टींचे संतुलन बिघडले तर एखादी व्यक्ती आजारी पडू शकते. आयुर्वेदानुसार वात दोष असलेल्या लोकांना गरम आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे. तर पित्त दोष असलेल्या लोकांनी दूध, तृणधान्ये आणि भाज्यांसह थंड आणि ताजे पदार्थ खाणे चांगले आहे. या लोकांनी खारट, तळलेले आणि पचनास जड पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. याशिवाय कफ दोष असलेल्या लोकांनी मसालेदार आणि गरम आहार घ्यावा.
(वाचा :- पचनशक्ती व डोळ्यांची नजर मजबूत होण्यासाठी नियमित करा ‘ही’ 5 साधीसोपी योगासने!)
गरम पाणी प्या
आयुर्वेदात घसा व कफ मध्ये मेंदूत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी शरीराला हायड्रेटड ठेवण्यावर जोर दिला गेला आहे. गंभीर रोगांसोबत लढण्यासाठी पाणी आपली खूप मदत करते. तज्ञांच्या मते, डिहायड्रेशन हे शरीरातील द्रवपदार्थाचे असंतुलन असल्यामुळे होते, ज्यामुळे बरेच गंभीर आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत आयुर्वेद गरम पाणी पिण्याचा सल्ला देते. गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत सुरु राहते ज्यामुळे पोटाशी निगडीत आजारांपासून देखील बचाव होतो. गरम पाणी वजन नियंत्रणात ठेवण्यास सुद्धा लाभदायक ठरते.
आयुर्वेदिक काढ्याचं सेवन करा
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे आयुर्वेदिक काढा. हे पाण्यात उकळलेल्या औषधी वनस्पती आणि मसाले यांचे मिश्रण आहे. हळद, तुळशीची पाने, आले, काळी मिरी, लवंग हे काढ्यात वापरल्या जाणारे औषधी मसाले व वनस्पती आहेत. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे शरीराची संरक्षण प्रणाली वाढवतात. कोरोना व्हायरस दरम्यान स्वत:ला निरोगी व सुरक्षित ठेवण्यासाठी दिवसातून एक वेळा तरी कमी प्रमाणात हा आयुर्वेदिक काढा घेणे आवश्यक आहे.
(वाचा :- झटपट वेट लॉससाठी खा उकळवलेल्या भाज्यांची ‘ही’ स्पेशल डिश, जाणून घ्या रेसिपी!)
साजूक तुपात बनवा जेवणं
फॅटी अॅसिडस् आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले तूप आपले आरोग्य निरोगी राखण्यासाठी उत्कृष्ट मार्ग आहे. तुपातील ब्युटिरिक अॅसिडची उपस्थिती कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राखते. तसेच पेशींमधील चरबीयुक्त घटक कमी करते, रोगप्रतिकारशक्तीसोबतच हेल्दी कोलेस्ट्रॉल वाढवते. ज्यामुळे व्यक्तीला ऊर्जावान किंवा एनर्जेटिक वाटते. तुपात अन्न शिजवण्याचा एक फायदा म्हणजे इतर तेलांमुळे आरोग्यास होणार्या धोक्यांपासून बचाव करण्यास मदत होते.
(वाचा :- लठ्ठ बोलून हिणवायचे लोक, नाश्त्यात ‘हा’ सात्विक घरगुती पदार्थ खाऊन घटवलं २४ किलो वजन!)
ध्यानधारणा करुन तणावमुक्त राहा
व्यस्त दिनक्रमामुळे येणारा मानसिक ताण रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम करतो आणि शरीरावर सूज येण्यास कारणीभूत ठरतो. ध्यानधारणा केल्याने ताणतनाव कमी करण्यात खूप मदत मिळते. मन आणि शरीराचे आरोग्य राखण्यासाठी हे असंतुलित दोषांना संतुलनात आणण्याचे कार्य करते. आयुर्वेदानुसार योग शारीरिक ताणतणाव दूर करण्यासोबतच मन देखील शांत करतो. वर नमूद केलेल्या आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब केल्याने फक्त मनच शांत राहणार नाही तर कमजोर होत चाललेली रोगप्रतिकारक शक्ती देखील बळकट होण्यास मदत होईल.
(वाचा :- वजन घटवणारे लोक अनेकदा करतात ‘या’ 8 साधारण चूका, ज्यामुळे राहतात कायम लठ्ठच!)
[ad_2]
Source link