[ad_1]
करिश्माची लेक समायरा कपूर आपल्या स्टायलिश लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या स्टाइलमध्ये मॉडर्न, पारंपरिक, बोल्ड टच देखील अधे-मधे पाहायला मिळतो. नुकतेच तिचा मोहक लुक पुन्हा एकदा नेटकऱ्यांना पाहायला मिळाला. चला पाहुया झलक… (फोटो सौजन्य – योगेन शाह)
(शाहिद-मीराच्या लग्नात जेनेलियाने घातला बोल्ड व सुंदर ड्रेस, नववधूला सोडून सर्वांची नजर खिळली रितेशच्याच पत्नीवर)
कपूर बहिणींवर भारी पडला समायराचा स्टायलिश लुक
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि करीना कपूर – खान (Kareena Kapoor Khan) यांचे वडील रणधीर कपूर यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की, ते आपले जुने घर विकून नवीन घरामध्ये राहायला जाण्याची तयारी करत आहेत. त्यानुसार नुकतेच रणधीर कपूर आपल्या नवीन घरामध्ये राहायला देखील गेले. नवीन घरामध्ये त्यांनी पूजेचं आयोजनही केलं होतं. यावेळेस कपूर बहिणींव्यतिरिक्त त्यांची पत्नी बबीता आणि ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर या देखील हजर राहिल्या होत्या. दरम्यान करिश्मा कपूरच्या लाडक्या लेकीचा यावेळेस हटके लुक पाहायला मिळाला. तिनं आपल्या स्टायलिश अवताराने सर्वांनाच तगडी स्पर्धा दिल्याचं पाहायला मिळालं.
करिश्मा कपूर लुक होता मोहक व सुंदर
अभिनेत्री करिश्मा कपूरने या कौटुंबिक कार्यक्रमासाठी कॉटन फॅब्रिकपासून तयार केलेला पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये व्ही शेप नेकलाइन आणि फुल स्लीव्ह्ज डिझाइन आपण पाहू शकता. कुर्त्यावर प्रिंट ऑन प्रिंट पॅटर्नमध्ये फ्लोरल मोटिफ्स वर्क तयार करण्यात आलं होतं. या कुर्त्यावर तिनं मॅचिंग पायजमा परिधान केला होता.
(आकाश अंबानीच्या पार्टीत या सौंदर्यवतीमुळे शाहरुखचा जीव झाला येडापिसा, तिच्याकडेच पाहत होता एकटक)
समायराचा सुपर क्युट लुक
आजोबांच्या नवीन घराला भेट देण्यासाठी तसंच पूजेमध्ये सहभागी होण्यासाठी करिश्मा प्रमाणेच तिची लाडकी लेक समायराने (samaira kapoor) देखील पारंपरिक पोषाखाची निवड केली होती. तिनं चिकनकारी कुर्त्यासह पांढऱ्या रंगाचा फ्लेअर्ड पायजमा परिधान केला होता.
(सोनम कपूरच्या मेंदी सोहळ्यात करिश्माने घातला होता सुंदर लेहंगा, मोहक सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ)
करीना कपूर- खानचा मोहक लुक
एकिकडे करिश्मा कपूरची लेक समायरा प्रचंड सुंदर दिसत होती तर दुसरीकडे मावशी करीना कपूरचा मोहक लुक यावेळेस पाहायला मिळाला. या कार्यक्रमासाठी करीनाने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. यावर तिनं कमीत कमी मेकअप करण्यावर भर दिल्याचं दिसलं. कपाळावर लावलेल्या लाल रंगाच्या टिकलीमुळे तिचे रूप मोहक दिसत होतं.
(आलिया भटने बहिणीच्या लग्नात घातला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, सर्वजण तिलाच पाहत होते एकटक)
नीतू-रिद्धिमानेही दर्शवली उपस्थिती
नीतू कपूर यांनी आपली मुलगी रिद्धिमा कपूर -साहनीसह या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवली होती. या माय-लेकीची जोडी नेहमी प्रमाणेच प्रचंड स्टायलिश दिसत होती. नीतू कपूर यांनी पेस्टल शेडमधील ड्रेस परिधान केला होता. तर रिद्धिमाने स्वतःसाठी टॉप-जीन्स लुकची निवड केली होती.
(माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका)
[ad_2]
Source link