[ad_1]
पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला संकटामधून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक प्रसंगाला हिंमतीने सामोरं जाता. कोणताही प्रसंग आपल्यावर ओढावला की न डगमगता तुम्ही त्याला सामोरं गेलं पाहिजे. अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करिना कपूर यांच्यामधील नातं देखील असंच काहीसं आहे. एका मुलाखतीदरम्यान करिनाने करिश्मावर ओढावलेली संकटं आणि त्यादरम्यान तिची झालेली अवस्था याबाबत खुलासा केला. बहिण करिश्माला दुःखामध्ये पाहून करिना स्वतः कोलमडली नाही. तिने हिंमतीने प्रत्येक समस्येचा सामना केला आणि आजही करतेय.
(फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)
‘मी तिला रात्र-रात्रभर रडताना पाहिलं आहे’
करिना आणि करिश्मा यांचं अतूट नातं साऱ्यांनाच ठाऊक आहे. दोघीही एकमेकींबाबत नेहमीच भरभरून बोलताना दिसतात. एका चॅट शोदरम्यान करिनाने करिश्माबाबत काही खुलासे केले होते. करिनाने सांगितले होतं की, ‘मी माझ्या बहिणीला रात्र-रात्रभर आईजवळ बसून रडताना पाहिलं आहे. ती म्हणायची की लोकं मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. मी लपून हे सारं पाहत असायचे. माझ्यावर देखील याच परिस्थितीचा परिणाम होऊ नये म्हणून ती माझ्यासमोर हे सारं बोलणं टाळायची. माझा जवळचा माणूस जर दुःखात असेल तर ती गोष्ट मला देखील खूप त्रास देते.’ करिनाने आपल्या बहिणीला अनेक कठिण प्रसंगांचा सामना करताना पाहिलं आहे.
संघर्ष करायला शिकले
बहिणीचा संघर्ष पाहून अभिनेत्री बनण्यापासून तु स्वतःला रोखलं होतं का? असा प्रश्न जेव्हा करिनाला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, ‘अजिबात नाही. मी माझ्यावर ओढावणारी कोणतीही परिस्थिती हाताळू शकते. कितीही दुःख असूदे अथवा मला कोणी कमीपणा दाखण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी हार मानत नाही. मी प्रत्येक परिस्थितीशी लढते आणि लढेन. कारण मी माझ्या आई आणि बहिणीला संघर्ष करताना पाहिलं आहे. मी देखील त्यासाठी तयार आहे.’ आपल्या जवळच्या माणसांचा संघर्ष पाहून करिना कोलमडली नाही. ती अधिकच मजबूत होत गेली.
खूप काही शिकायला मिळालं
करिनाच्या बोलण्यामधून हे सिद्ध होतं की ज्या व्यक्ती कठीण प्रसंगांचा सामना करतात त्या व्यक्ती आयुष्यभरासाठी मनाने अधिक मजबूत होतात. करिना देखील प्रत्येक परिस्थितीचा हिंमतीने सामना करते. पण काही जणं मात्र एखादं संकट ओढावलं की डगमगून जातात. कुटुंबामधील सदस्यांना दुःखामध्ये पाहून काहीजणं खूप काही शिकतात. करिनाच्या बाबतीतही तसंच घडलं. पण काहीजणं परिस्थितीला घाबरून नकारात्मक विचार करण्यास सुरुवात करतात. मात्र नकारात्मक विचार करणं चुकीचं आहे. आपल्याच व्यक्तींना दुःखामध्ये पाहून खूप काही शिकता येतं हे देखील तितकच खरं आहे.
भावनात्मक विचार
आपल्या जवळच्या व्यक्तींना दुःखामध्ये पाहणं कोणालाच आवडत नाही. जेव्हा तुम्ही संपूर्ण कुटुंबावर ओढावलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीला सामोरे जात असता तेव्हा तुमच्यामध्ये देखील एक वेगळी हिंमत येते. कठीण प्रसंग आपल्यावर ओढावल्यानंतर कशा पद्धतीने भावनिक विचार करावा हे समजणं देखील महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीमध्ये नकारात्मक विचारांपासून दूर राहणं गरजेचं आहे. कुटुंबावर एखादा प्रसंग ओढावला असेल तर पुढील भविष्यासाठी ठोस निर्णय घेण्यास तुम्ही सक्षम असणं महत्त्वाचं आहे.
परिस्थितीशी सामना करणं
एखादी व्यक्ती जर कठीण प्रसंगांमध्ये असेल तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये असंख्य विचार येतात. पुढील भविष्यातील प्रश्न सतत भेडसावतात. अशावेळी आता सगळं काही संपल असं देखील काही जणांना वाटतं. पण अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम तुम्ही तुमच्या भावंडांची समजूत काढता. या सगळ्या परिस्थितीमध्ये शांत राहून परिस्थितीचा सामना कसा करावा हे तुम्ही शिकता. तसेच कोणातीही प्रसंग आपल्यावर ओढावला तरी त्यातून बाहेर कसं येता येईल याचा मार्ग देखील तुम्ही शोधू लागता. भविष्यामध्ये एखाद्या कठीण प्रसंगांचा तुम्हाला सामना करावा लागला तर त्याला हिंमतीने सामोरं जा.
सकारात्मक विचार करा
कठीण प्रसंगांचा सामना करत असताना काही लोकं नकारात्मक विचार करण्यास सुरुवात करतात. पण परिस्थितीशी दोन हात करायचे असतील तर नेहमीच सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. सकारात्मक विचारांमुळे परिस्थितीशी सामना करण्याचं बळ तुम्हाला मिळतं. तसेच मानसिक ताणही थोड्याफार प्रमाणात कमी होता. सकारात्मक विचारांमुळे तुम्ही प्रत्येक निर्णय देखील योग्य पद्धतीने घेऊ शकता. नकारात्मक पद्धतीने विचार करणं वेळीच थांबवा. याचा तुमच्या भविष्यावर देखील परिणाम होऊ शकतो.
[ad_2]
Source link