Home मनोरंजन आई-बाबा बनण्यात सतत येतंय अपयश? मग आधी ‘ही’ माहिती जाणून घ्या नंतर ट्राय करा!

आई-बाबा बनण्यात सतत येतंय अपयश? मग आधी ‘ही’ माहिती जाणून घ्या नंतर ट्राय करा!

0
आई-बाबा बनण्यात सतत येतंय अपयश? मग आधी ‘ही’ माहिती जाणून घ्या नंतर ट्राय करा!

[ad_1]

गरोदर होण्याआधी किंवा कंसीव्ह करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांच्या मनात हा प्रश्न येतोच की गरोदर होण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? किंवा दिवस कोणता? असे म्हणतात की महिन्यातील काही असे दिवस असतात जेव्हा स्त्रियांची फर्टिलिटी खूप चांगल्या स्थितीमध्ये असते आणि ती सहज कंसीव्ह करू शकते. जर तुम्हाला त्या ठराविक दिवसांबद्दल माहिती मिळाली तर तुम्हालाही कंसीव्ह करण्यात मदत मिळू शकते. कंसीव्ह करण्याची योग्य वेळ जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपले मासिक चक्र समजून घेतले पाहिजे.

जर तुमच्या पार्टनरचा स्पर्म काउंट चांगला आहे आणि फटाईल पीरियड मध्ये सेक्स करण्याआधी आणि ओव्युलेशनच्या दोन दिवस आधी आणि ओव्युलेशनच्या दिवशी सेक्स केल्याने तुम्हाला लवकर कंसीव्ह होण्यात मदत मिळते. तुम्ही समजून घ्यायला हवे की तुम्ही कधी गरोदर राहू शकता आणि गरोदर राहण्यासाठी तुम्ही कधी सेक्स केला पाहिजे, चला तर जाणून घेऊ की सहज कंसीव्ह करण्यासाठी तुम्हाला काय गोष्टी माहित असायला हव्यात.

सगळं ओव्युलेशनवर अवलंबून आहे

असे म्हणतात की कंसीव्ह करण्यासाठी ओव्युलेशनचा दिवस सर्वात योग्य असतो. म्हणतात की सेक्सची वेळ आणि ओव्युलेशन यांचा संबंध असतो. रिप्रोडक्टिव मेडिसिन ऑफ जरनल यांच्या संशोधनानुसार केवळ ओव्युलेशनचाच दिवस नाही तर अन्य दिवशी सुद्धा सहज कंसीव्ह होता येते. मुख्य गोष्ट म्हणजे ओव्युलेशनच्या एक दिवस आधी सेक्स केल्याने सहज कंसीव्ह करता येते. या वेळेला स्पर्म जवळ ऐग्जना फर्टिलाइज करण्याकरता पुरेशी वेळ असते.

कधी ट्राय करावे?

याशिवाय ओव्युलेशनच्या दोन दिवस आधीची वेळ देखील कंसीव्ह करण्यासाठी योग्य असते. ओव्युलेशनच्या दोन दिवस आधी सेक्स केल्याने देखील स्त्री गरोदर राहू शकते. ओव्युलेशनच्या तीन ते चार दिवस आधी सेक्स केल्याने सुद्धा ओव्युलेशनच्या दिवसाच्या तुलनेत कंसीव्ह करण्याचे चान्सेस वाढतात. फर्टाइल विंडोचा पहिला दिवस देखील गरजेचा असतो. परंतु ओव्युलेशनच्या आधीच्या दिवसांत यात कंसीव्ह करण्याचे चान्सेस कमी असतात. ओव्युलेशनच्या दोन दिवस आधी आणि ओव्युलेशनचा दिवस कंसीव्ह करण्यासाठी सर्वात योग्य असतो.

ओव्युलेशनचा दिवस कसा ओळखावा?

मासिक पाळीचा काळ आणि मासिक पाळीची नियमितता या आधारावर ओव्युलेशन पीरियड ओळखता येतो. मासिक चक्र 22 आणि 36 दिवसांचे असू शकते. मासिक चक्र संपण्याच्या 12 ते 14 दिवस आधी स्त्री ओव्युलेट करते. जर तुमचे मासिक चक्र 28 दिवसांचे आहे तर तुम्ही 14 व्या दिवशी ओव्युलेट कराल. पुढील पीरियडच्या आधी गरोदर राहण्याकरता हा सर्वात योग्य काळ आहे पण जर तुमचे सायकल 21 दिवसांचे असेल तर तुम्ही सातव्या दिवशी ओव्युलेट कराल. जर तुमचे मासिक चक्र 35 दिवसांचे असेल तर तुम्ही 21 व्या दिवशी ओव्युलेट कराल. तसेच प्रत्येक महिन्यात मासिक चक्र वेगवेगळे असते त्यामुळे फर्टाइल विंडो देखील बदलेल. म्हणून सायकलच्या काळात प्रत्येक दुसऱ्या वा तिसऱ्या दिवशी सेक्स करावा, ओव्युलेशनची वाट पाहण्यापेक्षा या दिवसांत सेक्स करणे फायद्याचे ठरते. नियमित सेक्स केल्याने स्पर्म क्वालिटी सुद्धा सुधारते.

कंसीव्ह करण्यासाठी स्पेशल ड्रिंक

आम्ही तुम्हाला एक स्पेशल ड्रिंक सांगत आहोत जे प्यायल्याने तुम्हाला गरोदर राहण्यास मदत मिळू शकते. सर्वात प्रथम दालचिनी आणि काळे तीळ वाटून त्यांची पावडर बनवावी. मात्र ही पावडर मिक्स करू नये. या दोन्ही पदार्थांची पावडर वेगवेगळ्या डब्ब्यामध्ये भरून ठेवावी. एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि अर्धा चमचा काळ्या तिळाची पावडर टाका. आता यात मध टाकून हे पाणी प्या. इतका साधा सोप्पा हा उपाय आहे जो तुम्ही घरबसल्या करू शकता. यासाठी तुम्हाला कोणाची मदत घेण्याची देखील गरज नाही. वापरले जाणारे दालचिनी, काळे तीळ आणि मध मात्र चांगल्या गुणवत्तेचे असतील याची काळजी घ्या.

हे ड्रिंक कधी घ्यावे?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ड्रिंक नेमके कधी घ्यावे? तर रात्री जेवण करण्याच्या अर्धा तास आधी हे पेय प्यावे. याशिवाय सकाळी उपाशी पोटी देखील याचे सेवन गरोदर होऊ इच्छिणारी स्त्री करू शकते. हे पेय प्यायल्यावर अर्धा तास कोणत्याही इतर पदार्थाचे सेवन करू नये. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोरोज एकाच वेळी या पेयाचे सेवन करावे. असे करू नये की आज सकाळी सेवन केले वा दुसऱ्या दिवशी रात्री सेवन केले. हे पेय नेहमी एकाच वेळेत घ्यावे. जेणेकरून याचा परिणाम प्रभावीपणे दिसून येईल.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here