Home मनोरंजन हेअर स्टाइल किंग जावेद हबीबने घरी हेअर कलर करणा-या लोकांबाबत केला मोठा खुलासा, दिल्या खास टिप्स!

हेअर स्टाइल किंग जावेद हबीबने घरी हेअर कलर करणा-या लोकांबाबत केला मोठा खुलासा, दिल्या खास टिप्स!

0
हेअर स्टाइल किंग जावेद हबीबने घरी हेअर कलर करणा-या लोकांबाबत केला मोठा खुलासा, दिल्या खास टिप्स!
जावेद हबीब (Jawed habib) यांच्याकडे नेहमी लोकं तक्रार करतात की घरच्या घरी हेअर कलर केल्याने केस खूप गळतात. सोबतच हा प्रश्न देखील जावेद हबीब यांना नेहमी विचारला जातो की घरच्या घरी हेअर कलर करण्याची योग्य पद्धत काय आहे? आज अशाच काही गोष्टींची उत्तरे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, ज्या माध्यमातून हेअर कलरिंगशी निगडीत काही अफवा जावेद हबीब यांनी दूर केल्या आहेत. खरंतर जावेद हबीब यांना घरच्या घरी हेअर कलर करण्याची आयडीचाच अजिबात आवडत नाही.

त्यांचे म्हणणे आहे की असे केल्याने केसांमध्ये इक्वल शाईन आणि कलरिंग आणण्यामध्ये समस्या निर्माण होते. सोबतच हे सुद्धा ते सांगतात की जर पैसे वाचवण्यासाठी किंवा लॉकडाऊनच्या कारण जर तुम्ही हेअर कलर असाल तर काही खास गोष्टींची काळजी घ्या, जेणेकरून केस कमी गळतील.

कलर मिक्सिंग वेळी नक्की घ्या काळजी

जावेद म्हणतात की जर तुम्ही घरच्या घरी कलर करणार असाल तर सर्वात प्रथम तुम्ही कलर मिक्सिंग वर नीट लक्ष दिले पाहिजे. मिक्सिंग जेवढी चांगली असेल तेवढा केसांवर कलर चांगला उमटेल. म्हणून हेअर कलरिंग हे एक आर्ट आहे जे हेअर स्टायलिंग पेकेजचा हिस्सा आहे, आजच्या काळात चांगल्या केमिकल्सने तयार केलेले कलर चांगला हेअर कट आणि केसांची चांगली क्वालिटी मेंटेन करण्याची योग्य पद्धत सर्वच गरजेचे आहे.

हेअर कलरिंग आवडते पण…

जावेद म्हणतात की हेअर कलरिंगला माझा अजिबात विरोध नाही आणि मी स्वत: देखील खूप हेअर कलरचा वापर करतो. लोकं नेहमी मला विचारतात की एवढा हेअर कलर वापरल्यानंतर देखील माझे केस इतके मुलायम कसे? तर याचे उत्तर आहे की मला योग्य पद्धतीने हेअर कलर मिक्स करता येतात. जर हेअर कलरची मिक्सिंग नीट केली तर केसांना जास्त हानी पोहोचत नाही पण जर हे काम नीट झाले नाही तर केसांना खूप हानी होऊ शकते. जावेद या गोष्टीला नकार देत नाही की हेअर कलर लावल्याने केस जास्त गळतात. पण सोबतच हे सुद्धा सांगतात की योग्य प्रकारे कलर केले गेले तर होणारी हानी रोखता येऊ शकते.

कलर आणि हायड्रोजन पेरोक्साइडची मिक्सिंग

जावेद म्हणतात की कलर मिक्स करताना कधीही मनाला वाटेल ते प्रमाण घेऊ नये, त्याऐवजी एक असे भांडे घेतले पाहिजे ज्यात हेअर कलर मिक्स करण्यासाठी योग्य प्रमाण घेण्याकरता निशाण केलेले असतील. हेअर कलरिंग करण्यासाठीचे भांडे वेगळे असते, तुम्हाला बाजारात सहज ही भांडी उपलब्ध होतील. या भांड्यात निशाण बनलेले असतात. 10 मिली, 20 मिली, 30 मिली इत्यादी! हेअर कलर मिक्स करताना तुम्ही या निशानांचे प्रमाण लक्षात घेऊन हेअर कलर आणि हायड्रोजन पेरोक्साईड मिक्स केले पाहिजे.

योग्य ब्लेंडसाठी

हेअर कलर आणि हायड्रोजन पेरोक्साइडची मिक्सिंग करण्यासाठी दोन्ही गोष्टी समप्रमाणात आणि योग्य प्रमाणात घ्यायला हव्यात, हेअर कलर मध्ये हायड्रोजन पेरोक्साइड ऐक्टिवेटर आणि डेव्हलपर सारखे काम करतात, जे तुमच्या केसांवर कलर फिक्सिंग करतात. यामुळे तुमच्या केसांचा रंग सुद्धा तेव्हा फिकट होतो जेव्हा केसांची लांबी वाढते किंवा तुमच्या डोक्यावर नवे केस येतात, म्हणजेच एक प्रकारे हे पर्मनंट हेअर कलर आणण्याचे काम करते. यासाठीच योग्य प्रमाण आणि ब्लेंड याचे ज्ञान असायला हवे.

स्टीलच्या भांड्यांचा वापर करू नये

जावेद हबीब म्हणतात की केसांना लावण्यासाठी कलरची मिक्सिंग करताना अनेक लोकं स्टीलचे भांडे आणि चमचा वापरतात. पण माझा अनुभव असा आहे की असे केल्याने कलरची मिक्सिंग आणि कलर प्रॉपर शेड मध्ये परफेक्शन येत नाही, जे प्लास्टिकच्या भांड्यात हेअर कलर मिक्स केल्याने येते. याचे कारण कदाचित हेअर कलर आणि मेटलचे रीएक्शन असू शकते. परंतु तुम्ही घरच्या घरी कलर मिक्स करताना प्लास्टिकचे हेअर ब्रश, प्लास्टिक बॉल आणि प्लास्टिकच्या चमच्याचाच वापर करावा.

सर्व खेळ वेळेचा आहे

जावेद म्हणतात की केसांना रंगाची योग्य शेड आणण्यासाठी केसांवर रंग लावल्यानंतर फक्त 25 मिनिटांसाठी तो केसांवर ठेवला पाहिजे. यानंतर केस धुवावेत. तसेच 5 मिनिटे मालिश देखील करावी. जावेद हबीब यांच्या म्हणण्यानुसार, 25 मिनिटांसाठी रंग लावणे आणि 5 मिनिटे मसाज करणे हे परफेक्ट हेअर कलर करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तर यावेळी घरच्या घरी हेअर कलर करताना या गोष्टी जरुर लक्षात ठेवा.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here