दुसरीकडे फॅशन व स्टायलिश लुकमुळे या स्टारकिड्सनाही ट्रोलर्सचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. पण न्यासाच्या फॅशन ट्रान्सफॉर्मेशन फोटोंवर नजर टाकल्यास तुम्ही तिचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. कारण कम्फर्टेबल आणि हटके लुकसाठी न्यासाचे स्टाइल स्टेटमेंट एकदम परफेक्ट आहे. न्यासाचा असाच काहीसा स्टायलिश लुक
मलायकाला दिली तगडी स्पर्धा
मायक्रो लेंथ शॉर्ट्स परिधान करण्याच्या यादीमध्ये आतापर्यंत बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) नावाचा समावेश होता. पण फॅशन फेस-ऑफमध्ये काजोलची मुलगी न्यासा (nysa devgan style) या अभिनेत्रीवर भारी पडणार असल्याचं दिसतंय. कारण घराबाहेर पडलेल्या न्यासाचा बोल्ड व हॉट लुक चाहत्यांना पाहायला मिळाला, जो यापूर्वी क्वचितच दिसला असावा. दरम्यान न्यासाचा हा अवतार कूल-कॅज्युअल आणि कम्फर्टेबल लुकचे परिपूर्ण मिश्रण असलं तरीही शॉर्ट्समुळे तिला हॉट लुक मिळाला होता.
असा लुक यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता…
घराबाहेर पडलेल्या न्यासाने सुपर कॅज्युअल लुकची निवड केली होती, ज्यामध्ये मायक्रो लेंथ शॉर्ट्ससह क्रॉप पॅटर्न टॉपचा समावेश होता. हटके लुक मिळावा यासाठी कपड्यांना अॅथलिझर टच देण्यात आला होता. न्यासाने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या टॉपमध्ये कटआउट स्लीव्ह्ज डिझाइन आपण पाहू शकता. डीप प्लंजिंग नेकलाइनमुळे आउटफिटला हॉट लुक मिळाला आहे. एकूणच न्यासाचा हा लुक हटके व आकर्षक होता.
फ्लाँट केली शानदार फिगर
बोल्ड पॅटर्न टॉपसह न्यासाने शॉर्ट्स परिधान केले होतं. याद्वारे तिनं आपली टोंड फिगर फ्लाँट केल्याचं पाहायला मिळालं. डेनिम शॉर्ट्ससह स्लोगन टी-शर्ट, क्रॉप शर्ट किंवा सँडो टीशर्ट परिधान केल्यास कोणालाही कूल आणि क्लासी लुक मिळू शकतो. पण काही लोकांना ही स्टाइल कंटाळवाणी वाटते. पण सध्या याच फॅशनचा ट्रेंड जोमात आहे. कित्येक बॉलिवूड तारकांचा शॉर्ट्स – टॉप लुकच हल्ली पाहायला मिळत आहे. बोल्ड आउटफिट्सपेक्षा अशाच पद्धतीच्या कपड्यांमुळे त्यांना अधिक स्टायलिश लुक मिळतोय. न्यासाचा लुक देखील अगदी तसाच होता.
परफेक्ट स्टायलिंग
न्यासा देवगणने या आउटफिटवर ‘Nike’ फॅशन स्पोर्टी ब्रँडचे पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स मॅच केले होते. ज्यामध्ये काळ्या व निळ्या रंगाचा समावेश होता. तिनं लाइट टोन मेकअप करण्यावर भर दिला होता. हेअरस्टाइल सुद्धा साध्या पद्धतीचीच केली होती. तुम्हाला देखील अशा पॅटर्नचे आउटफिट परिधान करणं पसंत असेल तर न्यासा देवगणचे स्टाइल फॉलो करू शकता. तुम्हालाही नक्कीच स्टायलिश लुक मिळेल.