Home मनोरंजन rashami desai nandish sandhu divorce: ‘भविष्यातील योजना उद्ध्वस्त झाल्या, मी कोलमडले’ अभिनेत्रीनं व्यक्त केलं दुःख! नात्यात तुम्हीही या चुका करताय? – rashami desai talks about her failed love relationships she said it was a tough time

rashami desai nandish sandhu divorce: ‘भविष्यातील योजना उद्ध्वस्त झाल्या, मी कोलमडले’ अभिनेत्रीनं व्यक्त केलं दुःख! नात्यात तुम्हीही या चुका करताय? – rashami desai talks about her failed love relationships she said it was a tough time

0
rashami desai nandish sandhu divorce: ‘भविष्यातील योजना उद्ध्वस्त झाल्या, मी कोलमडले’ अभिनेत्रीनं व्यक्त केलं दुःख! नात्यात तुम्हीही या चुका करताय? – rashami desai talks about her failed love relationships she said it was a tough time

[ad_1]

दोन व्यक्तींमधील प्रेमाचे नाते प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणामुळे अधिक मजबूत होत जाते. एखाद्या नात्याच्या सुरुवातीच्या काळात बर्‍याच गोष्टी समजणे कठीण होतं. यामुळे दोन व्यक्तींमध्ये ताण-तणाव वाढू लागतो आणि एकत्र राहणेही अशक्य होते. परिणामी बहुतांश लोक विभक्त होण्याचा निर्णय घेतात. पण यामुळे तुमच्या आयुष्यावरही वाईट परिणाम होतात.

प्रेमाचं नाते फार काळजीपूर्वक हाताळणं आवश्यक आहे. घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे दोन व्यक्तींमध्ये केवळ दुरावाच निर्माण होतो. तर काही जणांना फसवणुकीचाही सामना करावा लागतो. यामुळे होणाऱ्या यातनांमधून बाहेर पडणे देखील खूप कठीण असते. टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी देसाईच्या बाबतीतही असेच काहीसे घडल्याचं पाहायला मिळालं. यामुळे तिला नेमक्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, जाणून घेऊया सविस्तर…
(कपूर बहिणींमधील तणाव! एकाच घरात राहूनही करिश्मा बहिणीशी संवाद साधत नव्हती, कारण…)

​घाईत घेतलेल्या निर्णयामुळे होतो पश्चाताप

रश्मी देसाईने प्रेमाच्या नात्यात आलेल्या वाईट गोष्टींचा अनुभव एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता. जेव्हा अभिनेत्रीला असे विचारण्यात आले की, तुमचे एक नव्हे तर दोन नाती बिघडली, यामुळे कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा लागला? यावर तिनं उत्तर दिलं की, ‘मी पूर्णपणे कोलमडले होते. असे काहीही घडावे अशी माझी इच्छा नव्हती. एक नातं संपवून त्यातून बाहेर पडणे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. अगदी लहान वयातच मी प्रेमात पडले आणि मग मी घाईघाईने लग्नाचा निर्णय घेतला. ‘

रश्मीने पुढे असंही सांगितलं की, ‘पण नंतर मला समजले की ही गोष्ट दोन व्यक्तींमधील आहे आणि जेव्हा दोघेही नात्यात आनंदी नसतील तर एकमताने आदराने आपण पुढे जायला हवे, कारण यामुळे तुमची प्रगती खुंटते. आम्ही एकमेकांवर सक्तीने दबाव टाकत होतो. आम्ही एकमेकांसोबत आनंदाने राहत नव्हतो, त्यामुळेच स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला’. नात्याबाबत घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे नुकसानच अधिक होते, हेच अभिनेत्रीच्या बोलण्यावरून दिसतंय.

​​लग्नापूर्वी या गोष्टींकडे द्या लक्ष

कोणत्याही नात्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. जोडप्यांचा एकमेकांवर विश्वास असणे फार आवश्यक आहे. काही लोकांना आपल्या जोडीदाराला गमावण्याची फार भीती असते, यामुळे ही मंडळी त्यांच्यावर संशय घेऊ लागतात. तसंच नात्याच्या सुरुवातीस लोक अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण काही वेळानंतर यामुळेच तणाव वाढू लागतो. जोडीदाराकडून तुमच्यावर निर्बंध लादली जात असतील, तर नात्यात वाद – दुरावा वाढणं स्वाभाविक आहे. मित्रांवरून तुम्हाला असंख्य प्रश्न विचारले जात असल्यास, अपमानास्पद वागणूक मिळत असल्यास, संबंधित नाते फार काळ टिकू शकत नाही हे लक्षात घ्यावे.

(‘पुरुषाशी तोपर्यंत जवळीक साधू शकत नाही, जोपर्यंत…’ रेखा यांच्या विधानामुळे उडाली होती खळबळ, नात्याची ही व्याख्या कितपत योग्य?)

​विचार न जुळल्यास नात्यावर होऊ शकतात दुष्परिणाम

लग्नासारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी जोडीदाराचे व तुमचे विचार जुळत आहेत का? हे पडताळून पाहणं खूप महत्त्वाचे आहे. जोडप्यामध्ये मतभेद असल्यास नाते खराब होण्यास वेळ लागत नाही. दोन व्यक्तींची विचारसरणी थोडी वेगळी असू शकते, यात काही शंका नाही. पण मतभेद अधिक प्रमाणात होऊ लागल्यास समस्याही वाढू लागतात. लग्नाचा विचार करण्यापूर्वी वैयक्तिक आणि खासगी आयुष्य एकत्रच सुरू राहते, हे लक्षात घ्यावे. जर या प्रकरणात जोडीदाराचं मत तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं असेल तर अशा नात्याचा स्वीकार करणं फार धोकादायक ठरू शकते.

(‘लग्न माझ्यासाठी तडजोड नव्हे’ ऐश्वर्याचे वैवाहिक जीवनावर मोठे विधान, बदलेल तुमचाही दृष्टीकोन)

​​’सारं काही उद्ध्वस्त झालं…’

रश्मीने आपल्या दुसऱ्या नात्याचा उल्लेख करत सांगितलं की, नात्यामध्ये एकदा कटु अनुभव आल्यानंतर आयुष्यात पुढे जाणे खूप कठीण असते आणि दुसऱ्यांदाही त्याच गोष्टी घडल्यानंतर माणूस पूर्णतः कोलमडतो. तिनं पुढे असंही म्हटलं की, ‘मी दुसऱ्या रिलेशनशिपचा फार विचारपूर्वक निर्णय घेतला कारण काहीतरी चुकीचे घडू नये, अशी मला भीती वाटत होती. पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा मला खूप आश्चर्यही वाटले, पण तरीही मी स्वतःला भाग्यवान समजते की मला सर्वकाही वेळेवर कळले.

रश्मीने असंही सांगितलं की,’मी पूर्णतः कोलमडले होते. भविष्यातील सर्व योजना उद्ध्वस्त झाल्या. आयुष्यात काय करावं हे मला कळत नव्हतं. मी अशा वळणावर होते, जेथे लोक केवळ फायद्यासाठी संवाद साधतात; असेच मला वाटायचं. चांगली गोष्ट अशी की यानंतरही मी काहीही वाईट बोलले नाही, माझा राग व्यक्त केला नाही. पण मी पुन्हा खंबीरपणे उभी राहिले’. केवळ रश्मी सोबतच नव्हे तर कित्येक लोकांची प्रेमामध्ये फसवणूक होते. पण जर आपण वेळीच काळजी घेतली तर स्वतःची फसवणूक टाळणं नक्कीच शक्य होईल.

​जोडीदाराकडून हे संकेत मिळाल्यास व्हा सावध!

सर्वप्रथम आपल्या जोडीदाराच्या वागण्यात थोडासाही बदल जाणवल्यास लगेचच सावध व्हा. तसंच तुमच्या जोडीदाराच्या वेळापत्रकामध्येही बदल झाल्यास त्याकडे बारकाईनं लक्ष द्यावं. कारण बहुतेकदा तो घरी उशिरा पोहोचत असेल अथवा तुमचा फोन उचलण्यास उशीर करत असेल तर काहीतरी चुकीचं घडतंय हे लक्षात घ्यावे. पार्टनर त्याच्या मोबाइलला स्पर्श करू देत नसेल तर तो तुमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ज्या व्यक्तीसोबत आपण आयुष्यभर एकत्रित राहण्याचा विचार करत आहात, त्याच्याबाबत छोट्यातील छोटी गोष्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.

(‘रणबीरला मी विकत घेतलेलं नाही’, जेव्हा आलियाच्या रागाचा पारा चढला, कोणत्याही पार्टनरला आवडत नाहीत ‘या’ गोष्टी)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here