[ad_1]
२०२१च्या एप्रिल महिन्यात किर्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. आणि या पोस्टमधून तिने सांगितलं की, ‘मी आणि माझा पती साहिल सहगल लग्नाच्या पाच वर्षानंतर विभक्त होत आहोत.’ किर्तीसाठी हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. तिने एका मुलाखतीदरम्यान याबाबत खुलासा केला.
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम, इंडिया टाइम्स)
‘लग्नामुळे माझ्या आयुष्यात अशांतता पसरली होती’
किर्तीने पती साहिलपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर एका मुलाखतीदरम्यान आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. किर्ती म्हणाली, ‘माझ्या आयुष्यामध्ये साहिलची खूप मोठी भूमिका होती. पण लग्नानंतर माझं सुखच नाहीसं झालं हे देखील तितकच खरं आहे. मी आमचं नात टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण जेव्हा मला कळालं की माझं सुख, आनंद सारं काही हिरावून घेतलं जात आहे तेव्हा आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी कठीण निर्णय घ्यावा लागणार होता.’ किर्तीसाठी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेणं कठीण होतं.
कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नाही
किर्ती पुढे म्हणते, ‘जेव्हा मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या कुटुंबियांना हा निर्णय मान्य नव्हता. वडिलांनी मला पाठिंबा दिला. मात्र हे नातं वाचवण्यासाठी तू आणखी प्रयत्न कर असं मला माझी आई सतत सांगत होती.’ किर्ती यादरम्यान पूर्ण खचून गेली होती. फक्त किर्तीच नव्हे तर असे अनेक जोडपी आहेत ज्यांना या समस्येचा सामना करावा लागतो. काही जोडपी तर घटस्फोटाच्या प्रक्रियेचा त्रास होऊ नये म्हणून आहे त्याच परिस्थितीमध्ये राहणं पसंत करतात.
विभक्त होणं अधिक चांगलं
वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीने एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे. जेव्हा या नात्यामध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्याची वेळ येते तेव्हा काही गोष्टी जमवून घेणं कठीण होऊन बसतं. पण काही जणं परिस्थितीशी जुळवून घेत पुढे जातात. पण वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही सुखी, आनंदी नसाल तर कधीही एकमेकांपासून विभक्त होणं अधिक चांगल असतं. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींवरून पती-पत्नी वाद विवाद, भांडण करू लागतात. त्यामुळे या परिस्थितीशी सामना करायचा नसेल तर विभक्त होण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता.
आनंदी राहण्याचा प्रत्येकाल हक्क आहे
किर्तीने या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, ‘लग्नानंतर मला हे जाणवायला सुरुवात झाली होती की प्रेम हे ओवररेटेड आहे. दोन व्यक्तींमध्ये जर एकमेकांविषयी प्रेम भावना असेल आणि दोघं मनाने, हृदयाने एकमेकांशी जोडले गेले असतील तरच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घ्यावा.’ किर्तीच्या बोलण्यामधून हे स्पष्ट होतं की तिला या नात्यामध्ये खूप काही सहन करावं लागलं. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी एकमेकांवर अवलंबून असतात. पती-पत्नीच्या नात्यामध्ये जर आनंद, सुखच नसेल तर एकत्र राहणं कठीण होऊन बसतं. योग्य वेळी योग्य तो निर्णय तुम्ही घेणं आवश्य आहे. कारण आनंदी राहण्याचा हक्क हा प्रत्येकाला असतो.
(‘मी त्याच्याशिवाय तासभरही जगू शकत नाही’ करीनाच्या ‘या’ शब्दांमध्ये तैमूरसाठी दडलंय अतूट प्रेम)
नातं समजणं महत्त्वाचं
पती-पत्नीसाठी घटस्फोटाचा निर्णय घेणं कठीण असतं. मात्र आयुष्यभर तणाव, दुःखामध्ये राहण्यापेक्षा काही जणं विभक्त होण्याचा निर्णय घेतात. किर्तीने जेव्हा घटस्फोट घेत असल्याचा निर्णय आपल्या कुटुंबियांना सांगितला तेव्हा तिच्या आईने तिला नातं टिकवण्याचा आणखी प्रयत्न कर असा सल्ला दिला. पण तिच्या वडिलांनी तिला साथ दिली. नात्यामध्ये समजूतदारपणा, विश्वास खूप महत्त्वाचा असतो. मात्र यापैकी कोणतीच गोष्ट तुमच्या नात्यामध्ये घडत नसेल तर वेळीच एकमेकांशी संवाद साधत नातं टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.
(तुमचे व जोडीदारामधील प्रेम कमी झालंय का? जाणून घ्या यामागील मोठी कारणे)
[ad_2]
Source link