[ad_1]
कित्येकदा आई तुम्हाला ओरडते सुद्धा, पण यामध्येही तिचे प्रेमच लपलेले असते. आपण थोड्या वेळासाठीही आईच्या नजरेपासून दूर होता, त्यावेळेस तिचं मन काळजीने भरून येते. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर – खानचंही (Kareena Kapoor Khan) तिच्या लाडक्या तैमुर अली खानवर (Taimur Ali Khan) इतकेच प्रेम आहे. (फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)
(‘दीया और बाती हम’च्या संध्या बींदणीने उद्योगपतीशी का केलं लग्न, बहुतांश तरुणींच्या मनात असेच असतात विचार)
’तैमूरशिवाय एक तासही जगू शकत नाही’
करीना कपूरने सांगितलं होतं की, ‘मातृत्व ही आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक आहे. तैमूर हा माझ्या शरीराचा एक भाग आहे, मी त्याच्याशिवाय एक तासही जगू शकत नाही. मी जिथेही जाते तिथे तो नेहमीच माझ्यासोबत असतो’. एकट्या करीनालाच नव्हे तर जगभरातील प्रत्येक आईच्या आपल्या मुलांबद्दल अशाच भावना असतात.
जेव्हा मुले लहान असतात, तेव्हा आई त्यांना कुशीमध्ये, मिठीमध्येच घेऊन राहते. जसजसे मुले मोठी होतात, तशा त्यांच्या छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करणे ही आईची पहिली प्राथमिकता होऊन जाते. सकाळच्या न्याहारीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, फक्त आईच तुमच्या मागेपुढे फिरू शकते.
आई तुमच्या जेवणाची संपूर्ण काळजी घेते
मुले शाळेत असोत किंवा ऑफिसमध्ये, तुम्ही दिवसभर काय खाल्ले याकडे आई नेहमीच लक्ष देते. शाळेसाठी जेवणाचा डबा भरून देणे, डब्यातील अन्नपदार्थ तुम्ही खाल्ले आहे की नाही, हे तपासून पाहणे; या सर्व गोष्टी आईच करू शकते. जेवण न केल्याबद्दल कधी-कधी ती तुम्हाला ओरडते सुद्धा, यामुळे तुम्हाला कितीही राग आला तरीही आई तुमची काळजी करणं काही केल्या सोडत नाही. आईच्या रागामध्ये तुमच्या आरोग्याची काळजी दडलेली असते. तुम्ही उपाशी राहू नये, तुमच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होऊ नयेत, याच गोष्टीची चिंता तिला कायम असते.
मुलांसाठी सर्वोत्तम कपड्यांची करते निवड
आई एकवेळ स्वतः चांगले कपडे परिधान करणार नाही, पण ती नेहमीच आपल्या मुलांसाठी चांगल्याच कपड्यांची निवड करते. तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयार करण्याची जबाबदारी आईच घेते. तसंच तुम्हाला कोणते कपडे शोभून दिसतील, याबाबतही ती सतत सल्ले देत असते. एखाद्या मित्र-मैत्रिणींकडे आपण पार्टीसाठी जाणार असाल तर आईच तुम्हाला कपडे शोधून देण्यात मदत करते.
(‘मी सॉरी म्हणू शकत नाही..’ शाहिदबद्दल मीराने सांगितलेली ‘ही’ गोष्ट जोडप्यांसाठी असू शकतो मोठा धडा)
तुमच्या यशामुळे आईचा आनंद होतो दुप्पट
आई आपली पहिली गुरू असते. ती आपल्याला सर्व प्रकारचे ज्ञान, समज देण्याचे काम करते. तसंच तुमच्या छोट्या-छोट्या यशामुळेही तिचा आनंद दुप्पट होतो. पहिले पाऊल टाकण्यापासून ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक यश पाहून आई खूश होते. मोठे झाल्यानंतर भलेही आपण आपल्या आईला प्रत्येक आनंद- यशाची गोष्ट सांगत नसाल पण दूर राहूनही ती माय नेहमीच तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असते.
मित्रांची संपूर्ण माहिती ठेवते
आपण कितीही मोठे झालात तरीही आई आपल्याबद्दल नेहमीच काळजी करत असते. आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाणार असाल तर ती सर्वप्रथ तुमच्या मित्र-मैत्रिणींचा फोन नंबर घेते. तसंच तुम्ही वाईट संगतीत अडकणार नाहीत, याचीही आई पुरेपूर काळजी घेते. बाहेरील जग कसे आहे? चांगल्या आणि वाईट गोष्टी आईपेक्षा आणखी कोणीही समजावून सांगू शकत नाही. मुले मोठे झाल्यानंतर बर्याचदा आईवर राग- चिडचिड व्यक्त करतात. पण खरं तर आई तुमचं वाईट गोष्टींपासून रक्षण करण्याचं काम करत असते, हे लक्षात घ्या.
(मोठी चूक घडल्यानंतर करीना कपूरनं घेतली ‘ही’ शपथ, तुमचाही स्वभाव असाच आहे का?)
[ad_2]
Source link