[ad_1]
नुकत्याच झालेल्या या अभ्यासात लेखक राजीव दासगुप्ता, राकेश पिल्लई, राकेश कुमार आणि नरेंद्र के अरोरा माइकल मॉस यांनी ‘साल्ट शुगर फॅट’ चा उल्लेख केला आहे. या लेखात साखर आणि तंबाखू यांच्या अतिसेवनावर भाष्य केले आहे, तुम्हाला कदाचित माहित नाही पण साखर आणि तंबाखू मेंदूमध्ये एक प्रकारचे रसायन तयार करतात ज्याला डोपामाईन असे म्हणतात. इतकंच नाही तर भारतात साखरेचे सेवन ज्या प्रमाणात केले जाते ते प्रमाण अत्यंत धोकादायक आहे.
आकडेवारी काय म्हणते?
भारतात 2010 मध्ये प्रती व्यक्ती साखरेचा वापर जवळपास 55 ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. तर 2000 साली हा वापर केवळ 22 ग्रॅम इतका होता. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की भारतात प्रत्येक व्यक्ती जवळपास 18 किलो साखर दर वर्षाला सेवन करतो. एवढेच नाही तर भारतात दर वर्षी होणारे 80 टक्के मृत्यू हे मधुमेह, कॅन्सर आणि हृदय रोगामुळे होतात. हे सर्व रोग कुठे ना कुठे साखरेशी निगडीत आहेत.
साखरेमुळे होणारे आजार
टाईप 2 डायबिटीज म्हणजेच शुगर होय. हे खरं जीवनशैली आणि अत्यंत वाईट आहार पद्धतीमुळे निर्माण होते. भारतात जगातील सर्वाधिक टाईप 2 डायबिटीजचे रुग्ण आढळतात. आंतरराष्ट्रीय डायबिटीज फेडरेशनच्या अनुसार 2017 साली भारतात 72 लाख डायबिटीजचे रुग्ण आढळले होते. 2045 पर्यंत डायबिटीजची ही आकडेवारी दुप्पट होईल असा अंदाज आहे. रोज साखरेचे जास्तीत जास्त सेवन केल्याने पेनक्रीयाज इन्सुलिनचे जास्त उत्पादन होते. ज्यामुळे शरीरात असणाऱ्या पेशी इन्सुलिनचा प्रतिरोध करू लागतात.
डायबिटीजमुळे काय होते?
याबद्दल फार कमी लोकांना ज्ञान असते. पण या गंभीर आजराबद्दल माहित असले पाहिजे. डायबिटीज होतो तेव्हा रक्तात ग्लुकोजची मात्रा वाढल्याने रक्तात उपस्थित घटकांचं संतुलन बिघडतं. जसं की रक्तात पांढऱ्या रक्त पेशी (WBC) आणि लाल रक्त पेशी (RBC) असतात. यांच्यासोबतच प्लाझ्मा सुद्धा असतो. ऑक्सिजन सुद्धा रक्त प्रवाहासोबत शरीरात प्रवाहित होत असतं. पण जेव्हा रक्तात ग्लुकोजचा स्तर वाढत जातो तेव्हा लाल रक्त पेशी ज्या जखमेला लवकर भरण्याचं काम करतात. त्या ग्लुकोजची मात्रा वाढल्याने आपलं काम नीट पार पडू शकत नाहीत. पांढऱ्या पेशी ज्या आपल्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करतात त्यांचा प्रभाव सुद्धा अतिग्लुकोजमुळे कमी होतो. यामुळे डायबेटीससोबत इतरही आजार आणि व्याधी शरीराभोवती विळखा घालू लागतात.
किती गोड खावे?
आता तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल मग दिवसातून किती प्रमाणात गोड खावे? तर याचे उत्तर सुद्धा जाणून घेऊ. जाणकारांच्या मते स्वत:ला वाढलेले वजन आणि डायबिटीज सारख्या आजारांपासून वाचवायचे असेल तर आहार मर्यादित प्रमाणात घ्यावा, लक्षात ठेवा की त्याच पदार्थांचे सेवन करा ज्यात नैसर्गिक साखर असावी जसे की फळे भाज्या, धान्य इत्यादी. संशोधक रामिनेनी यांनी आपल्या लेखात लिहिले आहे की निरोगी राहण्यासाठी शक्य तितके साखरेच्या उत्पादनांपासून दूर राहावे आणि जास्ती जास्त नैसर्गिक साखरयुक्त आहाराचा वापर करावा.
रिफाइंड शुगर ऐवजी हे पदार्थ खावेत
आपले किचन अशा पदार्थांनी भरा की तुमची शुगरची क्रेविंग शांत होईल आणि तुम्ही निरोगी देखील रहाल. यात तुम्ही ड्रायफ्रुट्स, धान्य, सीड्स यांचा समावेश करू शकता. जेव्हा तुम्ही रिफाइंड शुगर पासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करणे सोडून द्याल आणि नैसर्गिक पदार्थांचे अधिकधिक सेवन कराल तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त काळ दीर्घ आजारांपासून लांब राहाल.
नोट – ही गोष्ट खरी आहे की रिफाइंड शुगर एका सिगरेट सारखीच नुकसानदायक आहे. पण तरीही तुम्ही तुमच्या आहारात कोणत्याही प्रकारचा बदल करत असाल तर जाणकारांचा सल्ला अवश्य घ्या.
[ad_2]
Source link