Home मनोरंजन ‘या’ वयातील मुलांना त्यांची स्वतंत्र्य खोली देणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

‘या’ वयातील मुलांना त्यांची स्वतंत्र्य खोली देणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

0
‘या’ वयातील मुलांना त्यांची स्वतंत्र्य खोली देणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

 शासननामा न्यूज ऑनलाईन

मुलांच्या संगोपनात काही कसर राहता कामा नये म्हणून आई-वडील हवी ती मेहनत करतात. मुलांच्या जन्मानंतर पालकांचं आयुष्य खरं तर बदलून जातं. मुलांची देखभाल करणं, त्यांना हवं नको ते बघणं यामध्ये पालकांचा वेळ निघून जातो. मात्र मुलांच संगोपन करत असताना पालकांंच्या मनात विविध प्रश्न असतात. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे मुलांना स्वतंत्र्य खोली द्यावी की नाही? मुलांना स्वतःचा वेळ मिळावा तसेच मुलं स्वावलंबी व्हावी म्हणून पालक मुलांना स्वतंत्र्य खोली देतात.

काही पालक मुलांना अगदी लहान वयातच वेगळ्या खोलीमध्ये झोपवण्यास सुरूवात करतात. तर काही जणं मुलं थोडी मोठी झाल्यानंतर मुलांना स्वतःची वेगळी खोली देतात. पण खरं तर मुलांना त्यांची वेगळी खोली देताना त्यांचं वय नेमकं काय आहे, कोणत्या वयामध्ये मुलांना स्वतंत्र्य खोली दिली पाहिजे याची माहिती असणं देखील महत्त्वाचं आहे.

​तज्ज्ञांचं मत काय?

सेलिब्रिटी न्युट्रीशनिस्ट आणि लाइफस्टाइल कोच ल्यूक कोटिन्हो यांनी काही दिवसांपूर्वीच या विषयावर एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक मुलं वेगवेगळी असतात. मुलांना पालकांबरोबरच एका खोलीमध्ये राहण्याची इच्छा होणं हे सामान्य आहे. परदेशामध्ये तर मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना त्यांची स्वतंत्र्य खोली देण्याची प्रथाच आहे. भारतात देखील तसंच असलं पाहिजे हे गरजेचं नाही. मुलांना प्रेम देणं, त्यांचा सांभाळ करणं ही पालकांची जबाबदारी असते.

कोणत्या वयोगटातील मुलांना वेगळ्या खोलीमध्ये झोपवलं पाहिजे?

मुलांना वेगळ्या खोलीमध्ये झोपवण्याची परदेशामधील परंपरा तुम्ही आपलीशी करू नका. वेगळ्या खोलीमध्ये झोपण्यासाठी तुमची मुलं सक्षम झाली असतील मात्र मुलांना तरीही तुमच्याबरोबरच झोपायची इच्छा असेल तर त्यांना तुमच्या सोबतच राहू द्या. त्यांच्या या इच्छेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मुलांना त्यांच्या इच्छेविरोधात तुम्ही दुसऱ्या खोलीमध्ये झोपण्यास सांगत असाल तर त्याला असुरक्षित वाटू शकतं. असे ल्यूक यांचे म्हणणे आहे.

​एकत्र झोपणं अधिक फायदेशीर

लहान वयोगटातील मुलं दिवसभर पालकांभोवतीच असतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जी मुलं दिवसभर पालकांबरोबर राहतात त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. अशी मुलं दिवसभरात एखादी छोटी गोष्ट देखील घडली तरी आपल्या आई-वडीलांना मनमोकळेपणाने येऊन सांगतात. जोपर्यंत मुलांची स्वतंत्र्य खोलीमध्ये राहण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत मुलांना तुमच्या खोलीमध्येच एकत्र राहू द्या. मुलांच्या गरजा आणि त्यांच्या मनात काय चाललंय हे ओळखूनच त्यांना स्वतंत्र्य खोली द्या.

​योग्य वागणूक मिळते

मुलांना त्यांच्या आई-वडिलांबरोबरच राहणं अधिक पसंत असतं. आई-वडील देखील आपल्या मुलांना योग्य ती वागणूक देतात. मुलं आई-वडिलांबरोबर दिवसभर राहत असतील तर त्यांच्या वागणूकीमध्ये देखील चांगले बदल घडतात. तसेच मुलं अगदी खूश आणि हसती-खेळती राहतात. त्याचबरोबरीने मुलांना इतर कोणत्या गोष्टींची भिती देखील वाटत नाही. मुलं आपल्या आई-वडिलांबरोबर असताना त्यांना अधिक समाधान वाटतं. त्यामुळे मुलांना स्वतंत्र्य खोली देण्यापूर्वी योग्य तो विचार पालकांनी करणं गरजेचं आहे.

​योग्य दिनक्रम

लहान वयातच मुलांना चांगल्या सवयी लावणं ही पालकांची मुख्य जबाबदारी असते. चांगल्या सवयींमुळे मुलांना प्रत्येक काम वेळेवर करण्याची सवय देखील लागते. जर मुलांना स्वतंत्र्य खोली दिली तर त्यांची झोपण्याची वेळ तसेच सकाळी उठण्याच्या वेळेमध्ये बदल होऊ शकतात. त्याचबरोबरीने मुलं त्यांच्या मतानुसार झोपण्याच्या वेळा ठरवतात. मात्र पालकांबरोबर असताना मुलांचा दिनक्रम ठरलेला असतो. योग्य दिनक्रमामुळे मुलांच्या आरोग्यावर देखील चांगला परिणाम होतो.

मुलांना मिळणारे फायदे

नोत्र दामे युनिर्वसिटीचे प्रोफेसर मॅकेना यांच्या म्हणण्यानुसार, पालकांबरोबर मुलांनी झोपल्याने त्यांच्या श्वासोच्छवास सुधारतो. आईद्वारा मुलांना मिळणारं सीओ२ मुलांच्या श्वसोच्छवास सुधारण्याचे काम करते. एकत्र राहिल्याने आई-वडील आणि मुलांमध्ये घट्ट नातं निर्माण होतं. तसेच लहान वयामध्येच मुलांना आई-वडिलांपासून मिळणारी शिकवण त्यांच्यामध्ये चांगले बदल घडवते. खरं तर मुलांना कोणत्या वयात स्वतंत्र्य खोली मिळावी याबाबत कोणतंच वय ठरलेलं नाही. मात्र मुलांच्या गरजेनुसार पालकांनी निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.

मुलं या सिंड्रोमपासून राहतील दूर

आपल्या मुलाला योग्य त्या वयापर्यंत पालकांनी आपल्याबरोबर ठेवण्याचे खूप फायदे आहेत. मुलांच्या इच्छेविरोधात घेतलेला एखादा निर्णय मुलांची निराशा करू शकतो. तसेच त्यांच्या मनात पालकांबाबत वेगळी मतं निर्माण होऊ शकतात. याव्यतिरिक्त पीडीयाट्रीक रेस्पिरेट्रीक रिव्ह्यूच्या अभ्यासानुसार पालकांबरोबर झोपत असलेल्या मुलांना सडन इन्फंट डेथ सिंड्रोमचा धोका फार कमी असतो. मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी पालकांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here