शासननामा न्यूज ऑनलाईन
अन्न सुरक्षा दिन
दुषित अन्न आणि दुषित पाणी याबद्दल लोकांना जागरूक करणे आणि लोकांनी त्याकडे विशेष लक्ष देऊन आपल्या आहाराला आणि आरोग्याला जपावे हा संदेश संपूर्ण जगाला देण्यासाठी 7 जून हा दिवस अन्न सुरक्षा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. जगभरात अनेक असे देश आहेत जेथे अन्न सुरक्षा दुय्यम मानली जाते. आपल्या जिभेच्या चोचल्यांपुढे लोकं अन्न किती सुरक्षित आहे किंवा नाही ते पाहत नाहीत, काही देशांमध्ये तर सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे लोकांना चांगले अन्न खायला मिळत नाही. याचा परिणाम म्हणजे अशा देशांमध्ये आजाराचे प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण खूप जास्त आहे.
दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू
तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट अगदी खरी आहे की दुषित अन्न व पाणी सेवन केल्याने दरवर्षी एकट्या आपल्या भारत देशात 4700 लोकांचा मृत्यू होतो. उघड्यावरचे दुषित अन्न खाल्ल्याने आणि आहार घेण्याआधी स्वच्छता न बाळगल्याने देशात दर मिनिटाला 44 लोकं आणि दरवर्षी 23 दक्षलक्ष पेक्षा जास्त लोकं आजारी पडतात. आता लक्षात आलं का की ही किती गंभीर समस्या आहे आणि विचार करा आपल्या भारतात जर ही स्थिती असेल तर संपूर्ण जगातली स्थिती काय असेल? म्हणूनच आपण सर्वांनी वैयक्तिक पातळीवर अन्न सुरक्षेचे नियम पाळायला हवेत.
धोकादायक खाद्यपदार्थांपासून दूर राहा
एका संशोधनामध्ये हे दिसून आले आहे की परंपरागत भारतीय खाद्यपद्धती व्यतिरिक्त पाश्चिमात्य रेडी टू इट, पाकिटबंद आणि अन्य जंक फूड सेवन केल्याने त्याचा मोठा धोका भारतीयांना होतो आहे. अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे शरीरात विषारी घटकांची वृद्धी होत जाते. जंक आणि फास्ट फूड मध्ये चव आणि रंग येण्यासाठी विविध रसायनांचा वेळोवेळी वापर केला जातो आणि ही रसायने नक्कीच आपल्या शरीरासाठी घातक असतात. त्यामुळेच आपण अशा खाद्यपदार्थांपासून शक्य तितके दूर राहून पौष्टिक आणि चांगला आहारच घेतला पाहिजे.
फूड पॉयझनिंग व डायरिया घालू शकतो विळखा
डायरिया हे नाव तुम्ही देखील एकले असेलच, हा असं आजार आहे जो 10 पैकी 7 भारतीयांना होतो. डायरिया ज्याला अतिसार असेही म्हणतात हा एक पचना संबंधित रोग आहे. जो कि दुषित अन्नपदार्थ खाल्ल्याने होऊ शकतो. या आजारात पोटदुखी सोबत लूज मोशन अर्थात जुलाब सुद्धा होतात. काही वेळा तर जोराने उलट्या देखील होतात. उलटी आणि जुलाब यामुळे व्यक्तीच्या शरीरात अन्न आणि पाणी दोन्ही टिकून राहत नाही. तो जे काही खातो वा पितो ते उलटी किंवा विष्ठेच्या माध्यमातून शरीराबाहेर फेकले जाते. यामुळे शारीरिक कमजोरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जाणवते.
काय काळजी घ्यावी?
या अन्न सुरक्षा दिनानिमित्त आपण अन्न सुरक्षेचे काही नियम जाणून घेऊया. जेणेकरून ते पाळून तुम्ही देखील एक निरोगी आणि सुरक्षित जीवन जगू शकता. अन्न खाण्याआधी नेहमी आपले हात स्वच्छ धुवावेत. अन्न हे स्वच्छ आणि चांगल्या भांड्यातच तयार करावे. आहार बनवताना चांगल्या पाण्याचाच वापर करावा. सहसा पाणी हे उकळून मगच वापरावे. उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा आणि घरगुती आहाराला प्राधान्य द्या. या अशी काही सामान्य गोष्टी पाळून देखील तुम्ही दुषित आणि पाणी यांपासून स्वत:चा बचाव करू शकता.