[ad_1]
त्यामुळे रंगावरून सुंदरतेचे मोजमाप होऊच शकत नाही. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही अशाच स्त्रीयांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा वर्ण गोरा नाही पण त्यांच्या सुंदरते समोर गोरा वर्ण सुद्धा फिका पडेल अशी त्यांची सुंदरता आहे. शिवाय या अभिनेत्री आज बॉलीवूडमधील सर्वात टॉप, सेक्सी व मनमोहक सौंदर्य असणा-या अभिनेत्रींच्या यादीत मोडतात.
शिल्पा शेट्टी
इथे शिल्पा शेट्टीचं नाव पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे खरंय की शिल्पाचा नैसर्गिक वर्ण हा डस्की अर्थात सावळा आहे. शिल्पाला आपल्या स्कीन टोन वरून खूप काही ऐकावे लागले होते. समाजाच्या या मागासलेल्या मानसिकतेला असंच अनेक स्त्रियांना सामोरे जावे लागते. पण शिल्पाने धीर सोडला नाही आणि तिने आपली सुंदरता अधिक खुलवली. पण याचा अर्थ हा नाही की तिने गोरे होण्यावर मेहनत घेतली. उलट तिने ती जशी आहे तशाच प्रकारे स्वत:ला प्रेझेंट करून लोकांची तोंड बंद केली. तिने आपल्या फिटनेस वर खूप लक्ष दिले आणि आपले शरीर आकर्षक बनवले. तिच्याकडे सुंदर हास्य सुद्धा आहे आणि अर्थातच त्याचा वापर करून तिने आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवले.
शमा सिकंदर
शमा सिकंदर एक असे नाव आहे जिने सुंदरतेची एक वेगळी व्याख्या सर्वांपुढे मांडली. तिचे स्वत:चे ठाम मत आहे की डस्की टोन असणाऱ्या स्त्रियांनी गोरे होण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे मूर्खपणा आहे. देवाने आपल्याला जसे दिले आहे तसेच राहून आपण स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. तिला देखील तिच्या चेहऱ्यावरून खूप कमेंट्स ऐकाव्या लागल्या होत्या. पण आज तिच अभिनेत्री ‘बीच गर्ल’ म्हणून प्रसिद्ध आहे आणि चाहते तिच्या घायाळ करणा-या अदांसाठी अक्षरशः वेडे आहेत. तिच्या सौंदर्याचे दाखले आज फॅशन जगतात आवर्जून दिले जातात. अॅक्टिंग, फॅशन आणि सौंदर्यवतींच्या यादीत या अभिनेत्रीचे नाव न विसरता घेतले जाते.
(वाचा :- ‘या’ आहेत बॉलीवूडमधील सध्याच्या सर्वात हॉट-बोल्ड व ग्लॅमरस अभिनेत्री, केलंय लाखो हृदयांना घायाळ!)
चित्रांगदा सिंह
या लिस्ट मध्ये चित्रांगदाचे नाव घेतले नाही तर ही लिस्ट अपूर्ण वाटेल, कारण ही एक अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या डस्की टोनच्या जोरावरच बॉलीवूड मध्ये प्रसिद्धी मिळवली आणि आज देखील ती तितकीच प्रसिद्ध आहे. तिचा आत्मविश्वास आणि बोल्डनेस इतका जबरदस्त आहे की त्यातच ती अगदी खुलून दिसते. केवळ दिसण्यावर सुंदरता मोजणे हे देखील चुकीचे आहे आणि अपुरे आहे हे चित्रांगदाने सिद्ध केले. आज कित्येक डस्की टोन असणाऱ्या तरुणींसाठी चित्रांगदाची एक आदर्श आहे.
(वाचा :- ग्लॅमरस अभिनेत्रींवर भारी पडतीये ‘ही’ हॉट-सेक्सी भारतीय क्रिकेटपटू, सोशल मीडियावरही तुफान व्हायरल!)
काजोल
एकेकाळी बॉलीवूड मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या काजोलला आपण कसे विसरू शकतो? जेव्हा सुरुवातीला तिने बॉलीवूड मध्ये पाउल ठेवले तेव्हा अनेकांनी ही जास्त वेळ टिकणार नाही असे म्हटले होते. पण काजोलचा स्वत:वर इतका विश्वास होता की तिने आपली डस्की टोन आपल्या गुणवत्तेच्या मध्ये न येऊ देता इतके हिट चित्रपट दिले आहेत की आजही ते चित्रपट आणि काजोलचा जलवा प्रसिद्ध आहे. तिची मुलगी न्यासा देवगणला सुद्धा अनेकदा तिच्या डस्की टोनमुळे कमेंट्स ऐकाव्या लागतात. पण काजोलने तिला इतका धीर दिला आणि इतके खंबीर केले आहे की येणाऱ्या काळात ती आपल्या आईचा वारसा बॉलीवूड मध्ये न डगमगता नक्की पुढे नेईल.
केवळ सुंदरतेचे उपाय पुरेसे नाहीत
अनेक स्त्रियांना त्यांच्या दिसण्यावरून कमेंट केली की त्या डिप्रेशन मध्ये जातात, अर्थात हे साहजिक सुद्धा आहे. पण अशावेळी केवळ सुंदरतेचे उपाय वापरून स्वत:ची सुंदरता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे चुकीचे आहे. सर्वप्रथम धीर एकवटून स्वत:ला सांगावे की, “हो मी सुंदर आहे. लोक काहीही म्हणोत देवाने मला जे रूप दिले आहे तेच सर्वोत्तम आहे.” जेव्हा तुम्ही मनातून स्वत:ला आवडू लागलं तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास येईल आणि स्वत:हून तुमच्या चेहऱ्यावरचे तेज वाढेल. ज्या प्रकारे शिल्पा शमा, चित्रांगदा आणि काजोलने स्वत: वरचा विश्वास ढळू दिला नाही त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा स्वत:वर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. शेवटी सुंदरता ही कतृत्वात असते दिसण्यात नव्हे..!
[ad_2]
Source link