पण अभिनेत्रीच्या फॅशनचं गणित बिघडल्याचंही अनेकदा पाहायला मिळालंय. यामुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सचा मोठ्या प्रमाणात सामनाही करावा लागतो. कौतुकाऐवजी नेटकऱ्यांकडून टीकेचाच भडिमार केला जातो.
परिणितीनं परिधान केला होता असा टॉप
परिणिती चोप्रा काही दिवसांपूर्वी मुंबईतील जुहूमधील सोहो हाउस येथे पोहोचली होती. यादरम्यान परिणितीनं सी-थ्रु फॅब्रिकचे काळ्या रंगाचे टॉप परिधान केलं होतं. टॉपवर तिनं मॅचिंग पेपर पँट घातल्याचं आपण पाहू शकता. अभिनेत्रीनं घातलेले टॉपचे फॅब्रिक प्रचंड पातळ होते. पण राउंड नेकलाइन डिझाइनमुळे या पारदर्शक फुल स्लीव्ह्ज टॉपला आकर्षक लुक मिळाला होता.
परिणितीची मोठी चूक
फ्लेअर्ड पँटसह गोल गळ्याचा टॉप परिधान करणं हे कॉम्बिनेशन क्लासी आहे. पण परिणिती चोप्रानं ज्या पद्धतीने स्टायलिंग केलं होतं, ते प्रचंड वाईट दिसत होतं. या पारदर्शक टॉपमध्ये तिनं मॅचिंग इनर न घातल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.
सी-थ्रु फॅब्रिकसह अधिकतर शिफॉन, जॉर्जेट किंवा सॅटन फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेले इनरवेअर परिधान केले जाते. ज्यामुळे सी-थ्रु फॅब्रिक सुंदर दिसतंच तसंच सेमी ट्रांसपरंट कपड्यांमधील लुक छान सुद्धा दिसतो.
परिणितीने असे केलं होतं स्टायलिंग
परफेक्ट लुक मिळावा यासाठी परिणितीने कमीत कमी मेकअप आणि साधी हेअर स्टाइल केली होती. या ड्रेसवर तिनं पिवळ्या रंगाची लेदर हँड बॅग कॅरी केली होती. दरम्यान रेस्टॉरंटमधून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीनं फोटोसाठी पोझ देण्यास सुरुवात केली, त्यावेळेस तिचा हा कॅज्युअल लुक शॉर्ट ड्रेसच्या तुलनेतही अधिक विचित्र वाटत होता. यामुळेच लोकांनी तिला टार्गेट केलं.
लोकांनी टीका करण्यास केली सुरुवात
परिणिती चोप्राचे या अवतारातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी तिला व्यवस्थित कपडे परिधान करण्याचा सल्ला दिला
एका युजरनं परिणितीच्या फोटोवर कमेंट करत म्हटलं की, ‘घराबाहेर पडण्यापूर्वी तु सर्वप्रथम आपल्या कपड्यांकडे लक्ष द्यायला हवे होतं’, तर आणखी एकाने लिहिलं की, ‘तु नेहमीच एकसारखेच कपडे का परिधान करतेस’. यासारख्या प्रतिक्रिया व्यक्त करत लोकांनी अभिनेत्रीला टार्गेट केलं.
यापूर्वीही केली होती अशीच चूक
परिणितीला यापूर्वीही कपड्यांमुळे ट्रोल करण्यात आलं आहे. बोल्ड डिझाइनर कपड्यांमुळे लोकांनी तिला वाईटरित्या ट्रोल केलं आहे. प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीषा मल्होत्राच्या बर्थ-डे पार्टीसाठी परिणिती असाच काहीसा ट्रान्सपरंट टॉप परिधान करून पोहोचली होती.
वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिनं हृदयाचे आकाराचे ग्राफिक्स असणारे काळ्या व पांढऱ्या रंगाच्या टॉपची निवड केली होती. या टॉपमध्येही तिनं मॅचिंग इनरवेअर परिधान न केल्याचंच या फोटोमध्ये दिसत आहे.