या एका तासाच्या चर्चेत तज्ज्ञांनी मुलांना खाऊ घातले पाहिजे अशा आवश्यक आहाराविषयी चर्चा केली. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा आपण स्वतः पालक असाल तर येथे उल्लेख केलेल्या या महत्वाच्या टिप्सद्वारे आपण केवळ आपल्या मुलांची रोगप्रतिकारक शक्तीच वाढवू शकत नाही तर येणा-या धोक्यापासून त्यांचे संरक्षण देखील करू शकता.
लोकल फ्रुट्स खाऊ घाला
आपल्या मुलांच्या आहारात कमीत कमी एक हंगामी आणि एक लोकल फळ नक्कीच समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. जर त्यांना हे फळ आवडत नसेल तर मग ते खाण्यास जबरदस्ती करु नका पण त्यातील एक तुकडा तरी ते खातील यासाठी प्रयत्न करा. यामुळे पोटात चांगल्या जीवाणूंचा विकास होईल, ज्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल.
लाडू किंवा शिरा
संध्याकाळी ४ ते ६ वाजण्या दरम्यान प्रत्येक व्यक्तीने हेल्दी आणि पौष्टिक काहीतरी खाणे फार महत्वाचे असते. थोडंसं गोड आणि साधा आहार जसं की चपाती, तूप आणि गुळाचे रोल किंवा साजूक तूपातील शिरा किंवा नाचणीचे लाडू देऊ केल्यास त्यांची उर्जा कायम राहिल. हे त्यांच्या सर्वांगीण आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीची काळजी घेतील. हे मुलांमधील कोर्टीसोलच्या चढाव उतारांची काळजी घेतात.
(वाचा :- डिलिव्हरीनंतर ‘या’ २ ट्रिक्स वापरुन तब्बल २० किलो वजन केले कमी, मिळवली स्लिम-ट्रिम फिगर!)
भात
पचवण्यास सोपे आणि चवदार असलेल्या तांदळाचा भात मुलांच्या आहारात समाविष्ट करणे फार महत्वाचे आहे. तांदूळ हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. तांदळामध्ये बरेच हेल्दी पोषक घटक असतात, त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व प्रकारच्या अमीनो अॅसिडचा समावेश यामध्ये असतो. रात्रीच्या जेवणात डाळ-भात आणि साजूक तूप हा सर्वोत्तम पर्याय असतो.
(वाचा :- World brain tumor day ‘हे’ पदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावध! होऊ शकतो हा भयंकर आजार)
लोणचं किंवा चटणी
मुलांना रोज न चुकता घरी बनवलेले लोणचे, चटणी किंवा मुरंबा द्यावा. या साइड डिश त्यांच्या शरीरातील गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत करतील. तसंच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि त्यांना दिवसभर आनंदी राहण्यास देखील हे चटपटीत पदार्थ मदत करतात.
काजू
जेवणा दरम्यान मुठभर काजू मुलांना एक्टिव्ह राहण्यास आणि उर्जा देण्यास मदत करतील. काजूमध्ये सूक्ष्म पोषक तत्व म्हणजेच मायक्रो न्युट्रिएंट्स असतात ज्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते.
हेल्थ एक्सपर्ट्सकडून जाणून घ्या कशी वाढवावी मुलांची इम्यूनिटी!
त्यांच्या झोपेची वेळ निश्चित करा
झोपेच्या वेळेकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. चांगली झोप ही आपली रोगप्रतिकारक प्रणाली आणि आरोग्य टिकवून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते. हे लठ्ठपणा आणि जंक फूडच्या क्रेविंगला देखील कमी करते. ज्या मुलांची झोपण्याची वेळ निश्चित नसते, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मुख्यतः कायम कमकुवतच असते. रात्री 10च्या सुमारास त्यांची झोपण्याची वेळ निश्चित करावी.
मुलांना जंक फूड देऊ नका
आपल्या मुलास सर्व प्रकारच्या प्रक्रिया केलेल्या किंवा जंक फूडपासून वाचवा. या सर्व खाद्यपदार्थांमध्ये ट्रान्स फॅट भरपूर प्रमाणात असतात आणि त्यात पोषक तत्व मात्र कमी असतात. ते बर्याचदा वजन वाढवतात आणि शरीराला पोषण देत नाहीत. अगदी हेल्दी असल्याचे सांगणारे प्रत्येक पाकिटबंद पदार्थ प्रत्यक्षात अजिबात हेल्दी नसतात.
शारीरिक क्रिया (physical activity)
शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे ही जीवनशैलीची आणखी एक महत्त्वाची सवय आहे, जी तुम्हाला तंदरुस्त आणि एकटिव्ह राहण्यास मदत करते. व्यायाम किंवा मेडिटेशन केल्याने चयापचय प्रक्रिया (metabolism) वाढते आणि तीव्र आजारांची पुनरावृत्ती होण्याचा धोका कमी होतो. मुलांनी छोट्या छोट्या कामांमध्ये व्यस्त ठेवावं जेणेकरून ते दिवसभर अॅक्टिव्ह राहतील. आपण इच्छित असल्यास त्यांना त्यांची स्वत:ची खोली स्वच्छ करण्यापासून एक ग्लास पाणी आणून देण्यास सांगण्यापर्यंतची साधीसोपी कामेही लावू शकता.