[ad_1]
मात्र अजूनही बऱ्याच ठिकाणी अरेंज्ड मॅरेजला प्राधान्य दिलं जातं. अरेंज्ड मॅरेज करत असताना मुलींच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवतात. एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर आयुष्याची सुरुवात कशी करायची, तो कसा असेल असे अनेक प्रश्न मुलींना सतावत राहतात. पण तुमचे कुटुंबिय जर तुमचं लग्न एखाद्या व्यक्तीबरोबर जुळवत असतील तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही लग्न करण्यापूर्वी त्या व्यक्तीला समजून घेऊ शकता. अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेच्या बाबतीतही तसंच घडलं. एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. यामुळे तुम्ही देखील अरेंज्ड मॅरेजची भीती मनातून काढून टाकाल.
(फोटो सौजन्य – इंंडिया टाइम्स)
‘डेटिंगनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला’
धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने आणि श्रीराम नेने यांचा जोडा अगदी परफेक्ट वाटतो. या दोघांच्या लव्हस्टोरीला नेमकी कशी सुरवात झाली हे माधुरीने एका मुलाखतीमध्ये सांगतिलं होतं. माधुरी सांगते, ‘लोकं म्हणायचे आमचं अरेंज्ड मॅरेज आहे. आमच्या कुटुंबियांनी आम्हाला एकत्र आणलं पण पुढे लग्न करायचं की नाही या सर्वस्व निर्णय आमच्या दोघांचा होता. आम्ही लग्नाआधी भेटलो. खूप गप्पा देखील मारल्या. काही काळ आम्ही एकमेकांना डेट सुद्धा केलं. आणि त्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय घेतला.’ एकमेकांना समजून घेत माधुरीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि आज दोघंही सुखी संसार करत आहेत.
(तुमचे व जोडीदारामधील प्रेम कमी झालंय का? जाणून घ्या यामागील मोठी कारणे)
माधुरीची ही गोष्ट लक्षात ठेवा
माधुरीने श्रीराम यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांची प्रत्येक गोष्ट जाणून घेतली. दोघांनीही एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला. तुम्ही देखील अरेंज्ड मॅरेजची भीती मनातून काढून टाकत माधुरीची ही गोष्ट फॉलो करू शकता. मनात अरेंज्ड मॅरेजची भीती बाळगणाऱ्या लोकांसाठी माधुरी खरा आदर्श आहे. आपले कुटुंबिय एखाद्या व्यक्तीशी लग्न जुळवत असतील तर मनात अनेक प्रश्न उभे राहतात. मात्र याबबात मनात गैरसमज निर्माण करून घेऊ नका. लग्नापूर्वी एकमेकांचा स्वभाव, सवयी समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना पुरेसा वेळ द्या. आणि त्यानंतर तुम्ही सहमताने लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता.
अरेंज्ड मॅरेजची भीती का वाटते?
सध्याच्या लव्ह मॅरेजच्या जमान्यात बहुतांश लोकांना अरेंज मॅरेज्डची भीती वाटते. अरेंज्ड मॅरेजमध्ये अनोळख्या व्यक्तीला भेटत आयुष्यभर त्याच्याबरोबर कसं राहायचं, आपला लग्न करण्याचा निर्णय चुकणार तर नाही ना असे अनेक प्रश्न तुम्हाला देखील पडत असतील. पण आता अरेंज्ड मॅरेजची संकल्पना काहीशी बदलेली आहे. आता कुटुंबिय देखील दोन व्यक्तींना एकत्र भेटण्यासाठी, समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देतात. लव्ह मॅरेजच्या तुलनेत अरेंज्ड मॅरेजमध्ये एकमेकांना तितकासा एकत्रित वेळ मिळत नाही. मात्र लग्नानंतर दोन व्यक्तींमध्ये प्रेम, आपुलकी अधिक वाढते.
(‘संसार मांडायचा नव्हता’ साखरपुड्यानंतर या हॉट अभिनेत्रीचं नातं मोडलं, काय होतं कारण)
घाबरून जाऊ नका
अरेंज्ड मॅरेजमध्ये एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर लगेचच त्याच्याशी लग्न करावं लागेल हा समज मनातून काढून टाका. तुम्ही कुटुंबियांकडून समोरच्या व्यक्ती समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ मागू शकता. यामुळे तुमच्या मनात कोणत्याच प्रकारची भीती राहणार नाही. किंवा लग्न करण्याचा निर्णय घेताना तुम्हाला घाबरण्याची देखील गरज नाही. माधुरीप्रमाणेच तुम्ही लग्नापूर्वी एकमेकांना डेट करू शकता. यादरम्यान समोरच्या व्यक्तीशी पुरेसा संवाद साधा. त्यानंतरच तुम्ही ठामपणे लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता.
डेटिंगचा पर्याय
लव्ह मॅरेजमध्ये दोन व्यक्ती एकमेकांना डेट करत लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण अलिकडे अरेंज्ड मॅरेजमध्येही तुम्ही हा पर्याय निवडू शकता. तुमचे कुटुंबिय जर तुमचं लग्न ठरवत असतील तर तुम्ही त्यांच्याकडे एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ मागू शकता. सध्या बरेच लोक अरेंज्ड मॅरेजमध्ये डेटिंगचा पर्याय निवडत आहेत. यामुळे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, सवयी, वागणुक पाहून तुम्ही त्याच्यावर अधिक प्रेम करू शकता. मात्र हे सारं दोघांच्या सहमतीने होणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही पुढे जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता.
कुटुंबाची मिळते साथ
अरेंज्ड मॅरेजमध्ये सगळ्यात चांगली आणि सकारात्मक गोष्ट म्हणजे दोन व्यक्तींना कुटुंबाची मिळणारी साथ. लव्ह मॅरेजच्या बाबतीत काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतं. लव्ह मॅरेजमध्ये दोन व्यक्तींना आपल्या नात्याबाबत कुटुंबियांना सांगाव लागतं. त्यांचं मत जाणून घ्यावं लागतं. आणि नंतरच निर्णय घेतला जातो. मात्र अरेंज्ड मॅरेजमध्ये लग्नासाठी कुटुंबाची भरपूर साथ मिळते. जर आपला जोडीदार आपल्या कुटुंबियांच्या पसंतीचा असेल तर त्याला पूर्णपणे आपले कुटुंबिय स्वीकारतात. तसेच दोन कुटुंबामध्ये सुंदर नातं देखील निर्माण होतं.
[ad_2]
Source link