[ad_1]
पण प्रेमाचं नातं दिर्घकाळ टिकून ठेवायचं असेल तर प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून घेणं गरजेचं असतं. एकमेकांना समजून घेतल्याने नात्यामधील गोडवा कायम टिकून राहतो. बऱ्याचदा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असताना अनेक चुका करता. या चुकांचा परिणाम थेट नात्यावर होतो. दबंग खान सलमानच्याबाबतीत देखील असंच काहीसं घडलं. बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता प्रेमाच्याबाबतीत मात्र अनलकी ठरला. त्याची खऱ्या आयुष्यातील प्रेम कथा ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.
(फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)
‘मला कोणत्याच गर्लफ्रेंडकडून प्रेम मिळालं नाही’
हिंदी ‘बिग बॉस’ मधील एका पर्वामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती. यादरम्यान तिच्याशी बोलताना सलमान खानने त्याच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला होता. सलमान म्हणाला होता की, ‘मी माझ्या सगळ्या गर्लफ्रेंड्सवर खूप प्रेम केलं. पण कोणीच माझ्यावर प्रेम केलं नाही. माझ्या गर्लफ्रेंड्स कदाचित बरोबर असतील. कारण मी प्रेमाच्याबाबतीत एकदम वाईट व्यक्ती आहे.’ सलमानने प्रेमामध्ये खूप काही गमावलं असल्याचं त्याच्या या बोलण्यामधून स्पष्ट होत होतं. पण वेळेनुसार प्रत्येक व्यक्ती आपली चूक सुधारतो. आणि पुढील रिलेशनशिपमध्ये तिच चूक होणार नाही याची काळजी घेतो. तुमचं नातं तुम्हाला दिर्घकाळ टिकवायचं असेल तर आपल्या होणाऱ्या चुका आधी सुधारा. आणि नंतरच नव्या नात्याला सुरुवात करा.
(‘संसार मांडायचा नव्हता’ साखरपुड्यानंतर या हॉट अभिनेत्रीचं नातं मोडलं, काय होतं कारण)
रागामुळे नात्याला लागेल फुलस्टॉप
प्रेमामध्ये लोकं आपल्या जोडीदाराला खूश ठेवण्याचा पूरेपुर प्रयत्न करतात. मात्र काही जणांचा राग यामध्ये आडवा येतो. अति राग आणि द्वेष यामुळे नात्याला फुलस्टॉप लागू शकतो. रिलेशनशिपमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारावर सतत रागवत असाल अथवा छोट्या-छोट्या गोष्टींचा राग करत असाल तर याचा परिणाम नात्यावर होतो. तसेच तुमच्या जोडीदारावरही याचा ताण येतो. परिणामी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जोडीदार तुमच्याबरोबर तुमचा राग सहन करण्यासाठी नसतो ही गोष्ट सुरुवातील समजून घ्या. लहान-मोठे वाद प्रत्येक नात्यामध्ये होतात. पण यादरम्यानचा राग तात्पुरता असुद्या. पण अति राग असल्यास नातं अधिक काळ टिकून राहणं कठीण होऊन बसतं.
नात्याबाबत शंका नको
आपुलकी, विश्वास, प्रेम, जिव्हाळा, काळजी या आधारावर तयार झालेलं नातं आयुष्यभर टिकतं. याचा अनुभव तुमच्यापैकी अनेक जणांनी घेतला असेल. पण जर तुमचा तुमच्या जोडीदारावर विश्वासच नसेल तर पुढे जाऊन नात्यामध्ये विविध समस्या निर्माण होऊ शकतात. काही जणं आपल्या जोडीदाराचं नाव मित्र-मैत्रिणींबरोबर जोडतात. मित्र किंवा मैत्रिणीशी फक्त मैत्रीचं नातं असलं तरी काहीजणं आपल्या जोडीदारावर अविश्वास दाखवतात. असे तुम्ही सतत वागत राहिलात तर जोडीदाराला सारं काही कंटाळवाणं वाटू लागतं. जोडीदारावर अविश्वास दाखवणं म्हणजे त्याचा स्वाभिमान दुखावण्यासारखचं असतं. अशा परिस्थितीमध्ये नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते. लक्षात ठेवा की नात्यामध्ये एकमेकांवर विश्वास असणं अधिक महत्त्वाचं आहे.
अपेक्षांचं ओझं
प्रेम म्हटलं की अपेक्षा आल्याच. तुम्ही जोडीदाराकडून काही गोष्टींच्या अपेक्षा करता. अपेक्षा करणं हे स्वाभाविक आहे. पण याच अपेक्षांचं ओझं वाढत गेलं तर नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जर जोडीदाराकडून अपेक्षा करत असाल तर नात्यामध्ये दरी निर्माण होते. नात्यामध्ये अपेक्षांंचं ओझं वाढलं की ते नातं कमकुवत होतं ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण तुम्ही जर जोडीदाराकडून प्रत्येक अपेक्षा ठेवत असाल तर त्या अपेक्षांचा ताण समोरच्या व्यक्तीवर येतो. यामुळे वरच्या वर तुमचं नातं सुंदर जरी दिसत असलं तरी आतून ते पूर्णपणे कमकुवत व्हायला सुरुवात झालेली असते.
ओव्हर पझेसिव्ह
दोन व्यक्तींमध्ये जेव्हा प्रेमाचं नातं निर्माण होतं तेव्हा पझेसिव्हनेसलाही सुरुवात होते. प्रत्येकाची लाइफ स्टाइल ही वेगवेगळी असते. तसेच वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्य देखील वेगवेगळं असतं. पण जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर विविध प्रश्न विचारायला सुरुवात करतो तेव्हा नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. तसेच एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराचं कौतुक केलं तरी काहीजणांना ते सहन होत नाही. अशा स्वभावामुळे नातं अधिक काळ टिकून राहत नाही. तुमच्या जोडीदारालाही त्याचं वैयक्तिक आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा तुमच्या जोडीदाराला बंधनामध्ये अडकवून ठेवता तेव्हा नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्यास वेळ लागत नाही.
(‘आनंदमध्ये दिसते माझीच छबी’, मुकेश अंबानींकडून जावयाचं कौतुक, वडिलांना मुलीसाठी हवा असतो असाच पती)
[ad_2]
Source link