‘राझी’ हे पात्र साकारणाऱ्या साठी तिने मेकअपचा वापर केला पण खऱ्या आयुष्यात सामंथा खूप सुंदर आहे आणि तिला सुंदर त्वचेचं आणि लोभस सौंदर्याचं वरदान लाभलं आहे. केवळ दक्षिणेतच नाही तर पूर्ण भारतात तिच्या सौंदर्याने घायाळ होणारा एक मोठा चाहतावर्ग आहे. आज आपण या लेखातून समांथाचे एक ब्युटी सिक्रेट जाणून घेणार आहोत. हे ब्युटी सिक्रेट म्हणजे आहे नऊ मिनिटांचा घरगुती उपचार!
अतिशय रामबाण उपाय
दक्षिण भारतामधील वातावरण हे जास्त उष्ण आहे आणि वर्षभर ते तसेच असते. याच कारणाने तिथे आर्द्रता मोठ्या प्रमाणावर आढळते आणि त्यामुळे त्वचेमध्ये पोर्स ब्लॉकेज निर्माण होणे, खूप जास्त घाम येणे, त्वचेमधून पाणी बाहेर पडणे यासारख्या समस्या निर्माण होतात. याचा त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. अशा प्रदेशातील त्वचेला वेगळ्या प्रकारच्या देखभालीची गरज असते. समांथा देखील याच प्रदेशांमधली त्यामुळे तिने देखील आपली त्वचा निरोगी राखण्यासाठी हा रामबाण उपाय वापरायला सुरुवात केली.
बिझी शेड्युल मध्ये कामी येतो हा उपाय
समांथाचे शेड्युल बिझी असल्याने तिला लगेच परिणाम दाखवणाऱ्या उपायाची गरज होती आणि हा 9 मिनिटांचा खास उपाय तिला खूप लाभदायक ठरतो. हा उपाय म्हणजे स्टीमिंग होय. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरे आहे की एवढी मोठी अभिनेत्री आपल्या त्वचेची सुंदरता या साध्या सोप्या उपायाने राखते. समांथाच्या मते स्टीमिंग घेतल्याने त्वचेचे पोर्स उघडले जातात. या पोर्स मध्ये जो ऑईल, घाम, धूळ यासारखी घाण भरते. ती सर्व घाण पोर्स मधून बाहेर येते आणि त्वचा आतून पूर्णपणे स्वच्छ होते.
पोर्सची स्वच्छता गरजेची आहे
तुम्हाला माहित आहे का ज्याप्रकारे आपण नाकाने श्वास घेतो, त्याप्रमाणे आपली त्वचा पोर्सच्या माध्यामतून श्वास घेते. शिवाय या पोर्सच्या माध्यमातून त्वचा शरीरातील अनेक हानिकारक टॉक्सिन्स आणि निरुपयोगी ऑईल बाहेर टाकते. कधी कधी याच पोर्स मध्ये ऑईल आणि धूळ अडकून पडते. म्हणून यांची स्वच्छता गरजेची असते. मात्र याचा अर्थ असा नाही की पोर्स नेहमीच खुले राहिले पाहिजे. पोर्स उघडी राहिल्याने त्वचा सैल पडते. म्हणून ना पोर्स उघडी राहावी ना बंद, मात्र त्याची स्वच्छता झालीच पाहिजे.
समांथा असा मिळवते इंस्टंट ग्लो
समांथाने एका मुलाखती मध्ये सांगितले होते की ती त्वचेसाठी स्टीमिंग करते. जेव्हा कधी तिला वेळ मिळतो तेव्हा ती 9 मिनिटे वाफ घेते. यानंतर स्कीनची स्वच्छता करते आणि त्वचेला मॉइश्चराइज देखील करते. असे केल्याने तिला इंस्टंट ग्लो मिळतो. स्टीमिंगमुळे त्वचेतील डेड सेल्स दूर होतात. जेव्हा स्टीमिंग नंतर तुम्ही त्वचा साफ करता तेव्हा आतील पेशी पूर्णपणे स्वच्छ होतात. तसेच वरील मृत पेशी निघून जातात.
स्टीमिंग नंतर का लावावे मॉइश्चराइजर?
स्टीमिंगच्या वेळी त्वचेतील पूर्ण ऑईल बाहेर येते. यामुके त्वचेत रुक्षपणा येऊ शकतो. त्वचेमध्ये ऑईलची उपस्थिती संतुलित करण्यासाठी हे गरजेचे असते की तुम्ही त्वचा मॉइश्चर करावी. यासाठी तुम्ही मॉइश्चराइजरचा देखील वापर करू शकता किंवा बदाम तेल, ओलिव्ह ऑईल यांचा वापर देखील तुम्ही करू शकता. जर तुमची त्वचा खूप ऑईली असेल तर ऑईलच्या जागी त्वचेच्या रचनेप्रमाणे सिरमचा वापर करा. त्वचा ऑईली असेल तर बदाम तेलामध्ये 4 थेंब गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्यावर रुक्षपणा येणार नाही.
या त्वचेसाठी सर्वात लाभदायक आहे स्टीमिंग
ज्या लोकांची त्वचा रुक्ष अर्थात ड्राय असते त्यांनी आवर्जून स्टीमिंग घेतली पाहिजे. कारण स्टीमिंग त्वचेच्या पूर्ण आत जाऊन त्वचेला नरीश करते. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की जर स्टीमिंगने त्वचा रुक्ष होत असेल तर स्टीमिंग हे रुक्ष त्वचेसाठी चांगले कसे काय? तर हे यामुळे कारण ड्राय स्कीनचे सेल्स वेगाने डेड होतात, यामुळे पोर्स देखील बंद होतात, जेव्हा तुम्ही स्टीमिंग घेता तेव्हा डेड सेल्स दूर होऊन पोर्स उघडले जातात. नंतर तुम्ही जेव्हा मॉइश्चराइजरचा वापर करता तेव्हा त्वचेला पोषण मिळते.