Home मनोरंजन healthy diet tips for weight loss: Weight Loss Story : डाएटमध्ये ‘या’ खास पदार्थांचा समावेश करत तरुणाने काही महिन्यांमध्येच घटवलं तब्बल ३२ Kg वजन

healthy diet tips for weight loss: Weight Loss Story : डाएटमध्ये ‘या’ खास पदार्थांचा समावेश करत तरुणाने काही महिन्यांमध्येच घटवलं तब्बल ३२ Kg वजन

0
healthy diet tips for weight loss: Weight Loss Story : डाएटमध्ये ‘या’ खास पदार्थांचा समावेश करत तरुणाने काही महिन्यांमध्येच घटवलं तब्बल ३२ Kg वजन

[ad_1]

​​…अशी झाली सुरुवात

प्रशांत सांगतो, २०१९ नंतर माझं आयुष्य संपूर्ण बदललं. अनेक शारीरिक बदल झाले. आणि माझं वजन वाढतच गेलं. पण बऱ्याच काळानंतर वजन कमी करावं ही जाणीव त्याला झाली. लॉकडाउनमध्ये वजन कमी करण्याचा प्रवास प्रशांतने सुरु केला. त्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी इंटरनेटवर त्याने विविध प्रकारचे व्हिडिओ पाहिले. यामध्ये त्याने बॉक्सिंग मॅचचा देखील एक व्हिडिओ पाहिला होता. ज्यामध्ये मोहम्मद अली आणि लॅरी होम्स एकमेकांच्या विरुद्ध लढत होते. ही बॉक्सिंग मॅच पाहिल्यानंतर वजन कमी करण्याची प्रेरणा त्याला मिळाली. आणि प्रशांतने आपली जीवनशैली, संपूर्ण दिनक्रम बदलण्याचा निर्णय घेतला.

(Tips for losing belly fat and love handles : कंबरेच्या कडांचे व हिप्सचे वाढलेले फॅट झटक्यात कमी करतात ‘हे’ 7 उपाय, Weight loss सुद्धा होईल!)

​असं होतं डाएट

१. नाश्ता

६ ते ८ पांढरी अंडी, ओट्स आणि एक कप ब्लॅक कॉफी

२. दुपारचं जेवण

चिकनचा रस्सा तसेच चपाती किंवा भात. प्रशांत सांगतो की, त्याने जास्त कॅलरीज् कमी केल्या नाहीत.

३. रात्रीचं जेवण

रात्री त्याने कार्ब्सचं सेवन करणं टाळलं. त्याऐवजी चिकन ब्रेस्ट पार्ट, सलाड, लस्सी किंवा दहीचे सेवन त्याने केले.

४. प्री-वर्कआउट मील

व्यायामासाठी अधिक उर्जा हवी म्हणून २ ते ३ ब्राउन ब्रेड तसेच घरगुती पिनट बटरचे सेवन.

५. पोस्ट वर्कआउट मील

पाणी किंवा दूधाबरोबर एक मोठा चमचा प्रोटिन शेक

६. चीट डे मील

हैद्राबादी चिकन बिर्याणी तसेच ड्रायफ्रुट्स आइसस्क्रीम

७. लो कॅलरी फूड

ओट्स डोसा, हर्बसह भाजलेलं चिकन ब्रेस्ट, स्टिर फ्राय भाज्या

(Celeb Weight Loss : सुप्रसिद्ध फॅशन डिझायनरचं ‘या’ आजारामुळे वाढलं होतं वजन, सांगितली थक्क करणारी वेट लॉस जर्नी)

​वर्कआउट

वजन कमी करण्यासाठी डाएटबरोबरच वर्कआउट करणं देखील तितकच महत्त्वाचं आहे. वर्कआउटमुळे शारीरिक रित्या अधिक फिट राहण्यास मदत होते. तसेच अनेक आजारांपासून देखील तुम्ही दूर राहू शकता. प्रशांतने देखील वर्कआउट करण्याकडे अधिक भर दिला. प्रशांत सांगतो की, मी नेहमी दोन मसल्स ग्रुपचं वेट ट्रेनिंग करायचो. तसेच नेहमी २५ मिनिटं कार्डिओ वर्कआउट ठरलेला असायचा. प्रशांत हाच वर्कआउट प्लॅन १० महिने फॉलो करत होता. यामुळे त्याला वजन कमी करण्यासाठी उपयोग झाला. यापुढे हेच वर्कआउट प्लॅन फॉलो करणार असल्याचं प्रशांतचं म्हणणं आहे.

(Quick weight loss: तरुणीने जेवणातून ‘हा’ पदार्थ बाद करून फक्त २ महिन्यांत घटवलं तब्बल 16 Kg वजन!)

​फिटनेस सिक्रेट

वजन कमी करण्यासाठी लोकं विविध डाएट फॉलो करतात. पण झटपट वेट लॉससाठी काही लोकं फॉलो करत असलेलं डाएट दिर्घकाळासाठी फॉलो करू शकत नाहीत. याचा परिणाम म्हणजे तात्पुरता वेट लॉस होण्यास मदत मिळते. मात्र या समस्येचं निवारण पूर्णपणे होत नाही. प्रशांत सांगतो की, असं डाएट तुम्ही फॉलो करा जे तुम्ही नेहमी फॉलो करू शकता. या डाएटचे परिणाम दिसायला थोडा वेळ लागत असला तरी ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. वजन कमी करण्यासाठी अगदी परफेक्ट निर्णय घेणं हेच प्रशांतचं फिटनेस सिक्रेट आहे.

(White Bread : पांढऱ्या ब्रेडमुळे कमकुवत होतंय तुमचं शरीर, ‘या’ गंभीर आजारांचा करावा लागेल सामना)

​जीवनशैलीमध्ये बदल

प्रशांतच्या म्हणण्यानुसार, निरोगी शरीरासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आराम. म्हणूनच नेहमी पूर्ण झोप घेण्याचा निर्णय प्रशांतने घेतला. त्यानंतर त्याने घेतलेला उत्तम निर्णय म्हणजे बाहेरील खाद्यपदार्थ आणि प्रोसेस्ड फूड खाणं टाळणे. तसेच किती दिवस आपण नियमांचे पालन करत आहोत याकडेही त्याने विशेष लक्ष दिलं. वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत प्रशांतला करावी लागली. आजही तो त्यासाठी मेहनत घेत आहे. पण त्याने योग्यवेळी आपल्या जीवनशैलीमध्ये देखील सकारात्मक बदल केले.

NOTE – या लेखामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हालाही लागू पडेल असे नाही. प्रत्येकाची शारीरिक रचना, आरोग्यविषयक समस्या या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा निर्णय घेत असाल तर त्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा, आहारतज्ज्ञांचा आवश्य सल्ला घ्या.

(Weight Loss : सुप्रसिद्ध अभिनेत्रीही लठ्ठपणापासून करू शकली नाही स्वत:चा बचाव, 105 वर पोहचलेल्या वजनाला इतक्या कुल पद्धतीने केलं बाय बाय!)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here