[ad_1]
(करण मेहरा व निशा रावलसारखेच यांनीही नात्यातील वाद वाईटरित्या आणले चव्हाट्यावर,आयुष्यभर होतात यातना)
रिलेशनशिप एक्सपर्ट डॉन मायकेल यांनी असेही सांगितले की, ‘जोडप्यामध्ये एखादी स्त्री तरुण आणि पुरुष वृद्ध असेल तर त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक परिपक्व असतात. पण कदाचित वयोमानानुसार समोर येणाऱ्या आव्हानांमुळे त्यांच्या नात्यावर परिणामही होतो. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे समजूतदारपणा आणि अनुभव या दोन गोष्टींमुळे कोणतेही नातेसंबंध मजबूत होऊ शकते’.
बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) देखील ही त्यापैकीच एक आहे, जिने याच कारणास्तव जवळपास सहा वर्षे स्वतःच्या लग्नाची (Jay Mehta) माहिती लोकांपासून लपवून ठेवली. अशा परिस्थितीत जेव्हा लोकांना जुहीचे लग्न झाल्याची माहिती कळली, त्यावेळेस पतीच्या वयामुळे तिला बरेच टोमणे ऐकावे लागले.
’पैशांसाठी वृद्धासोबत केलं लग्न’
जुही चावलाने एका मुलाखतीत उघडपणे सांगितले होते की,’जेव्हा पहिल्यांदा माझ्या लग्नाचे फोटो सर्वांसमोर आले होते, त्यावेळेस लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. कारण आमचे लग्न सर्वांसाठीच एक धक्का होता. यापूर्वी कोणालाही माझ्या प्रेमप्रकरणाबाबत माहिती नव्हती तसंच कोणीही माझ्या लग्नाबद्दल काहीही ऐकले नव्हते.
एवढंच नव्हे तर काही लोक जय मेहता यांच्या डोक्यावर केस कमी असल्याचे पाहून त्यांना ‘म्हातारा’ म्हणत होते. पैशासाठी मी एका म्हातार्याशी लग्न केले आहे, असंही मला म्हटलं गेलं होतं’. पण खरं तर जय मेहता यांचे वय ३३ वर्ष इतकं होते आणि अभिनेत्री जुही चावलासोबतचे त्यांचे दुसरे लग्न होते.
समजूतदारपणा आणि वयाचा संबंध
दोन व्यक्तींमधील वयाचे अंतर त्यांच्या नात्यामध्ये कशा पद्धतीने भूमिका निभावतं, असा प्रश्न ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने एका गृहिणीला विचारला होता. यावर तिनं उत्तर दिलं की, ‘आम्ही अरेंज मॅरेज केले होतं आणि माझे पती माझ्याहून वयाने १५ वर्षे मोठे होते. लग्नापूर्वीच मी आपल्या नात्यावर भाष्य करण्यास सुरुवात केली होती. पण आता आम्ही एकत्र राहून २० वर्षांहून अधिक काळ झाला आहे, त्यामुळे मी सुरक्षितपणे सांगू शकते की वय खरोखरच नातेसंबंधासाठी केवळ एक संख्या आहे. ज्याचा समजूतदारपणाशी काहीही संबंध नाही’.
(माधुरी म्हणते ‘माझा पतीच माझ्यासाठी हीरो’, तरुणींच्या स्वप्नातील राजकुमार असाच असतो का?)
वयापेक्षा प्रेमाला प्राधान्य
प्रेम आंधळे असतं, असे कोणीतरी म्हटलंय. कारण काही लोकांसाठी प्रेमापुढे जोडीदाराचे वय अधिक महत्त्वाचे नसते. कदाचित तुमच्या जोडीदाराचे वय ३१ वर्ष आणि तुमचे वय २५ वर्ष असू शकते, पण अशा परिस्थितीत तुम्ही दोघं एकमेकांना किती समजून घेत आहात; ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही एखाद्यावर खरे प्रेम करता त्यावेळेस वयातील अंतरामुळे फारसा फरक पडत नाही.
छोट्या-छोट्या गोष्टींचा एकत्रित निर्णय घेणे अतिशय आवश्यक असते. पण वयातील अंतरामुळे नातेसंबंधांमध्ये अडचणी निर्माण होणारच नाही, असे मुळीच नाही. पण याच अडचणींवर तुम्ही एकत्रितपणे नक्कीच मात करू शकता.
(‘तुझं माझ्यावर प्रेम नाही’ रणबीरने आईला कटु शब्द का सुनावले? नीतू कपूर यांचा ‘हा’ निर्णय योग्य आहे?)
नात्याबाबत स्पष्टता असणं महत्त्वाचे
लग्नासारखा मोठा निर्णय घेण्यापूर्वी दोन व्यक्तींनी सर्वच गोष्टींचा खोलवर विचार करणं आवश्यक आहे. कारण बदलत्या वेळेनुसार अशा काही गोष्टी समोर येतात, ज्यामुळे काही लोकांना फार उशिराने असं वाटू लागते की हे नाते आपल्यासाठी योग्यच नाहीय. परिणामी दोन व्यक्तींमध्ये समस्या अधिक वाढू लागतात.
जर तुम्ही वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत नातेसंबंधात असाल तर मग त्या नात्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार आहात का? याचाही विचार करणं आवश्यक आहे.
जुहीने जेव्हा जय मेहता यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यादरम्यान वेळेनुसार परिस्थिती कशी हाताळायची हे तिला माहिती होते. यामुळेच आजही त्यांच्यातील नाते उत्तम व मजबूत राहिले आहे.
जुही व जय मेहता यांचे हसतेखेळते नाते
[ad_2]
Source link