[ad_1]
कारण हा उपाय आहे सौंदर्याचा, स्त्रियांसाठी तर ही गोष्ट जास्तच फायद्याची आहे. तूप हे तुमच्या सौंदर्यात भर घालू शकतं आणि हे आम्ही नाही तर आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली आणि जिच्या रूपाचे हजारो चाहते आहेत अशी सोनाक्षी सिन्हा सांगते आहे.
सोनाक्षीने स्वत: केले कबूल
सोनाक्षी नेहमीच आपल्या चाहत्यांशी तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असते. नुकताच तिने इंस्टाग्राम वर एक फोटो पोस्ट केला आणि त्यात तिने सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात हाताशी असलेला पुरेसा वेळ तिने निरनिराळे सौंदर्य प्रयोग करण्यावर घालवला. म्हणजेच तिने स्वत:च्या चेहऱ्यावर विविध घरगुती उपाय करून पहिले. हे सर्व उपाय तिला तिच्या आईने सांगितले होते. या उपायामधुन तिला खूप फायदा देखील झाला. हे उपाय इतके सहज सोपे आहेत की कोणीही स्त्री घरच्या घरी सहज करू शकते असेही तिने सांगितले. या उपायांमुळेच खुललेले आपले सौंदर्य दाखवण्यासाठी तिने हा फोटो पोस्ट केला होता.
तुपाने दाखवली जादू
सोनाक्षीच्या या उपायामध्ये तिने तुपाचा प्रामुख्याने वापर केला होता आणि त्यामुळे तिला आपल्या चेहऱ्यात खूप चांगला व कमालीचा फरक दिसून आला. तिच्या मते तूप इतके प्रभावी ठरेल असे तिला अजिबात वाटले नव्हते. ती म्हणते, “हा असा पदार्थ आहे जो रोज आम्ही आमच्या जेवणात वापरतो, पण मला आजवर कोणीच सांगितले नव्हते की तुपाचा वापर करून इतकी ब्युटी वाढू शकते. माझ्या आईला घरगुती उपायांचे खूप ज्ञान आहे आणि तिने मला याबद्दल एकदा सांगितले होते. लॉकडाऊनच्या काळात वेळच वेळ असल्याने मी हे सगळे उपाय वापरून पहायचे ठरवले आणि मला त्याचा खूपच फायदा झाला, आता हे उपायच मी वापरणार आहे.”
(वाचा :- Hair Growth Tips : मेहनत न करताच होतील लांबसडक केस, फक्त दिनक्रमामध्ये करा ‘हे’ ५ बदल)
तुमचा त्वचेसाठी होणारा वापर
आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की नक्की तुपाचा त्वचेला काय फायदा होतो. चला तर जाणून घेऊ. तूप चेह-यासाठी खूप फायदेशीर असल्याने फेसपॅक लावण्यापेक्षा तुम्ही त्याजागी तूपाचा वापर करू शकता. चेहरा उजळवण्यासाठी तूप अत्यंत प्रभावी ठरते. यामध्ये असलेल्या स्किन व्हाईटनिंगच्या गुणधर्मामुळे त्वचा उजळण्यासोबत चेह-यावर एक प्रकारची चमकही येते. हाच फायदा सोनाक्षीला देखील झाला. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमची त्वचा घरच्या घरी उजळवायची असेल तर आवर्जून तुपाचा वापर करा.
ओठांच्या आरोग्यासाठी
स्त्रियांच्या सौंदर्यशास्त्रामध्ये ओठांना सुद्धा खूप महत्त्व आहे. चेहऱ्यावरचा ओठ हा असा अवयव आहे जो समोरच्याचे लक्ष सहज वेधून घेतो आणि हे ओठ जर सुंदर असतील तर साहजिकच चेहऱ्याच्या सौंदर्यात भर पडते. तुम्ही कदाचित हे वाक्य ऐकंल असावं की ‘पोळी बघावी काठात अन् मुलगी बघावी ओठांत’ म्हणजे पोळीचे काठ पातळ असल्यास खाण्यास मज्जा येते अगदी तसंच ओठ सुंदर असतील तर सौंदर्यात भर पडते. तर तुम्हाला तुमच्या ओठांचे सौंदर्य राखायचे असेल तर तुपाचा वापर तुम्ही करू शकता. ज्या लोकांचे ओठ सतत फुटतात त्यांनी ओठांवर साजूक तूप लावावे. कारण तुपामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होऊन ओठ मुलायम होऊ शकतात. यामध्ये मॉइस्चराइजिंगचे गुणधर्म असल्याने या समस्येपासून तुम्हाला सुटका मिळते.
(वाचा :- ‘या’ आहेत बॉलीवूडमधील सध्याच्या सर्वात हॉट-बोल्ड व ग्लॅमरस अभिनेत्री, केलंय लाखो हृदयांना घायाळ!)
केसांसाठी देखील आहे उपयुक्त
तुपाचा अजून एक वापर म्हणजे तूप हे केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि केस निरोगी राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ज्या लोकांचे सतत केस गळतात त्यांच्यासाठी तूप हे वरदान आहे. शरीरात पोषक तत्वांची कमी असल्यामुळे केस गळतीची समस्या उद्भवू शकते पण यातून वाचण्यासाठी तूप खूप लाभदायक मानले जाते. ज्या लोकांना केस गळतीची समस्या आहे त्यांनी रोज नाभीवर साजूक तूप लावावे. कारण यामध्ये व्हिटॅमिन बी असतं, जे की आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगलं असतं. नाभीवर २ ते ३ थेंब रोज तूप सोडल्याने ते शरीरात शोषलं जातं आणि त्याचा परिणाम आपले केस मजबूत, चमकदार आणि लांबसडक होण्यासाठी होऊ शकतो.
(वाचा :- ग्लॅमरस अभिनेत्रींवर भारी पडतीये ‘ही’ हॉट-सेक्सी भारतीय क्रिकेटपटू, सोशल मीडियावरही तुफान व्हायरल!)
[ad_2]
Source link