मनीष मल्होत्राच्या आउटफिट्सव्यतिरिक्त या बहिणींना जीन्स व टी-शर्ट परिधान करणंही सर्वाधिक आवडतं. सर्वसामान्यांप्रमाणे या दोघीही एकमेकींचे कपडे वापरतात. म्हणूनच बेबो आणि लोलो जेव्हा एखाद्या कार्यक्रमात एकत्रित उपस्थित दर्शवतात, त्यावेळेस जवळपास दोघींचाही लुक एकसारखाच दिसतो. असेच काहीसे चित्र करीना कपूर आणि सैफ अली खानच्या लग्नातही पाहायला मिळालं होतं. (फोटो – इंडिया टाइम्स)
नववधूच्या बहिणीचा सुंदर लुक
करीना कपूर आणि सैफ अली खाननं २०१२मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. बेबोनं घेतलेल्या लग्नाच्या निर्णयाबद्दल कपूर कुटुंबीयांना आश्चर्य वाटलं होतं, पण दुसरीकडे करीना लग्नबंधनात अडकणार असल्यानं घरामध्ये आनंदाचंही वातावरण होतं. सैफ आणि करीनाने अतिशय साधेपणात कोर्ट मॅरेज केलं.
यानंतर कुटुंबीय आणि खास मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दोघांनी लग्न सुद्धा केलं. यावेळेस करीनानं सुंदर ब्रायडल लेहंगा परिधान केला होता, हाच पोषाख तिची सासू शर्मिला टागोर यांनी त्यांच्या लग्नात परिधान केला होता. हा रॉयल लेहंग्यामध्ये करीना प्रचंड सुंदर दिसत होती तर नववधूची बहीण करिश्मानेही आकर्षक ड्रेस घातल्याचं पाहायला मिळालं होतं.
मनीष मल्होत्राने डिझाइन केला होता ड्रेस
करीनाच्या लग्नासाठी करिश्माने प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेला आयव्हरी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. सिल्क-फ्लॉस, टिशू आणि चार्मिस सॅटन यासारख्या फॅब्रिकपासून हा ड्रेस डिझाइन करण्यात आला होता. यामुळे ड्रेसला चमकदार लुक मिळाला आहे.
आउटफिटवर सोन्याच्या तारांपासून कशीदाकारी एम्ब्रॉयडरी काढण्यात आली होती. राउंड नेकलाइन असणाऱ्या या ड्रेसमध्ये फुल स्लीव्ह्ज डिझाइन, हेमलाइनवर रूंद बॉर्डरसह सीक्वेंस पट्टीही जोडण्यात आली होती.
ड्रेसमधील आकर्षक ओढणी
पारंपरिक आउटफिटमध्ये नेट सिल्क दुपट्ट्याचा समावेश करण्यात आला होता. ओढणीवर फ्लोरल प्रिंट आपण पाहू शकता. तसंच मायक्रो प्रिंट बुटी डिझाइनमुळे ओढणीला आकर्षक लुक मिळाला आहे.
या ड्रेसवर करिश्माने स्टेटमेंट ज्वेलरी परिधान केली होती. यामध्ये पन्ना आणि सोन्यापासून तयार करण्यात आलेले नेकलेस, मॅचिंग ईअररिंग्ज आणि झुमक्यांचा समावेश होता. ड्रेस तसंच दागिन्यांमुळे करिश्माचं सौंदर्य अधिकच खुलले होते.
भावाच्या लग्नातील कमाल लुक
भाऊ अरमान जैन आणि अनीसा मल्होत्राच्या लग्नामध्येही करिश्माचा लुक प्रचंड मोहक व सुंदर दिसत होता. लग्नसोहळ्यासाठी करिश्मानं प्रसिद्ध फॅशन हाउस रॉ मँगोनं डिझाइन केलेली सिल्कची साडी नेसली होती. ही साडी जरी-जरदोजी पॅटर्नमधील होती.
साडीवर चांदीच्या तारांसह सुंदर-सुंदर पॅच डिझाइन करण्यात आले होते. सोन्याच्या तारांपासून तयार करण्यात आलेली रूंद बॉर्डर सुद्धा साडीवर जोडण्यात आली होती. या सुंदर साडीवर करिश्मानं हाय नेकलाइन डिझाइन ब्लाउज घातलं होतं. साडीवर तिनं सोन्याचे चोकर नेकलेस, पन्ना राणी हार, सोन्याचे झुमके असे दागिने घातले होते.