जगभरात अनेक असे सेलिब्रिटी आहेत जे भारतीय संस्कृतीने प्रेरित आहेत आणि जोया देखील त्यापैकीच एक, तिने आपल्या अनेक मुलाखतीमधून आणि संभाषणातून भारतीय शृंगार शैली आपल्याला आवडत असल्याचे सांगितले आहे. आज आपण या लेखामधून जोयाचे असेच काही सुंदर फोटोज पाहणार आहोत आणि भारतीय शृंगारशैली वरचं तिचं प्रेम जाणून घेणार आहोत.
नव्या नवरीसारखा साज
आपल्या या लुकमध्ये जोया अहसान एकदम नव्या नवरी सारखी दिसते आहे. तुम्ही स्वत:च पहा ना, तिला हा पूर्ण शृंगार किती खुलून दिसतोय नाही का? लाल रंगाची सुंदर साडी, लाल लिपस्टिक, डोक्यावर लाल बिंदी आणि ज्या प्रमाणे नवीन नवरी परिधान करते तशी अंगभर ज्वेलरी, तिच्या या लुकमध्ये केवळ एकाच गोष्टीची कमतरता आहे ती म्हणजे कपाळावर कुंकू, मग तर खरंच जोया हिंदू नववधूप्रमाणे दिसली असती.
या लुकची झाली खुप स्तुती
जोयाने या दोन वेगवेगळ्या लुकमध्ये साडी एकदम भारतीय महिलेप्रमाणे कॅरी केली आहे. पहिला लुक अगदी राजेशाही आणि एलीगेंट आहे, तर दुसऱ्या लुकमध्ये तिने डेली रुटीन मधल्या वर्किंग वूमनचा लुक कॅरी केला आहे. आपल्या या दोन्ही लुक मध्ये जोयाने लो ब’ॅक-बन परिधान केला आहे’. पहिल्या लुकमध्ये केसांत लाल गुलाब खोवला आहे आणि दुसऱ्या लुकमध्ये केस रेग्युलर ठेवून त्यांना क्लच केले आहे. तिचा हा लुक खऱ्या अर्थाने भारतीय शृंगार शैली विषयी तिला असलेले आकर्षण दाखवतो.
एकाच लुकमध्ये पूर्ण भारताची झलक
जोया अहसानचा हा लुक तर पूर्ण भारतात प्रसिद्ध झाला होता. या एका लुकमध्ये तिने भारतातील विविध राज्यांच्या शृंगार शैलीचे एकत्र दर्शन घडवले होते. तिने डोक्यावर बिंदी लावली आहे तर राजस्थानी साफा सुद्धा आहे. आधुनिक लुक देण्यासाठी गॉगल्स आणि इयररिंग्ज परिधान केले आहेत आणि महाराष्ट्रीयन मुलीप्रमाणे नाकात नथ घातली आहे. तिच्या हातात पंजाबी नववधू प्रमाणे बांगड्या दिसत आहे. एवढेच नाही तर आरकंडी स्टाईल साडी ड्रेप केली आहे. एकंदरीत या आगळ्या वेगळ्या भारतीय लुक मध्ये ती अजूनच जबरदस्त दिसत आहे.
भागलपुरी साडीची आवड
जोयाने आपल्या या लुकमध्ये प्लेन स्लीवलेस ब्लाउज सह भागलपुरी सिल्क साडी परिधान केली आहे. जोयाचा चेहरा गोल आहे आणि गाल अगदी गुबगुबीत आहेत. म्हणून तिच्या चेहऱ्यावर केसांचा मधला भांग छान दिसतो. कदाचित जोयाला देखील या गोष्टीची माहिती असावी म्हणूनच की काय तिच्या जवळपास सगळ्याच लुक मध्ये ती भांग असणारी हेअरस्टाईल राहील याची दक्षता घेते. भारतीय साड्यांबद्दल तिला असणारे प्रेम तिने अनेकदा व्यक्त केले आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल देखील तिला सर्व माहिती आहे.
प्रत्येक अदा आहे घायाळ करणारी
येथे आपल्याला जोयाची तीन वेगवेगळी रूपे दिसत आहेत. तिन्ही मध्ये जोयाने साडी परिधान केली आहे परंतु तिन्ही लुक्स मध्ये तिचा अंदाज वेगवेगळा आहे. तिन्ही लुक्स मध्ये साडी परिधान करण्याची शैली आणि शृंगार शैली तर वेगळी आहेच पण बॉडी लेंग्वेज देखील वेगळी आहे. आम्ही नेहमी आमच्या लेखांमधून तुम्हाला सांगत असतो की ब्युटी केवळ कपडे आणि मेकअप पर्यंत मर्यादित नाही आहे. ब्युटी हे तुमचे आंतरिक आणि बाह्य सौंदर्य यांचा संतुलित संगम असतो. जोया हाच नियम फॉलो करते आणि म्हणूनच ती आपले वेगळेपण जपून आहे.
ट्रेडिशनल टू मॉर्डन अंदाज
आपण येथे झोयाची दोन भिन्न आणि एकदम खास पोझेस पाहू शकता. एका लुकमध्ये तिने नेट एम्ब्रॉयडरी साडी व अंबोड्यामध्ये गजरा माळला आहे. तर दुस-या लुकमध्ये जामदानी साडीवर स्लीव्हलेस ब्लाउज आणि गळ्यात फुलांचे दागिने परिधान करून ती खूपच मॉर्डन महाराणी वाटत आहे. या दोन्ही लुकमधून हे स्पष्ट आहे की झोयाला प्रत्येक स्टाईलमध्ये परफेक्ट कसे दिसावे हे चांगलेच माहित आहे.
बाजू बंद, नथ व तगडी
आपण झोयाला येथे दोन भिन्न आणि अगदी खास लुकमध्ये पाहू शकता. पहिल्या लूकमध्ये ती साऊथ इंडियन वधूप्रमाणे सजली आहे. आणि दुसर्या लूकमध्ये ती खूपच मोहक आणि प्रोफेशनल दिसत आहे. हे दोन्ही फोटो पाहून झोयाला भारतीय परंपरा आणि मेकअपची सखोल माहिती आहे हे स्पष्ट होते.
बंगाली गुडिया
झोयाचे हे दोन्ही फोटो पूर्णपणे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आहेत. पण दोन्ही फोटों मध्येही झोया बंगाली लूकमध्ये दिसून येत आहे. जरी आपण मेकअप आणि ड्रेसची बाब बाजूला ठेवली तरी झोयाचे डोळे, स्मितहास्य, देहबोली आणि नजाकत पाहून ती पारंपारिक बंगाली महिला आहे की नाही हा अनुमान लावणे अगदीच कठीण आहे!
प्रत्येक अदा आहे कातील
येथे आपण झोयाचे तीन भिन्न प्रकारातील फोटो पाहू शकता. तिन्हीमध्ये झोयाने साडी परिधान केली आहे पण तिन्हीमधील शैली पूर्णपणे भिन्न आहे. तिन्हीमध्ये साडी नेसण्याची स्टाईल आणि मेकअप बरोबरच तिची बॉडी लैंग्वेजही खूप वेगळी आहे. आम्ही बर्याचदा आपल्याबरोबर शेअर करतो की सौंदर्य फक्त कपड्यांपर्यंत आणि मेकअप पर्यंत मर्यादित नाही. तर खरी सुंदरता म्हणजे आपल्या आंतरिक आणि बाह्य सौंदर्याचा समतोल आहे. झोयाचे ही वेगवेगळी रूपे पाहून आणि तिचा मेकअप तसेच बॉडी लॅंग्वेज समजून आपण आपले सौंदर्य वाढवू शकता.