[ad_1]
टेलिव्हिजन अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) देखील यापैकीच एक आहे. जिनं करिअरमध्ये बरेच यश मिळवलं पण तिच्या नशीबात प्रेम नसल्याचं पाहायला मिळालं. बिग बॉस 8 दरम्यान उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना यांच्यात प्रेमाचे नाते निर्माण झालं. पण यानंतर आम्हाला एकत्रित आमचे भविष्य दिसत नसल्याचे कारण देत त्यांनी त्यांचे नातेसंबंध संपुष्टात आणले. (फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)
(‘Live In Relationship’दरम्यान मी नात्याबाबत गंभीर झालो’ आमिरवर असा होता किरण रावचा प्रभाव)
’मला संसार मांडायचा नव्हता’
कित्येक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणारे उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना यांनी बरीच लोकप्रियता मिळवली आहे. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. नच बलिए या कार्यक्रमादरम्यान त्यांनी साखरपुडा देखील केला. पण दोन-तीन महिन्यांनंतर दोघांनीही आपले नाते संपुष्टात आणले. करिश्माने याबाबत सांगितलं की, ‘कधी-कधी चुकीच्या गोष्टींचं कोणाकडे उत्तर नसते. कधीकधी दोन अद्भुत व्यक्ती एकत्र राहू शकत नाहीत. आमच्या बाबतीतही असेच झाले.
उपेन खूप छान व्यक्ती आहे. आम्ही दोघांनीही एक मजबूत नाते पुढे नेले, पण जसे आम्हाला हवे होते तशा गोष्टी घडल्या नाहीत. मला संसार मांडायचा नव्हता, असे मुळीच नव्हते तसंच मी एका नात्यातून दुसऱ्या नात्यात उडी मारत आहे, असंही नाहीय. आम्हा दोघांनाही एकमेकांची सोबत हवी होती. पण आम्हाला आमचे भविष्य एकमेकांसोबत दिसत नव्हते. म्हणूनच वेगळं होणंच योग्य होतं’. करिश्मा आणि उपेनच्या ब्रेकअपला बराच काळ लोटला. पण यावरून हेच दिसतंय की घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे नेहमी यातना मिळतात.
(‘मी त्याच्याशिवाय तासभरही जगू शकत नाही’ करीनाच्या ‘या’ शब्दांमध्ये तैमूरसाठी दडलंय अतूट प्रेम)
नात्यात घाई करणं योग्य नव्हे
उपेन पटेलनंतर करिश्मा तन्नाचं नाव पर्ल व्ही पुरीशी जोडण्यात आलं होतं. हे नातं देखील लवकरच संपुष्टात आले होते. करिश्मा तन्नाचे दोन्ही ब्रेकअप हेच दर्शवतात की घाईघाईने निर्माण केलेल्या नातेसंबंधांना कोणतेही भविष्य नसते. करिश्मा आणि उपेन यांच्यात गोष्टी व्यवस्थित चालल्या असतील पण भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास हे दोघंही तयार नव्हते.
बर्याचदा लोकांना प्रेमात पडायचे असतं आणि नात्यात पुढे देखील जायचे असते. पण यादरम्यान नाते दीर्घ काळापर्यंत टिकवून ठेवणे खरंच कठीण असते. करिश्मा तन्ना आणि उपेन पटेलच्या नात्यातही असेच घडले होते. दोघांनीही एकत्र येऊन गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्यांचं नाते वाचू शकले असते.
भावनेच्या भरात लग्नाचा निर्णय घेऊ नका
उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा आपल्याला विभक्त व्हावे लागले; याचा विचारही दोघांनी केला नसेल. दोघांनी केवळ भावनेच्या भरात लग्नाचा निर्णय घेतला. दोन महिन्यांनंतर त्यांच्या नात्यात समस्या निर्माण होऊ लागल्या.
दोन लोक जेव्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतात, त्यावेळेस तो निर्णय पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील त्यांनाच करावा लागतो. पण चुकीच्या कारणांच्या आधारे लग्नासारखा मोठा निर्णय घेणे देखील योग्य नव्हे. जर आपण खरोखरच आपल्या जोडीदाराशी लग्न करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम आपण नाते प्रामाणिकपणे निभावणार आहात की नाहीत? याकडे लक्ष द्या.
नाते निभावण्यासाठी काय केले पाहिजे?
नातेसंबंध संपुष्टात आणणं हे कोणत्याही समस्येचे निराकरण नव्हे. पती-पत्नी असो किंवा प्रेयसी- प्रियकर, कोणत्या-न्- कोणत्या कारणांमुळे दोघांमध्ये वाद होतातच. समस्यांविरोधात लढा देणे आणि समस्या हाताळण्यास आपण शिकलात तर तुमचे नातेसंबंध योग्य मार्गावर येऊ शकते.
समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
ज्या लोकांना असे वाटते की नात्यातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास गोष्टी आपोआप सुधारतील, तर तुम्ही गैरसमजुतीत आहात. यामुळे तुमचे नाते संपुष्टात येण्याची शक्यता अधिक असते. हवे असल्यास आपण नात्यातील समस्या तुमच्या जवळच्या मित्रांकडे, कुटुंबीय किंवा कौटुंबिक सल्लागाराच्या मदतीनं सोडवू शकता.
[ad_2]
Source link