Home मनोरंजन इम्यूनिटी कमजोर करुन शरीर आतून निकामी करतात खाण्यापिण्याचे ‘हे’ 7 पदार्थ, ताबडतोब थांबवा सेवन!

इम्यूनिटी कमजोर करुन शरीर आतून निकामी करतात खाण्यापिण्याचे ‘हे’ 7 पदार्थ, ताबडतोब थांबवा सेवन!

0
इम्यूनिटी कमजोर करुन शरीर आतून निकामी करतात खाण्यापिण्याचे ‘हे’ 7 पदार्थ, ताबडतोब थांबवा सेवन!
गेल्या वर्षभरात कधी नव्हते तेवढे इम्युनिटीचे (immunity boosting) महत्त्व जगाला पटले आहे. लोकांना आता कळून चुकले आहे की केवळ कोरोनाच (corona virus) नाही तर कोणत्याही आजारापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. यामुळेच सध्या जगभरातील लोकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर सुरु केले आहे. पण एकीकडे याकडे लक्ष देताना लोक दुसऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत, ती गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे पदार्थ होय. (how to increase immunity naturally at home)

हे अगदी खरं आहे की जसे काही पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात तसेच काही पदार्थ असे आहेत जे रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्याचे काम करतात. त्यामुळे असे काही पदार्थ आपण आहारात घेत असल्यास ते शक्य तितक्या लवकर आहारातून हद्दपार करणे महत्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया अशाच काही पदार्थांबद्दल जे तुम्ही जास्त खाल्ले नाही पाहिजेत.

इम्यूनिटी कमी करतात एडिटिव्स

कोणत्याही पदार्थाचे जीवन वाढवण्यासाठी अर्थात तो पदार्थ जास्त काळ टिकावा म्हणून त्यात एडिटिव्सचा वापर केला जातो. यातील काही पदार्थ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करू शकतात, मीठ, कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर यांमध्ये कार्बोक्सिमिथाइल आणि सोर्बेट -80 सामन्यत: वापरले गेलेले इमल्सीफायर असतात. यापैकी अनेक खाद्यपदार्थांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत तर होतेच पण पोटाशी निगडीत समस्यांना सद्धा तोंड द्यावे लागते.

हाय फॅट वाले फुड्स

हाय सॅच्युरेटेड डायट रोगप्रतिकारक शक्तीला मोठ्या प्रमाणावर कमकुवत करू शकते. ज्या खाद्यपदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असते ते रोगप्रतिकारक शक्ती आणि पांढऱ्या पेशींच्या कार्याला संथ करून संक्रमणाला चालना देऊ शकतात. Microbiome नावाच्या एका जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार हाय फॅट फूड आतड्यांच्या बॅक्टेरिया मध्ये बदल आणि आतड्यांच्या खोलाशी जाऊन नुकसान पोहचवू शकतात. म्हणूनच अशा प्रकारच्या आहारापासून दूर राहायला हवे.

फास्ट फूड सुद्धा आहे धोकादायक

हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळणारे पदार्थ देखील तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती वर परिणाम करू शकतात. हे पदार्थ रोज खाल्ल्याने सूज येते. Environmental Health Perspective मध्ये प्रकाशित झालेल्या एका संधोधनानुसार फास्ट फूड मध्ये फेथलेट असतात. फेथलेट फास्ट फूडमुळे आतड्याच्या बॅक्टेरियाची कार्ये कमी होऊ शकतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचते, त्यामुळे निरोगी राहायचे असेल आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ द्यायची नसेल तर सतत हॉटेल मधले अन्न खाणे टाळा.

जास्त मीठ असणारे पदार्थ

चिप्स, फ्रोजन डिनर आणि फास्ट फूड सारखे जास्त मीठ असणारे पदार्थ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते आणि हे आजवर अनेक संशोधनामधून सिद्ध देखील झाले आहे. PubMed Central मध्ये 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार हा निष्कर्ष पुढे आला की मिठाच्या अतिसेवनामुळे रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य असंतुलित होऊ शकते आणि आतड्यातील बॅक्टेरिया बदलू शकतात. याच कारणामुळे डॉक्टर सुद्धा आहारात जास्त मीठ न वापरण्याचा सल्ला देतात.

जास्त गोड पदार्थ

अनेकांना गोड खाण्याची खूप सवय आणि आवड असते यामुळे सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. खासकरून ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या शरीरात जास्त साखर निर्माण झाल्यास ब्लड शुगर खूप वाढू शकते. Nature Communication च्या जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका स्टडी नुसार हाय ब्लड शुगर लेव्हल आतड्यांची कार्यक्षमता बिघडवू शकते यामुळे शरीरात मोठा बदल होऊन विविध आजारांसाठी हे निमंत्रण ठरू शकते. म्हणून कमी गोड खा आणि निरोगी राहा.

प्रक्रिया केलेले मांस

तळलेल्या पदार्था सारखेच प्रक्रिया केलेले मांस एज AGEs मध्ये जास्त असते, लोक खात असलेले प्रक्रिया केलेले मांस सॅच्युरेटेड फॅटने भरपूर असते आणि हेच सॅच्युरेटेड फॅट आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला घातक ठरू शकते. 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार जास्त प्रक्रिया केलेले आणि जास्त तापमानात शिजवलेले मांस खाल्ल्याने मोठ्या आतड्याच्या कॅन्सर सारखे धोकादायक आजार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे पदार्थ जास्त खात असाल तर आताच सावध व्हा.

ओमेगा 6 फॅटयुक्त पदार्थ

-6-

तुमच्या शरीराला कार्य करण्यासाठी ओमेगा 6 आणि ओमेगा 3 फॅटची गरज असते. पाश्चिमात्य आहारानुसार त्यात जास्तीत जास्त ओमेगा 6 फॅट असते आणि ओमेगा 3 फॅट कमी असते. अशा प्रकारचे असंतुलन रोगप्रतिकारक शकतो अधिक ढासळण्याला कारणीभूत ठरू शकते. जाणकारांच्या मते जास्त ओमेगा 3 फॅट युक्त आहार खावा आणि ओमेगा 6 फॅटयुक्त आहार कमी खावा यामुळे रोगप्रतिकारक शक्ती जास्त सुधारेल. तर मंडळी या लेखाचा निष्कर्ष हाच आहे की जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती अधिक कमकुवत करायची नसेल तर मीठ, साखर आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा. याचा तुम्हाला फायदाच होईल.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here