Home मनोरंजन pregnancy cramps home remedies: Muscle Tightness : प्रेग्नेंसीत स्नायुदुखीकडे दुर्लक्ष केल्यास नंतर भोगावे लागतात दुष्परिणाम, ‘या’ जालीम घरगुती उपायांनी वेळीच करा वेदना दूर!

pregnancy cramps home remedies: Muscle Tightness : प्रेग्नेंसीत स्नायुदुखीकडे दुर्लक्ष केल्यास नंतर भोगावे लागतात दुष्परिणाम, ‘या’ जालीम घरगुती उपायांनी वेळीच करा वेदना दूर!

0

[ad_1]

गरोदरपणाचा काळ हा शारीरिक बदलांचा काळ म्हणून सुद्धा ओळखला जातो, कारण या काळात शरीरात अनेक बदल दिसून येतात. बरेचसे बदल हे वेदनादायी आणि त्रासदायकच असतात. अनेक स्त्रियांची गरोदरपणाची पहिलीच वेळ असते आणि त्यामुळे असे वेगळे बदल दिसू लागल्यावर त्या घाबरून जातात, पण अशावेळी अजिबात घाबरून जाऊ नये कारण हे बदल सामान्य आहेत आणि सर्व स्त्रियांमध्ये दिसून येतात. गरोदरपणाच्या काळातील असाच एक बदल म्हणजे स्नायूंच्या वेदना होय किंवा स्नायुंमध्ये जाणवणारी मुरगळ होय.

यामुळे कधी कधी खूप वेदना होतात ज्याची तिडीक अक्षरश: डोक्यात जाते. पण तुम्हाला माहित आहे का साध्यासोप्या घरगुती उपायांनी सुद्धा या समस्येवर उपाय करता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही साधे सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही या वेदनांमधून चुटकीसरशी आराम मिळवू शकता.

पाणी

शरीरात फ्लूइडची मात्रा कमी असल्यास कोणत्याही गरोदर स्त्रीच्या स्नायुंमध्ये मुरगळ होऊ शकते आणि तिला वेदना निर्माण होऊ शकतात. अशावेळी शरीराला हायड्रेटेड करणे आवश्यक असते. केवळ खूप पाणी प्यायल्याने सुद्धा आराम मिळू शकतो. सामान्यत: स्त्रियांनी कमीत कमी 8 ग्लास पाणी हे प्यायलाच हवे. पण गरोदरपणात स्त्रियांनी अजून जास्त जवळपास दुप्पट प्रमाणात पाणी प्यावे. त्यामुळे ही समस्या जास्त सतावणार नाही. शिवाय जास्त पाणी पिण्याचा शरीराला खूप फायदा देखील होईल.

(वाचा :- Fertility Diet – आई-बाबा होऊ न देणा-या चुकांकडे करू नका दुर्लक्ष, ‘या’ न्यट्रिशियन टिप्स वापरून फर्टिलिटी करा मजबूत!)

तिळाचे तेल

तिळाच्या तेलाची मालिश हा सुद्धा एक उत्तम नैर्सगिक उपाय आहे. हे तेल हलके गरम करा आणि मग ज्या ठिकाणी मुरगळ व वेदना जाणवत आहेत तिथे हळुवार हाताने मालिश करा. तिळाच्या तेलामध्ये स्कीनच्या सात थरांच्या आत जाऊन पेशींपासून ते हाडांपासून सर्व भागाला पोषण देण्याची क्षमता असते. तिळाच्या शिवाय लवंग तेल सुद्धा स्नायूंमधील मुरगळ दूर करण्यास उपयुक्त ठरते. लवंग तेलामध्ये अँटी-इंफ्लामेट्री आणि वेदनाशमक गुण असतात. लवंग तेल हलके गरम करा आणि हलक्या हाताने 5 मिनिटे मालिश करा. तुम्हाला लवकरच फरक दिसून येईल आणि खूप आराम मिळेल.

(वाचा ;- आई-बाबा बनण्यात सतत येतंय अपयश? मग आधी ‘ही’ माहिती जाणून घ्या नंतर ट्राय करा!)

कॅल्शियम आणि पोटॅशियम जास्त खावे

शरीरासाठी कॅल्शियम आणि पोटॅशियम खूप गरजेचे असते. कॅल्शियम हाडांना मजबुती देते आणि पोटॅशियम स्नायुंमध्ये सुधार आणते. तुम्हाला तुमच्या गरोदरपणाच्या आहारात या दोन पोषक तत्वांनी युक्त असणाऱ्या आहाराचा अधिकाधिक समावेश केला पाहिजे. केळी, दूध, पालक, दही, संत्री आणि नट्स यांसारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि पोटेशियम सर्वाधिक प्रमाणात असते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन देखील अजून चांगल्या आणि पौष्टिक आहाराचा सामावेश करू शकता. ते तुम्हाला तुमच्या शारीरिक स्थितीनुसार अजून चांगले मार्गदर्शन करू शकतील.

(वाचा :- स्त्री असो वा पुरुष, दोघांची फर्टिलिटी दुप्पट करतो ‘हा’ खास पदार्थ, खाण्याचा आहे अनोखा नियम!)

सैंधव मिठाची अंघोळ

हा एक आगळावेगळा उपाय तुम्हाला अत्यंत कमी वेळात आराम मिळवून देऊ शकतो. स्नायूंमध्ये आलेल्या टाईटनेसला दूर करण्यासाठी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये मुरगळ निर्माण होऊ शकते आणि सैंधव मीठ ही कमतरता पूर्ण करू शकते. तुम्ही ज्या पाण्याने अंघोळ करणार आहात त्यामध्ये दोन कपन सैंधव मीठ टाकावे आणि 30 मिनिटे अंघोळ करावी. यामुळे स्नायूंमधील मुरगळ आणि वेदना मोठ्या प्रमाणावर नक्की कमी होतील आणि तुम्हाला आराम वाटू लागेल.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर खूप प्रयत्न करुनही वेट लॉस होत नसेल तर ‘ही’ कारणं असू शकतात जबाबदार!)

योग

असे अजिबात नाही की गरोदरपणात तुम्ही फक्त आरामच केला पाहिजे. हालचाल करून स्नायूंमधील मुरगळ होण्यापासून रोखता येते. मात्र जास्त हेवी वर्कआउट सुद्धा करू नये. पार्क मध्ये फिरून यावे. हलका व्यायाम करावा आणि मुख्य म्हणजे जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहू नये. याशिवाय योग सुद्धा स्नायूंच्या वेदना कमी करून शरीराला आराम मिळवून देते. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की नेमके कोणते आसन केल्याने आराम मिळेल? तर पश्चिमोत्तासन हे आसन अवश्य करावा. कर पायांमध्ये मुरगळ आली असेल तर तुम्ही अर्ध हनुमानासन देखील करू शकता. एक्यूप्रेशर सुद्धा वेदना कमी करण्यात सहाय्य करते. तुम्ही एखाद्या प्रोफेशनल कडून एक्यूप्रेशर ट्रिटमेंट घेऊ शकता. तर मंडळी गरोदरपणात दिसणारा हा वेदनादायी बदल जास्त मोठा नाही. तुम्ही योग्य ती काळजी आणि उपचार घेऊन यातून आराम मिळवू शकता.

(वाचा :- ऐश्वर्याच्या वहिनीचं डिलिव्हरीनंतर होत नव्हतं पोट कमी, ‘या’ उपायाने मिळाली स्लिम-फिट व टोन्ड फिगर!)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here