Home मनोरंजन करीना छोटा ड्रेस घालून पोहोचली वडिलांच्या बर्थडे पार्टीमध्ये, सुपर हॉट लुक पाहून चाहते क्लीन बोल्ड

करीना छोटा ड्रेस घालून पोहोचली वडिलांच्या बर्थडे पार्टीमध्ये, सुपर हॉट लुक पाहून चाहते क्लीन बोल्ड

0
करीना छोटा ड्रेस घालून पोहोचली वडिलांच्या बर्थडे पार्टीमध्ये, सुपर हॉट लुक पाहून चाहते क्लीन बोल्ड
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) आकर्षक स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. बेबोला आपल्या स्टायलिश आउटफिट्समध्ये कोणत्याही प्रकारे तडजोड करायला आवडत नाही, हे तिच्या चाहत्यांना चांगलंच ठाऊक आहे. पण तिला कॅज्युअल आउटफिट्स परिधान करणंही फार आवडते. याबाबत बेबोनं सांगितलं होतं की, माझ्याकडे अजूनही गेल्या १० वर्षांतील टी-शर्ट सुद्धा आहेत. मला जुने टी-शर्ट घालायला आवडतं. ते कपडे सध्या ट्रेंडमध्ये आहेत की नाहीत, याचीही मला पर्वा नसते. कारण माझ्यासाठी ते खासच आहेत. आवडता पेहराव म्हणजे टी- शर्ट आणि जीन्स’.

‘फॅशन आयकॉन’ असणारी करीना कपूर खानच्या या वाक्यावरून स्पष्ट दिसतंय की तिला कम्फर्टेबल आणि कॅज्युअल लुक कॅरी करणं सर्वाधिक आवडतं. दरम्यान करीना लग्न किंवा पार्टीसाठी स्पार्कली, शायनी आणि ब्लिंगी पॅटर्नमधील आउटफिट्स परिधान करते. एका मुलाखतीत तिनं सांगितलं होतं की, ‘मी पूर्ण दिवस टाइट फिटिंगचे कपडे परिधान करू शकता नाही. जेव्हा लोक मला पाहणार असतील तेव्हा मी माझ्या स्टाइलची पूर्णपणे काळजी घेते’. याचीच झलक करीनाच्या वडिलांच्या बर्थ- डे पार्टीमध्येही पाहायला मिळाली.

​कपूर बहिणींचा स्टायलिश अवतार

करीनाचे वडील रणधीर कपूर यांचा ७२ वा वाढदिवस २०१९मध्ये साजरा करण्यात आला. वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करीना-करिश्माने डिनर पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये कुटुंबातीलच सदस्य सहभागी झाले होते. करीना कपूर पती सैफसोबत पार्टीमध्ये पोहोचली होती.

पार्टीसाठी करिश्माने व्ही शेप नेकलाइन डिझाइनसह पोल्का डॉट प्रिंट असणारा ए-लाइन पॅटर्नमधील ड्रेस परिधान केला होता. तर बेबोनं स्पार्कली, शायनी आणि शिमरी पॅटर्नमधील ब्लेझर स्टाइल रॅपिंग ड्रेसची निवड केली होती. या ड्रेसमुळे तिला ग्लॅमरस लुक मिळाला होता.

​करीना कपूरचा हॉट लुक

करीनाने परिधान केलेला काळ्या रंगाचा रॅपिंग ड्रेस पूर्णतः चार्म्युज शिमर फॅब्रिकपासून तयार करण्यात आला होता. चार्म्युज हे एक चमकदार आणि वजनानं हलके कापड असते. अशा पद्धतीच्या कपड्यामध्ये क्लिंझिअर (शरीराला चिकटलेले) इफेक्ट देण्यासाठी रेशीम, पॉलिएस्टर आणि रेयॉन यासारख्या मिक्स्ड फॅब्रिकचा फिनिशिंगसाठी वापर केला जातो. करीनानं परिधान केलेले ड्रेसही बॉडीफिट पॅटर्नमधील होता. व्ही शेप डीप नेकलाइन आणि फुल स्लीव्ह्जमुळे आउटफिटला आकर्षक लुक मिळाला होता.

​पार्टीमध्ये करीनाच्याच लुकची चर्चा

ड्रेसमध्ये फ्लॅट मिनी स्ट्रेटकट हेमलाइन डिझाइन जोडण्यात आलं होतं. यामुळे बेबोला हटके लुक मिळालाय. तसंच यातील मायक्रो प्लीट्स डिझाइनमुळे ड्रेस देखील आकर्षक दिसतोय. परफेक्ट लुक मिळावा यासाठी करीनाने डार्क टोन मेकअपसह साइड पार्टेड हेअरस्टाइल केली होती.

​काळ्या रंगाच्या साडीतील मादक लुक

लॅक्मे फॅशन वीक समर रिजॉर्ट २०१८ साठी करीना कपूरने प्रसिद्ध फॅशन डिझाइनर अनामिका खन्नाने डिझाइन केलेली काळ्या रंगाची पॅलेट पॅटर्न साडी नेसली होती. या साडीमध्ये करीना प्रचंड सुंदर दिसत होती. ही शरारा पॅटर्न साडी वजनाने अतिशय हलकी होती. आकर्षक लुक मिळावा यासाठी साडीमध्ये फेदर डिटेलिंग डिझाइन सुद्धा जोडण्यात आलं होतं.

या साडीवर बेबोनं बॅकलेस डिझाइन ब्लाउज घातले होते. बोल्ड नेकलाइन डिझाइन, हॉट स्ट्रॅप्स आणि कटआउट स्लीव्ह्जमुळे ही साडी प्रचंड सुंदर दिसत आहे.

​बोल्ड नेकलाइन डिझाइनर ड्रेस

करीना कपूर बोल्ड व हॉट पॅटर्नमधील आउटफिट्स आत्मविश्वासाने कॅरी करते. करीनाने परिधान केलेला हा काळ्या रंगाचा ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझाइनर शांतनु आणि निखिलच्या कलेक्शनमधील आहे. थाइस स्लिट्स गाउनमध्ये करीनाचा लुक सुंदर दिसतोय.

या ड्रेसवर करीनाने लाइट टोन फाउंडेशन, सेमी-स्मूद लायनर, स्मोकी आईज, लाइट टोन लिपस्टिक, बीमिंग हायलाइटर अशा ब्युटी प्रोडक्ट्सचा उपयोग केला होता. तर स्लीक लॉक पोनी हेअरस्टाइलमुळे तिला परफेक्ट लुक मिळाला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here