[ad_1]
मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूयॉर्क टाइम्सचे लेखक आर्थर पर्ल यांच्या माहितीनुसार, प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच विश्वासघात करते, असे मुळीच नव्हे. तर जी माणसं वर्तमानातील नातेसंबंधांमध्ये खूश नाहीयेत त्यांना सुद्धा अशा प्रकारचे कठोर पाऊल उचलावे लागतं. यामागील कारणं वेगवेगळी असू शकतात.
जर एखाद्या नात्यामध्ये वारंवार फसवणूकच होत असेल तर त्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं योग्य आहे का? याचा विचार करणंही गरजेचं आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) सुद्धा पार्टनरनं फसवणूक केल्यानं भरपूर दुखावली गेली होती. या अभिनेत्रीनं आपल्या पार्टनरला एकदा नव्हे तर दोनदा विश्वासघात करताना पकडलं होतं.
पार्थ समथानसह होतं गंभीर नाते
दिशा पाटनी (Disha Patani) सध्या अभिनेता टायगर श्रॉफसह (Tiger Shroff) प्रेमसंबंधामध्ये आहे. पण आपल्या संघर्षाच्या काळात दिशा टीव्ही अभिनेता पार्थ समथान (Parth Samthaan) सोबत रिलेशनशिपमध्ये होती. पार्थ आणि दिशा यांचं नाते अडीच वर्षच टिकलं. पार्थ विश्वासघात करत असल्याची माहिती दिशाला मिळाल्यानंतर नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय तिला योग्य वाटला.
या दोन्ही कलाकारांच्या जवळ असणाऱ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दिशाने पार्थला विश्वासघात करताना पहिल्यांदा पकडलं होतं, त्यावेळेस तिनं त्याला माफ केलं. दुसरी संधी सुद्धा दिली. पण दुसऱ्यांदा पुन्हा तेच घडलं त्यावेळेस मात्र तिनं नाते तोडण्याचा निर्णय घेतला. पार्थ तिच्यासह विकास गुप्तासोबतही नातेसंबंधांमध्ये होता, अशी माहिती दिशाला ब्रेकअप केल्यानंतर चार महिन्यांच्या आतमध्ये मिळाली होती. ‘
विश्वासघातामुळे दिशाने उचललं हे पाऊल
एवढंच नव्हे तर या जोडप्याच्या काही खास मित्रमैत्रिणींनीही सांगितलं की, ‘दिशानं जेव्हा पार्थसोबत नाते संपुष्टात आणलं, त्यावेळेस अभिनेत्यानं अफवा पसरवण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ दिशा खूप पजेसिव्ह होती आणि फोन सुद्धा तपासायची. दिशा पार्थसाठी खूप पजेसिव्ह होती, पण तिचा अभिनेत्यावर खूप विश्वास देखील होता. पण जेव्हा पार्थला तिचा विश्वासघात केला, त्यानंतर दिशाने नजर ठेवण्यासाठी त्याचा फोन तपासण्यास सुरुवात केली.’
मनात निर्माण होते भीती
विश्वासघात करणारे तुमचा कधीही विश्वासघात करू शकतात, अशी एक फार जुनी म्हण आहे. अशा नात्यांमधून तुम्ही लवकरात लवकर बाहेर येणे गरजेचं असते. अभिनेत्री दिशा पाटनीसोबतही असेच काहीसे घडलं. पार्थनं पुन्हा विश्वासघात केल्यानंतर ती पूर्णतः कोलमडली. एखाद्या नात्यामध्ये इतके वर्षे राहिल्यानंतर त्यापासून विभक्त होणे कठीण असते. पण वारंवार विश्वासघात होत असेल तर नात्यामध्ये प्रेम निर्माण होणं शक्यच नसते. अशा परिस्थिती नात्यात प्रामाणिक असणाऱ्या व्यक्तीची फार घुसमट होऊ लागते.
समतोल राखणं होतं कठीण
विश्वासघात सहन करणारी व्यक्ती आपल्या जोडीदाराकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहते. समाज, कुटुंबामध्ये थट्टा होऊ नये म्हणून केवळ तडजोड म्हणून अशा व्यक्ती नाते सांभाळण्याचा प्रयत्न करतात. पण नात्यातील अन्य गोष्टींचा समतोल राखणं खरंच कठीण असतं. सुखी जीवन जगण्यासाठी यातनांमुळे होणारा त्रास दूर ठेवावा लागतो.
ब्रेकअपनंतर बहुतांश लोक केलेल्या चुकांचे आत्मनिरीक्षण करतात आणि त्यास स्वतःलाच जबाबदार मानतात, ही बाब पूर्णतः अयोग्य आहे. विश्वासघातामुळे प्रामाणिक व्यक्तीला फार त्रास होतो. पण हीच गोष्ट एखाद्या नात्यात वारंवार अनुभवायला मिळाल्यास सन्मान आणि विश्वास पूर्णतः संपुष्टात येतो.
चांगल्या जोडीदारापासून दुरावणे
‘तु एक चांगला जोडीदार गमावला आहेस’, असे म्हणणारे कित्येक लोक तुम्हाला भेटतील. आपल्या पार्टनरचा विश्वासघात करून आपण फार मोठी चूक केलीय, याची जाणीव काही लोकांना नाते पूर्णतः संपुष्टात आल्यानंतर होते. पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. एक काळ असाही असेल की तुमच्या जीवनात भरपूर लोक असतील, पण काळजी करणारे किती जण आहेत? याचाही विचार करा. पार्थपासून विभक्त झाल्यानंतर दिशाने आपल्या करिअरवर पूर्णतः लक्ष केंद्रित केलं. तर पार्थ त्यावेळेस विकास गुप्तासोबतच्या नात्यामध्येच अडकला होता.
(माधुरी म्हणते ‘माझा पतीच माझ्यासाठी हीरो’, तरुणींच्या स्वप्नातील राजकुमार असाच असतो का?)
[ad_2]
Source link