Home मनोरंजन दिराच्या लग्नात नटून-थटून पोहोचली जेनेलिया डिसुझा, नवरीला सोडून तिच्यावरच खिळल्या साऱ्यांच्या नजरा

दिराच्या लग्नात नटून-थटून पोहोचली जेनेलिया डिसुझा, नवरीला सोडून तिच्यावरच खिळल्या साऱ्यांच्या नजरा

0
दिराच्या लग्नात नटून-थटून पोहोचली जेनेलिया डिसुझा, नवरीला सोडून तिच्यावरच खिळल्या साऱ्यांच्या नजरा
बॉलिवूडच्या सुपरहॉट आणि स्टायलिश मॉमच्या यादीमध्ये अभिनेत्री जेनेलिया डिसुझाचा नंबर टॉपला लागतो. याचं कारण देखील तितकंच खास आहे. बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर असून देखील जेनेलिया सतत चर्चेत असते ते तिच्या ड्रेसिंग स्टाइल आणि फिटनेसमुळे. दोन मुलांची आई असून देखील जेनेलिया स्वतःच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देते. तिचा फॅशन सेन्स तर अगदी कमालीचा आहे. नॅचरल ब्युटी म्हणजे काय हे जेनेलियाला पाहिल्यावर लक्षात येतं. सध्या घर आणि मुल सांभाळणारी ही अभिनेत्री वेस्टर्नबरोबरच पारंपरिक पाषोखामध्ये अगदी खुलून दिसते.

तिचे पारंपरिक लुकमधील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तिचा असाच एक लुक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. पती रितेश देशमुखचा भाऊ धीरज देशमुखच्या लग्नामध्ये जेनेलिया लेहंगा परिधान करून पोहोचली. तिचा लेहंग्यामधील मोहक लुक पाहून नवरीला सोडून उपस्थितांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. तिचा हा लुक नेमका कसा होता यावर एक नजर टाकुया.
(फोटो सौजन्य – BCCL, इंडिया टाइम्स)

​…जेव्हा सर्वजण जेनेलियाला पाहत राहिले एकटक

२०१२मध्ये अभिनेता रितेश देशमुखचा भाऊ धीरज देशमुखचा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्याला सेलिब्रिटींसह इतर क्षेत्रामधील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. देशमुख कुटुंबियांची मोठी सून या नात्याने जेनेलिया अगदी नटून-थटून या विवाहसोहळ्यामध्ये पोहचली. तिचा या सोहळ्यामधील लुक पाहून सारेच आश्चर्यचकित झाले. तिने या लग्नासाठी सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. तर रिसेप्शनसाठी फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला याने डिझाइन केलेला गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान करणं जेनेलियाने पसंत केलं होतं.

​नवरीलाही टाकलं मागे

जेनेलियाने या विवाहसोहळ्यासाठी ड्युल-कॉम्बिनेशन प्रकाराच्या लेहंग्याची निवड केली होती. यावर हेवी डिझाइन करण्यात आलं होतं. जेनेलियाचा हा आउटफिट म्हणजे एक थ्री पीस सेपरेट्स सुट होता. यावर कॉन्ट्रास्ट चोळी आणि मॅचिंग ओढणी जेनेलियाने परिधान केली होती. हा लेहंगा तयार करण्यासाठी सिल्क शिफॉन आणि कॅनव्हास साटनसारख्या मिक्स फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. तसेच या लेहंग्यावर हेवी एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. एम्ब्रॉयडरी करण्यासाठी सोन्याच्या तारांचा वापर करण्यात आला. जेनेलियाचा हा चमकदार लेहंगा तिच्यावर अगदी खुलून दिसत होता.

​आकर्षक ब्लाउज

जेनेलिया पारंपरिक पोषाखामध्ये अगदी मोहक आणि आकर्षक दिसते. तिच्या दिराच्या लग्नात देखील असंच काहीसं घडलं. लेहंग परिधान करून या सोहळ्यामध्ये तिने हजेरी लावली आणि चौफेर बाजूने तिच्या लेहंग्याचीच चर्चा कानावर पडत होती. हेवी डिझायनर लेहंग्याबरोबर तिने वेलवेट लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. चोळीसाठी टूल फॅब्रिकचा वापर करत हाफ स्लिव्ह्ज टच देण्यात आला होता. ब्लाउजला स्वीटहार्ट नेकलाइनसह ब्लाउजच्या पाठच्या बाजूला डिपकट लुक देण्यात आला होता. तिने केलेली लेहंग्याची निवड अगदी यशस्वी ठरली असं म्हणायला हरकत नाही.

​भरगच्च दागिने

देशमुख घराण्याची मोठी सून अगदी या विवाहसोहळ्यामध्ये खुलून दिसत होती. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या इतर अभिनेत्रींनाही तिने लुकच्या बाबतीत मागे टाकलं. या डिझायनर लेहंग्यावर तिने भरगच्च दागिने परिधान करण्याकडे विशेष लक्ष दिलं होतं. सोनेरी रंगाचा नेकपीस, मॅचिंग ड्रापडाउन झुमके, लाइटवेट बिंदी असा जेनेलियाचा साज-शृंगार होता. तसेच हातामध्ये जेनेलियाने हिरव्या रंगाच्या बांगड्यांसह सोन्याचे कडे घातले होते. या भरगच्च दागिन्यांमुळे जेनेलिया अधिक मोहक आणि सुंदर दिसत होती.

असा होता मेकअप

हेवी डिझायनर लेहंगा, त्यावर आकर्षक एम्ब्रॉयडरी, भरगच्च दागिने असा जेनेलियाचा लुक उपस्थितांना भारावून टाकणारा होता. तिने आपल्या आउटफिटला शोभेल असाच मेकअप केला होता. खरं तर जेनेलियाला नॅचरल राहायला आवडतं. यावेळी देखील मेकअप करताना तिने आपल्यातला साधेपणा कायम राखत सुंदर कसा दिसता येईल याकडे लक्ष दिलं. जेनेलियाने मेकअपसाठी लाइट टोन फाउंडेशन, आयशॅडो, बेसिक आयलायनर, स्मोकी आइज, गुलाबी रंगाची लिपस्टिक, हायलायटर वापरलं होतं. तसेच केसांना मेसी लुक देण्यात आला होता. एकूणच काय तर या विवाहसोहळ्यानंतर देखील जेनेलियाच्या या हटके लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here